साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने बुधवारी इंडियन मार्केट मध्ये आपली A सीरीज वाढवत Galaxy A51 को सादर केला आहे. Samsung Galaxy A51 कंपनीने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्याची विक्री 31 जानेवारी पासून सुरु झाली आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज आहे. किंमत पाहता फोनचा 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर Samsung Galaxy A51 च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत काही दिवसांत समजेल. आज आम्ही Galaxy A51 च्या टॉप पाच फीचर्स बद्दल बोलणार आहोत जे याला सर्वात खास बनवतात.
होल-पंच डिस्प्ले
Samsung चा गॅलेक्सी ए51 होल-पंच डिस्प्ले सह येणारा मिड-रेंज डिवाइस आहे. याआधी कंपनी आपल्या नोट सीरीज आणि गॅलेक्सी एस सीरीज मध्ये अशी डिजाइन देत होती. Galaxy A51 च्या मधोमध पंच-होल आहे, ज्यात फ्रंट कॅमेरा आहे. सिंगल पंच होल व्यतिरिक्त डुअल पंच होल डिस्प्ले असलेले फोन पण मार्केट मध्ये आहेत. पण सिंगल होल-पंच सह येणारा हा डिवाइस वेगळाच आहे.
सुपर स्टेडी फीचर
सेंटर मध्ये होल-पंच प्रमाणे कंपनी आतापर्यंत सुपर स्टेडी फीचर पण आपल्या हाई-एंड फोन्स मध्ये देत होती. पण आता कंपनीने Super Steady फीचर आपल्या ए सीरीजच्या गॅलेक्सी ए51 मध्ये पण दिला आहे. या फीचर बद्दल बोलायचे तर याच्या मदतीने स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यासह Gimble सारखे स्टेब्लाइजेशन मिळते. फोनच्या कॅमेऱ्यातून तुम्ही सुपर Steady वीडियो कॅप्चर करू शकता. या फीचरच्या माध्यमातून वीडियो कॅप्चरिंग करताना जास्त स्टेबिलिटी मिळते आणि तुम्ही प्रत्येक ऑब्जेक्ट डिटेल सह बघू शकता.
मॅक्रो लेंस
कंपनीचा Samsung Galaxy A51 पहिला फोन आहे, ज्यात मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. या फोनच्या नंतर कंपनीने गॅलेक्सी एस10 लाइट मध्ये पण मॅक्रो लेंस दिली आहे. विशेष म्हणजे ग्लोबल मंचावर गॅलेक्सी ए51 कंपनीच्या गॅलेक्सी एस10 लाइटच्य आधी लॉन्च झाला आहे. त्यामुळे हा कंपनीचा पहिला फोन आहे जो मेक्रो लेंस सह येतो. फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे जी याला खास बनवते.
दमदार कॅमेरा
दमदार फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर सॅमसंग गॅलेक्सी ए51 ची अजून एक खासियत आहे. स्मार्टफोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सपोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy A51 मध्ये 32 मेगापिक्सलचा पंच-होल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
शानदार बॅटरी
पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A51 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. डिवाइस मध्ये चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे जो सध्या स्मार्टफोन मध्ये सहज सापडतो. याच्या मदतीने यूजर आपला फोन वेगाने चार्ज करू शकतात.
सॅमसंग गॅलेक्सी ए51 वीडियो















