सॅमसंग बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या की कंपनी एका अशा स्मार्टफोन वर काम करत आहे ज्याच्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर असतील. टेक विश्वाला धक्का देत सॅमसंग ने आपला हा फोन जगासमोर आणला आहे. सॅमसंग ने पहिल्यांदाच ट्रिपल रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर केला आहे. सॅमसंग ने आपला हा शानदार स्मार्टफोन गॅलेक्सी ए7 (2018) नावाने अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केला आहे जो फक्त शानदार डिजाईन ने यूजर्सना आकर्षित करेल असे नाही तर आपल्या दमदार स्पेसिफिकेशन्स मुळे फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना पण चांगलीच टक्कर देईल.
सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) ची सर्वात मोठी यूएसपी याचा कॅमेरा सेग्मेंट आहे. स्पेसिफिकेशन्स ची सुरवात फोटोग्राफी डिपार्टमेंट ने केल्यास फोन च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये उजवीकडे आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. या 3 कॅमेरा सेंसर्स मध्ये एक कॅमेरा 24-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.7 अपर्चर ला सपोर्ट करतो. तसेच एफ/2.2 अपर्चर असलेला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर रियर पॅनल वर आहे.
गॅलेक्सी ए7 (2018) बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन देण्यात आले नाही. हा फोन 6.0-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले ला सपोर्ट करतो तसेच फ्रंट पॅनल वर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. सॅमसंग ने आपला हा फोन एंडरॉयड ओरियो वर सादर केला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. कंपनी गॅलेक्सी ए7 (2018) वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये वेगवेगळ्या चिपसेट वर लॉन्च करेल. यात सॅमसंगचा एक्सनॉस किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट असू शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) कंपनी ने 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम सह सादर केला आहे जो 64जीबी स्टोरेज आणि 128जीबी स्टोरेजच्या वेगवेगळ्या वेरिएंट मध्ये बाजारात लॉन्च होतील. भारतीय बाजारात हा फोन 6जीबी रॅम/128जीबी मेमरी, 4जीबी रॅम/128जीबी मेमरी किंवा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी अशा वेरिएंट मध्ये येत्या काही दिवसांत विक्री साठी उपलब्ध होईल. कदाचीत सॅमसंग फक्त 64जीबी स्टोरेज वाला वेरिएंटला एक्सट्रनल कार्ड सपोर्ट सह लॉन्च करू शकते.
गॅलेक्सी ए7 (2018) 4जी फोन आहे जो एनएफसी सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी या फोनच्या साईड पॅनल वरील पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,300एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतो. सॅमसंग ने आपला हा दमदार फोन ब्लू, ब्लॅक, गोल्ड व पिंक कलर वेरिएंट मध्ये सादर केला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन लवकरच आॅफिशियली लॉन्च केला जाऊ शकतो तसेच आशा आहे की देशात सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) ची बेसिक किंमत जवळपास 28,000 रुपयांपर्यंत असेल.













