सॅमसंगने मार्चमध्ये आपला प्रीमियम A-सीरीज स्मार्टफोन Samsung Galaxy A55 ला लाँच केले होते. तर, आता त्याच्या अपग्रेड Samsung Galaxy A56 बद्दलची माहिती समोर आली आहे. वास्तविक हा बेंचमार्किंग वेबसाईट गिकबेंच वर स्पॉट झाला आहे. ज्यामध्ये काही प्रमुख स्पेसिफिकेशन पहायला मिळाले आहेत. अशी आशा आहे की येत्या काही महिन्यांत फोनची एन्ट्री होऊ शकते. चला आगामी Galaxy A56 च्या सूचीला सविस्तरपणे जाणून घेऊया.
Samsung Galaxy A56 गिकबेंच सूची
- गिकबेंच प्लॅटफॉर्मनुसार Samsung Galaxy A56 चा मॉडेल नंबर SM-A566B आहे. यातील ‘बी’ वरून लक्षात येते की हा एक जागतिक व्हेरिएंट आहे.
- फोनने (Exynos 1580 चिपसेटसह) सिंगल-कोरमध्ये 1,341 आणि मल्टी-कोर चाचणीमध्ये 3,836 गुण मिळवले.
- हा चिपसेट Galaxy A55 मध्ये मिळालेल्या Exynos 1480 SoC पेक्षा चांगला सिद्ध होण्याची अपेक्षा आहे.
- Exynos 1580 चे सांकेतिक नाव सांता (मॉडेल क्रमांक S5E8855) असे आहे. असे म्हटले जात आहे की हा स्नॅपड्रॅगन 888 पेक्षा चांगले परफॉर्मन्स अनुभव देऊ शकतो.
- चिपसेटमध्ये एक प्राईम कोर (2.91 गिगाहर्ट्झ वर कॉर्टेक्स-ए720), तीन परफॉर्मन्स कोर (2.60 गिगाहर्ट्झ वर कॉर्टेक्स-ए720) आणि चार कार्यक्षमता कोर (1.95 गिगाहर्ट्झ वर कॉर्टेक्स-ए520) आहेत.
- Exynos 1580 चिपसेट व्यतिरिक्त ग्राफिक्ससाठी Xclipse 540 जीपीयू लावले जाऊ शकते.
- चाचणी केलेल्या मॉडेलमध्ये सुमारे 8 जीबी रॅम दिली जाऊ शकते. तर लाँचच्या वेळी Galaxy A55 प्रमाणे हे 8 जीबी, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेजमध्ये येऊ शकते.
- ओएसबद्दल बोलायचे झाल्यास आगामी फोन अँड्राईड 15 आधारित वन यूआय 7.0 वर काम करू शकतो.
Samsung Galaxy A55 5G चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: मागील मॉडेल Samsung Galaxy A55 5G मध्ये 6.6 इंचाचा एफएचडी+ सुपर ॲमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. त्यावर 120 हर्ट्स रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स पीक ब्राईटनेसचा सपोर्ट मिळत आहे.
- चिपसेट: सॅमसंग गॅलेक्सी A55 5G स्मार्टफोनमध्ये नवीनतम सूचीमध्ये समोर आलेल्या चिपसेटपेक्षा लो व्हर्जन Exynos 1480 प्रोसेसर उपलब्ध आहे.
- रॅम आणि स्टोरेज: डिव्हाईसमध्ये 12 जीबी रॅम+ 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजची सुविधा दिली गेली आहे. याच्या मदतीने 1 टीबी पर्यंत एक्सपॅंडेबल मेमरी जोडता येऊ शकते.
- कॅमेरा: फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात ओआयएस सह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी, 12 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाईड आणि 5 मेगापिक्सेलची मॅक्रो कॅमेरा लेन्स लावण्यात आली आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेलची लेन्स आहे.
- बॅटरी: Samsung Galaxy A55 स्मार्टफोन मध्ये 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठ्या 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी मिळत आहे.
- इतर: हा डिव्हाईस इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, 5G आणि वाय-फाय 6 सारख्या अनेक फिचर्स ने सुसज्ज आहे.