4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च

स्मार्टफोन वेळेसोबत ऍडव्हान्स होत आहेत. स्मार्टफोन्सचा डिस्प्ले मोठा झाला आहे तसेच बॉडी व बेजल्स छोटे. फोन मध्ये फिजिकल बटण कमी झाले आहेत तर कॅमेरा सेंसर वाढले आहेत. फोनचे डायमेंशन आणि वजन कमी होत आहे तर प्रोसेसर दमदार व पावरफुल. आज स्मार्टफोन यूजर्स कडे अनेक ऑप्शन्स आहेत ज्यामुळे ते पूर्णपणे खात्री करून आपल्यासाठी नवीन स्मार्टफोन निवडू शकतात. पण हे सर्व गोष्टी निरर्थक ठरतात जर फोनची बॅटरी चांगली नसेल.

फोनची बॅटरीच त्यात जीव ओतू शकते ज्यामुळे फोन चालतो. याचमुळे एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याआधी सामान्य माणूस फोनची बॅटरी आवर्जून बघतो कि ती किती एमएएच ची आहे म्हणजे किती दमदार आहे. जर तुम्ही पण एखादा नवीन फोन विकत घेऊ इच्छित असाल ज्याची बॅटरी पावरफुल असावी, तर पुढे आम्ही यावर्षी भारतात लॉन्च झालेल्या अशाच 5 बेस्ट स्मार्टफोन्सचा उल्लेख केला आहे जो 4,000एमएएच किंवा यापेक्षा जास्त बॅटरी सह येतात.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो
शाओमी ने गेल्याच महिन्यात देशात आपली रेडमी नोट सीरीज वाढवत दोन नवीन फोन रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो लॉन्च केले होते. हे दोंन्ही स्मार्टफोन 4,000एमएमएच बॅटरी सह येतात. हे दोन्ही स्मार्टफोन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी ने सुसज्ज आहेत ज्यामुळे काही मिनिटांतच फोनची बॅटरी 50 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज होते. रेडमी नोट 7 प्रो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो तर रेडमी नोट 7 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे.

किंमत पाहता रेडमी नोट 7 चा 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तर 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तसेच 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए50
गॅलेक्सी ए50 पण सॅमसंग द्वारा 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. भारतात गॅलेक्सी ए50 चा 4जीबी रॅम / 64जीबी मेमरी वेरिएंट 19,990 रुपये तर 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन इनफिनिटी यू डिस्प्ले वर लॉन्च हुआ आहे ज्यात 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज ​​आहे. एंडरॉयड पाई सह गॅलेक्सी ए50 एक्सनॉस 9610 चिपसेट वर चालतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 8-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी गॅलेक्सी ए50 मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. गॅलेक्सी ए50 ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

ओपो एफ11
ओपो ने पण अलीकडेच दोन नवीन स्मार्टफोन मॉडेल एफ11 आणि एफ11 प्रो भारतात लॉन्च केले आहेत. ओपो एफ11 प्रो मध्ये वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे तसेच ओपो एफ11 4,020एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. ओपो एफ11 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर ओपो एफ11 प्रो ची किंमत 24,990 रुपये आहे. विशेष म्हणजे ओपो एफ11 प्रो पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो तर ओपो एफ11 मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हा फोन मीडियाटेक के हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो.

स्पेसिफिकेशन्स पाहता ओपो एफ11 प्रो 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वर लॉन्च केला गेला आहे तर ओपो एफ11 4जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हे दोन्ही मॉडेल 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. फोटोग्राफी साठी ओपो एफ11 प्रो मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रियलमी 3
रियलमी ने पण गेल्या महिन्यात इंडियन मार्केट मध्ये नवीन स्मार्टफोन रियलमी 3 लॉन्च केला आहे. हा फोन 4,230 एमएएच च्या बॅटरी सह सादर केला गेला आहे तसेच रियलमी 3 5वॉल्ट वाल्या 2 ऍम्पीयरच्या चार्जर सह येतो. रियलमी 3 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स पाहता ​रियलमी 3 मध्ये 6.2-इंचाचा ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. हा फोन कलर ओएस 6.0 आधारित एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो मीडियाटेक हेलियो पी70 चिपसेट वर चालतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तर 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल सिम, 4जी वोएलटीई व फिंगरप्रिंट सारखे फीचर्स आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम20
मोठी बॅटरी असलेल्या फोन्सचा विषय सुरु असेल तर सॅमसंगचा गॅलेक्सी एम20 मागे ठेऊन चालणार नाही. हा फोन भारतात उपलब्द असलेल्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स पैकी एक आहे जो 5,000एमएएच बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सह फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 5,000एमएएच ची बॅटरी दिली आहे. गॅलेक्सी एम20 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपये आणि 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह एक्सनॉस 7904 वर चालतो. गॅलेक्सी एम20 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाईड एंगल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम20 डुअल सिम सह 4जी ला सपोर्ट करतो तसेच सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here