लवकरच बंद होणार आहे का Xiaomi Redmi Note 7?

या वर्षी फेब्रुवारीत Xiaomi ने Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro भारतीय बाजारात सादर केले होते आणि नेहमीप्रमाणे या फोन्सची खूप चर्चा पण होती. 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये Redmi Note 7 एक चांगला डिवाइस होता. परंतु आज बातमी आली आहे कि शाओमी लवकरच हा मॉडेल बंद करणार आहे. हि बातमी इतर कोणी नाही तर स्वतः शाओमीच्या एका कंपनी एक्जिक्यूटिवने दिली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून सांगितले कि लवकरच कंपनी Xiaomi Redmi Note 7 बंद करणार आहे. त्यामुळे फक्त दोन महिन्यात कंपनी आपला नवीन फोन बंद करेलचा असा प्रश्न निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे शाओमीने कालच भारतीय बाजारात Redmi Note 7S सादर केला आहे आणि हा Redmi Note 7 ची रिप्लेसमेंटच्या स्वरूपात बघितला जात आहे. दोन्ही फोन मध्ये स्पेसिफिकेशन जवळपास सारखेच आहेत फक्त कॅमेऱ्यात फरक आहे. Redmi Note 7S चा कॅमेरा जास्त चांगला आहे. तसेच किंमतीबद्दल बोलायचे तर नवीन मॉडेल 1,000 रुपये जास्त किंमतीत मध्ये उपलब्ध होईल. Redmi Note 7 ची कीमत 9,999 रुपयांपासून सुरु होते. तर Redmi Note 7S 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्यामुळे कंपनी ने Xiaomi Redmi Note 7 बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 9,999 रुपयांमध्ये शाओमीचा Redmi Y3 पण उपलब्ध आहे जो आपल्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे कंपनीला नुकसान होण्याची शक्यता नाही.

शाओमी Redmi Note 7 आणि Note 7S चे स्पेसिफिकेन
Xiaomi Redmi Note 7 आणि Redmi Note 7S च्या डिजाइन आणि डिस्प्ले मध्ये कोणताही फरक नाही. दोन्हीची बॉडी ग्लास पासून बनलेली आहे. दोन्ही फोन मध्ये 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 19:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. फोन मध्ये वाटर ड्रॉप नॉच आहे ज्याला कंपनीने डॉट नॉच म्हटले आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग आहे.

दोन्ही फोन Android Operating System 9 Pie वर चालतात. सोबत तुम्हाला मीयूआई 10.3 ची लेयरिंग मिळेल. तसेच कंपनीने हे क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर सादर केले आहेत आणि यात 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही फोन 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी मध्ये उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा: आता Redmi 7 साठी बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, आज पासून मिळेल ओपन सेल मध्ये

कॅमेरा सेग्मेंट वेगळा आहे. Xiaomi Redmi Note 7S मध्ये मेन कॅमेरा 48-मेगापिक्सलचा आहे आणि जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. तर दुसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. कॅमेरा सह तुम्हाला एचडीआर, लो लाइट आणि बोके इफेक्ट सारखे ऑप्शन मिळतील तर Redmi Note 7 चा कॅमेरा कमी मेगापिक्सलचा आहे.

Xiaomi Redmi Note 7 मध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. मेन सेंसर 12-मेगापिक्सलचा आहे आणि जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. तर दुसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. हाच मुख्य फरक आहे. सेल्फी बद्दल बोलायचे तर दोन्ही फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो.

हे देखील वाचा: Vodafone यूजर्सना रोज 1 वर्षापर्यंत फ्री मिळेल 1.5जीबी डेटा, बघा कसे ते

डेटा व कॉलिंग साठी 4जी सह वोएलटीई आहे. तसेच वाईफाई आणि ब्लूटूथ पण देण्यात आली आहे. कंपनीने हा माइक्रो यूएसबी टाइप सी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये आईआर ब्लास्टर मिळेल ज्याने तुम्ही घरातील इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस कंट्रोल करू शकता. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. तसेच तुम्ही फेस अनलॉकचा पण वापर करू शकता. पावर बॅकअप साठी दोन्ही मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here