रियलमी ने नेमक्याच स्मार्टफोन्सच्या जीवावर भारतीय बाजारात नाव कमवले आहे. लो बजेट आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या स्मार्टफोन्सच्या जीवावर रियलमी कपंनी थोड्याच काळात देशात हिट ब्रँन्डस मध्ये सामील झाली आहे. अलीकडेच रियलमी ने आपला नवीन स्मार्टफोन रियलमी 3 सादर केला होता ज्याने लॉन्च नंतर पहिल्याच सेल मध्ये यशाचे नवीन रेकॉर्ड केले होते. सेलच्या पहिल्याच दिवशी रियलमी 3 चे 3 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले होते. आज कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे कि रियलमी 3 चे 5 लाखांपेक्षा जास्त यूनिट भारतात विकले गेले आहेत.
5 लाखांचा रेकॉर्ड
रियलमी कंपनी ने प्रेस रिलीज पाठवून सांगितले कि रियलमी 3 ने भारतात यशाचा नवीन रेकॉर्ड केला आहे. कंपनी नुसार रियलमी 3 ने बाजारात आल्यापासून तीन आठवड्यांनंतरच 5 लाख यूनिटची विक्री केली आहे. 3 आठवड्यांच्या आतच 5 लाखांपेक्षा जास्त रियलमी 3 विकले गेले आहेत. हे आकडे शेयर कारण्यासोबतच कंपनी ने शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर रियलमी 3 ला 4.5 रेटिंग मिळाली आहे हे देखील सांगितले.
हे देखील वाचा: या स्वस्त फोन्स मध्ये सुपर फास्ट चालेल PUBG गेम
कंपनी ने या सेल मध्ये रियलमी 3 च्या कोणत्या वेरिएंटचे किती यूनिट विकले गेले हे यात सांगितले नाही. रियलमी 3 चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.
All thanks to your love! ? In just 3 weeks, more than 5 lakh units of #realme3 have been sold and rated 4.5⭐ on @Flipkart. #PowerYourStyle pic.twitter.com/3y0cn3wIVw
— realme (@realmemobiles) April 2, 2019
रियलमी 3 चे स्पेसिफिकेशन्स
फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.2-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. रिलयमी 3 हॅन्डसेट मध्ये 12एनएम मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 3जीबी/4जीबी रॅम आणि 32जीबी/ 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते.
हा स्मार्टफोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह आला आहे. फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि एक डायमंट कट केस आहे. तसेच रियलमी 3 मध्ये ब्लूटूथ वी4.2 सपोर्ट मिळेल. हा फोन कलर ओएस 6 एंडरॉयड 9 पाई आधारित आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये डुअल 4जी वीओएलटीई सिम आहे.
हे देखील वाचा: Huawei P30 Pro लवकरच होईल भारतात लॉन्च, या 5 कारणांसाठी बघा याची वाट
फोटोग्राफी साठी फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. रियर कॅमेरा मध्ये बोके मोड फीचर पण आहे आणि अजून काही क्रिएटिव मोड्स पण आहेत जसे कि मल्टी फ्रेम नॉइस रिडक्शन, हाइब्रिड एचडीआर आणि एआई सीन रिग्नाइजेशन आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.















