यावर्षी जून मध्ये सादर केलेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए21एस अजून ताकदवान वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फेस्टिव सीजन पाहता कंपनीने Samsung Galaxy A21s चा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल भारतात आणला आहे. याआधी फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेल सादर केला गेला होता. नवीन सॅमसंग गॅलेक्सी ए21एस मॉडेल मध्ये जास्त रॅम आणि स्टोरेज व्यतिरिक्त इतर स्पेसिफिकेशन अधिसारखेच आहेत.
स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A21s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी ए21एस एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह येतो जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. भारतात हा फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 850 चिपसेट वर लॉन्च झाला आहे.

भारतात फोन दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. Samsung Galaxy A21s च्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दूसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.
Samsung Galaxy A21s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए21एस मध्ये 15वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत
सॅमसंग गॅलेक्सी ए21एस च्या नवीन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 17,499 रुपये आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी ए21एस च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 14,999 रुपये आणि 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 16,499 रुपये आहे. या मॉडेलच्या किंमतीत काही दिवसांपूर्वी कपात करण्यात आली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए21एस वीडियो














