Samsung ने लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन Galaxy A3 Core, फक्त 6000 रुपयांच्या आसपास आहे या फोनची किंमत

दोन महिन्यांपूर्वी सॅमसंगच्या एका स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A3 Core ची माहिती समोर आली होती ज्यात फोन गूगल प्ले कंसोल वर लिस्ट केला गेला होता. या लिस्टिंग मध्ये फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. आज सॅमसंगने आपला हा लो बजेट स्मार्टफोन टेक मार्केट मध्ये आणला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए3 कोर स्मार्टफोन सध्या नायजेरिया मध्ये लॉन्च झाला आहे जो येत्या काही दिवसांत जागतिक बाजारात लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy A3 Core

सॅमसंगचा हा फोन लो बजेट मध्ये लॉन्च झाला आहे जो एंट्री लेवल स्पेसिफिकेशन्स सह येतो. कपंनीने गॅलेक्सी ए3 कोर 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1480 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये नॅरो बेजल्स असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात कोणतीही नॉच नाही. स्क्रीनच्या वर आणि खाली रुंद बॉडी पार्ट आहे.

Samsung Galaxy A3 Core अँड्रॉइड गो ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो खासकरून कमी रॅम आणि लो स्पेसिफिकेशन्स असलेल्या स्मार्टफोन्ससाठी डिजाईन केला गेला आहे. या ओएसमुळे सर्व गूगल ऍप्सचे ‘गो’ वर्जन फोन मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतात जे फोन मध्ये खूप कमी स्टोरेज घेतात तसेच लो रॅम सह मिळून ऍप्स स्मूदली चालतात.

प्रोसेसिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए3 कोर मध्ये क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालतो. नायजेरियन मार्केट मध्ये हा सॅमसंग फोन 1 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A3 Core च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे सोबतच हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन 4x digital zoom सोबत 30fps रेट वर FHD वीडियो रेकॉर्ड करू शकतो.

Samsung Galaxy A3 Core डुअल सिम फोन आहे जो एलटीईला सपोर्ट करतो. हा फोन पॉलीकार्बोनेट बॉडी वर बनला आहे जो Blue, Black आणि Red कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. नायजेरिया मध्ये या फोनची किंमत ₦32,500 म्हणजे 6,200 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here