32MP सेल्फी कॅमेऱ्यासह आला Infinix S4, जाणून घ्या याची किंमत

Infinix ने गेल्या महिन्यात भारतात आपला स्मार्टफोन Infinix Smart 3 Plus लॉन्च केला होता जो सर्वात कमी किंमतीत ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह आला होता. तर आज कंपनीने अजून एक हँडसेट लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीने Infinix S4 नावाने सादर केला आहे, ज्याची किंमत 8,999 रुपये आहे.

कंपनी या महिन्याच्या सुरवातीला हा फोन टीज केला होता. Infinix S4 ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वर 28 मे पासून सेल साठी येईल. या फोन सोबत रिलायंस जियो कडून 4,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच फोन Nebula Blue, Twilight Purple आणि Space Gray कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइस 28 मे पासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वर दुपारी 12 वाजता सेल साठी सादर केला जाईल.

Infinix S4 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.21-इंचाचा एचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत हा फोन मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसर सह सादर केला गेला आहे. हँडसेट मध्ये 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जर तुम्ही फोनची स्टोरेज वाढवू इच्छित असाल तर माइक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी Infinix S4 मध्ये रियर वर तीन कॅमेरा देण्यात आले आहेत. या तीन रियर कॅमेरा मध्ये 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सल वाइड एंगल सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फ्रंटला 32-मेगापिक्सलचा एआई कॅमेरा आहे. कनेक्टिविटी ऑप्शन बद्दल बोलायचे तर फोन मध्ये 4जी एलटीई, डुअल-सिम कार्ड स्लोट, वाई-फाई, ब्लूटूथ आणि ए-जीपीएस सह 4,000एमएएच ची बॅटरी असेल. त्याचबरोबर फोन एंडरॉयड 9.0 पाई वर चालतो.

विशेष म्हणजे कंपनीने आपला विरेबल बॅंड पण लॉन्च केला आहे. कंपनीने हा X Band 3 नावाने सादर केला आहे. या फिटनेस बॅंडच्या मदतीने हार्ट रेट, बीपी मॉनिटरिंग आणि एक्टिविटी ट्रॅकिंग करू शकता. पावर बॅकअप साठी या बॅंड मध्ये देण्यात आलेली बॅटरी 20 दिवसांचा बॅकअप देते. याची किंमत 1,599 रुपये आहे जो 4 जून पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here