Home बातम्या लवकरच लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए20ई, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

लवकरच लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए20ई, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि सॅमसंग 10 एप्रिलला थायलंड मध्ये एका इवेंटचे आयोजन करणार आहे आणि यादिवशी कंपनी आपले नवीन गॅलेक्सी ए सीरीज मध्ये अनेक फोन लॉन्च करू शकते. माहितीनुसार सॅमसंग द्वारा Galaxy A90, Galaxy A60 आणि Galaxy A40 सहित इतर काही डिवाइस लॉन्च होऊ शकतात. आज कंपनीचा अजून एक मॉडेल Samsung Galaxy A20e अमेरिकन सर्टिफिकेशन एफसीसी वर लिस्ट झाला आहे. काही दिवसांपूर्वी हा मॉडेल दुसऱ्या काही सर्टिफिकेशन साइट वर दिसला होता. आज एफसीसी वर लिस्ट झाल्यामुळे निश्चित झाले आहे कि कंपनी लवकरच हा लॉन्च करणार आहे.

विशेष म्हणजे फेब्रुवारी मध्ये कंपनी ने गॅलेक्सी ए20 लॉन्च केला होता आणि ए20 ई याचाच छोटा व्हर्जन असल्याचे बोलले जात आहे. एफसीसी वर हा फान मॉडेल नंबर एसएम—ए202एफ/डीएस नावाने लिस्ट केला गेला आहे. तुम्हाला तर माहित आहे डीएसचा वापर कंपनी डुअल सिम साठी करते. फोनच्या इतर स्पेसिफिकेशनची माहिती सध्या इथे नाही पण काही दिवसांपूर्वी एक लीक आला होता ज्यात थोडी माहिती होती.

हे देखील वाचा: 4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च

विशेष म्हणजे कंपनीच्या घोषणेच्या आधीच 91मोबाईल्स ने काही दिवसांपूर्वी गॅलेक्सी ए20ई चा केस रेंडर दाखवला होता. या रेंडर वरून गॅलेक्सी ए20ई च्या ​लुक आणि डिजाईनची माहिती समोर आली होती. केस रेंडरनुसार हा फोन पण गॅलेक्सी ए सीरीज अलीकडेच ​लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्स प्रमाणे इनफिनिटी यू डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन मिळेल ज्यावर छोटीशी ‘यू’ शेप नॉच असेल. या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा असेल. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट असेल.

हे देखील वाचा: 3 आठवड्यात विकले गेले 5 लाखांपेक्षा जास्त रियलमी 3 फोन, शाओमीला मोठा धक्का

Samsung Galaxy A20e चे स्पेसिफिकेशन
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सचा अंदाज लावला जाऊ शकतो. बोलले जाते कि हा फोन लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए20 चा छोटा व्हर्जन असेल. लीक्स व माहितीनुसार गॅलेक्सी ए20ई एंडरॉयड ओएस एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल. गॅलेक्सी ए20ई सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 3जीबी रॅम मिळेल.