काही दिवसांपूर्वी आम्ही माहिती दिली होती कि सॅमसंगने आपल्या पहिल्या 3 कॅमेरा आणि 4 कॅमेरा असलेल्या फोन Galaxy A7 आणि Galaxy A9 च्या किंमतीत कपात केली आहे. आज पुन्हा एकदा या फोन्स वर भरपूर डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीने आज Samsung Galaxy A9 वर जवळपास 8,000 रुपयांची सूट दिली आहे तर Galaxy A7 वर 3,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटची सर्वात खास बाब अशी कि डिस्काउंट नंतर सॅमसंगचा 8जीबी रॅम आणि 4 कॅमेरा असलेला फोन फक्त 24,990 रुपयांमध्ये घेता येईल.
याबद्दल 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोर कडून एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. दिल्ली नजफगढ मधील मनोज टेलीकॉमच्या संजय गोस्वामी यांनी आम्हाला सांगितले कि “Galaxy A9 आणि Galaxy A7 वर कंपनीने आज पासूनच इन्स्टंट कॅशबॅकची स्कीम सुरु केली आहे ज्या अंतर्गत ए9 मॉडेल वर जवळपास 8,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे आणि ए7 वर जवळपास 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. या प्राइस कट नंतर Samsung Galaxy A9 चा 8जीबी रॅम असलेला मॉडेल 24,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 6जीबी रॅम मॉडेल आता 22,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.”
ते पुढे म्हटले कि “सॅमसंग Galaxy A7 वर कंपनी आधी जो डिस्काउंट देत होती तो अजूनही चालू आहे. Galaxy A7 चा 4जीबी वाला मॉडेल 15,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6जीबी वाला मॉडेल आता 19,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हि ऑफर मे पर्यंत वैध आहे आणि कदाचित पुढे पण चालू राहील.”
विशेष म्हणजे Samsung Galaxy A9 जगातील पहिला फोन आहे जो 4 रियर कॅमेऱ्यांसह सादर केला गेला होता. मागील काही महिन्यांपासून या फोन मॉडेलच्या किंमतीत खूप कपात झाली आहे. भारतीय बाजारात Samsung Galaxy A9 चा 6जीबी रॅम मॉडेल 36,990 रुपयांमध्ये सादर केला गेला होता. तर 8जीबी वाला फोन 39,990 रुपयांमध्ये मिळत होता. आता पर्यंत या फोन मध्ये जवळपास 15,000 रुपयांची कपात झाली आहे.
हे देखील वाचा: 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह आला Infinix S4, जाणून घ्या याची किंमत
Samsung Galaxy A9 चे स्पेसिफिकेशन
गॅलेक्सी ए9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन 6.3-इंचाचा सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 18.5:9 आसपेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले आहे. तसेच हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो. जो सॅमसंगच्या यूजर इंटरफेस एक्सपीरियंस 8.5 यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी कंपनी ने हा फोन 14एनएम ऑक्टा-कोर प्रोसेसर वर सादर केला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रीनो 512 जीपीयू आहे.
हे देखील वाचा: लवकरच बंद होणार आहे का Xiaomi Redmi Note 7?
तसेच गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर यात बॅक पॅनल वर 4 रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. यातील एफ/1.7 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा ओआईएस सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 10-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 एफ/2.0 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याने सुस्सज आहे.सॅमसंग गॅलेक्सी ए9 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे तसेच हा फोन अनलॉकिंग साठी फेस रिकॉग्निशन फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 क्विक चार्ज 2.0 सपोर्ट वाल्या 3,800एमएएच बॅटरी सह लॉन्च केला आहे.
