Samsung Galaxy A55 5G आणि Samsung Galaxy A35 5G फोन 11 मार्चला भारतात येणार आहे. कंपनीकडून दोन्ही मोबाईल फोन सोशल मीडियावर टीज केले जात आहेत. तसेच आता भारतातील लाँचच्या आधी गॅलेक्सी ए 55 5जी आणि ए35 5जी ची किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन जर्मन शॉपिंग साईटवर किंमतीसह लिस्ट झाले आहेत, जेथे रॅम व्हेरिएंट्स व किंमतीचा खुलासा झाला आहे.
Samsung Galaxy A55 5G Price
- 8GB RAM + 128GB Storage = €479 (जवळपास ₹43,299)
- 8GB RAM + 256GB Storage = €529 (जवळपास ₹47,799)
लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोन 8जीबी रॅमवर लाँच केला जाईल. या फोनचे दोन स्टोरेज व्हेरिएंट समोर आले आहेत ज्यामध्ये 128 जीबी आणि 256 जीबी मेमरी देण्यात आली आहे. याची किंमत 479 यूरो आणि 529 यूरो सांगण्यात आली आहे जी भारतीय चलनानुसार क्रमश: 43 हजार व 48 हजार रुपयांच्या आसपास आहे.
Samsung Galaxy A35 5G Price
- 6GB RAM + 128GB Storage = €379 (जवळपास ₹34,299)
- 8GB RAM + 256GB Storage = €449 (जवळपास ₹40,599)
सॅमसंग गॅलेक्सी ए35 5जी फोनच्या दोन व्हेरिएंट लीकमध्ये समोर आल्या आहेत. बेस मॉडेलमध्ये 6 जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आले आहे व मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. याची किंमत 379 यूरो व 449 यूरो आहे जी भारतीय रुपयांमध्ये 34 हजार व 40,500 रुपयांच्या आसपास आहे.
Samsung Galaxy A55 5G Specifications (लीक)
- Samsung Exynos 1480
- 6.6″ FHD+ OLED Display
- 32MP Selfie Camera
- 50MP Rear Camera
- 5,000mAh Battery
- फ्रंट कॅमेरा: सेल्फी काढण्यासाठी तसेच रिल्स बनविण्यासाठी Samsung Galaxy A55 5G फोनला 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरासह मार्केटमध्ये आणले जाऊ शकते.
- बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा पाहायला मिळू शकतो. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल मेन सेन्सर, 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो.
- प्रोसेसर: प्रोसेसिंगसाठी गॅलेक्सी ए55 5जी फोनमध्ये सॅमसंगचा एक्सीनोस 1480 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला चिपसेट आहे जो 2.7 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.
- स्क्रीन: सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोनबद्दल सांगण्यात आले आहे कि यात 6.6 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनलेली असू शकते ज्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो.
- मेमरी: सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोनला एकापेक्षा से अधिक मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केले जाऊ शकते. लीकनुसार हा फोनचा सर्वात मोठा मॉडेल जो 12जीबी रॅमवर येईल. तसेच फोनमध्ये 2 टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड लावले जाऊ शकते.
- बॅटरी: पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोनला 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आणले जाऊ शकते. तसेच मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी यात 25 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.
Samsung Galaxy A35 5G Specifications (लीक)
- Samsung Exynos 1380
- 6.6″ AMOLED Screen
- 13MP Selfie Camera
- 50MP Rear Camera
- 5,000mAh Battery
- डिस्प्ले: Galaxy A35 5G मध्ये 6.6 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असू शकतो. यात FHD+ रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, आणि 1,650 निट्स पीक ब्राइटनेस मिळण्याची शक्यता आहे.
- प्रोसेसर: रिपोर्टनुसार Samsung Galaxy A35 5G मध्ये Exynos 1380 5 नॅनोमीटर प्रक्रियावर आधारित चिपसेट सादर केली जाऊ शकते. हा मोबाईल अँड्रॉइड 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो. त्याचबरोबर ब्रँड 4 वर्षच्या OS अपग्रेड आणि 5 वर्षाच्या सुरक्षा अपडेट प्रदान करतो.
- बॅटरी: फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. ज्याला चार्ज करण्यासाठी 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
- कॅमेरा: फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची गोष्ट पण फोटोमध्ये पण समोर आली आहे. ज्यात HDR व्हिडिओला सपोर्टसह 50MP चा OIS प्रायमरी, 8MP अल्ट्रावाइड आणि 5MP मॅक्रो लेन्स होऊ शकतात. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP चा लेन्स लावली जाऊ शकते.














