आॅनर 8सी भारतात लॉन्च, हा आहे जगातील पहिला फोन जो चालतो स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर

टेक कंपनी आॅनर ने गेल्या महिन्यातच अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 8सी आॅफिशियल केला होता. आॅनर 8सी ला जगातील पहिला असा स्मार्टफोन होण्याचा मान मिळाला आहे जो क्वालकॉमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 632 वर सादर झाला आहे. चीनी बाजारात उपलब्ध झाल्यानंतर हा शानदार फोन आज भारतीय बाजारात आला आहे. आॅनर इंडिया ने आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 8सी भारतात लॉन्च केला आहे तसेच हा फोन 11,999 रुपयांच्या सुरवाती किंमतीती 10 डिसेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

आॅनर 8सी ची सर्वत मोठी खासियत हीच कि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर लॉन्च होणार जगातील पहिला स्मार्टफोन आहे. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ट्रेंड मधील नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 720 x 1,520 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलव्यू आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर खालच्या बाजूला बॉडी पार्ट वर आॅनर लिहिण्यात आले आहे तसेच इतर तिन्ही बाजू पूर्णपणे बेजल लेस आहेत. आॅनर 8सी कंपनी द्वारा ईएमयूआई 8.1 सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे.

आॅनर 8सी मधील क्वालकॉम चा लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 632 14एनएम टेक्नोलॉजी वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 506 आहे. कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम मेमरी सह लॉन्च करण्यात आला आहे जो 32जीबी स्टोरेज आणि 64जीबी इंटरनल मेमरी सहा सेल साठी उपलब्ध होईल. दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेगमेंट पाहता आॅनर 8सी डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर फ्लॅश लाईट आहे.

आॅनर 8सी डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. आॅनर 8सी भारतात आॅरोरा ब्लॅक, प्लेटिनम गोल्ड, मीडनाइट ब्लॅक आणि नेबूला वर्पल कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या 32जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 11,999 रुपये तर 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

आॅनर 8सी 10 डिसेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन सोबत कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वरून विकत घेता येईल. लॉन्च आॅफर अंतर्गत आॅनर आपल्या फॅन्स व जियो ग्राहकांना 4450 रुपयांची कॅशबॅक आॅफर देत आहे. तसेच जियो यूजर आॅनर 8सी स्मार्टफोन सोबत 100जीबी अतिरिक्त 4जी डेटा मोफत मिळवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here