Categories: बातम्या

एक्सक्लूसिव: 4 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होईल सॅमसंगचा 4 कॅमेरा असलेला फोन गॅलेक्सी ए9

या महिन्याचा सुरवातीला सॅमसंगने आपला चार कॅमेरा असलेला फोन गॅलेक्सी ए9 मलेशिया मध्ये सादर केला होता. कंपनी ने तेव्हा माहिती दिली होती की हा फोन लवकरच भारता सहित दुसर्‍या बाजारांत पण उपलब्ध होईल. पण तेव्हा भारतातील लॉन्चची तारीख सांगण्यात आली नव्हती परंतु आता 91मोबाईल्सला याबद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ज्या नुसार कंपनी 4 नोव्हेंबरला हा फोन भारतात सादर करणार आहे. सॅमसंग ने जारी याची अधिकृत माहिती दिली नसली तरी आम्हाला याची माहिती रिटेल सोर्स कडून मिळाली आहे. कंपनीचा हा फोन गॅलेक्सी ए9एस नावाने चीन मध्ये 24 ऑक्टोबरला उपलब्ध होणार आहे त्यानंतर काही दिवसांनी हा फोन भारतात येईल.

91मोबाईल्सला याबद्दल माहिती मिळताच आम्ही वेगवेगळ्या रिटेलर्स कडे याची चौकशी केली, हरियाणा आणि दिल्लीचे रिटेलर्सनी सांगितले की सॅमसंग गॅलेक्सी ए9 नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केला जाईल. तर राजस्थानच्या सॅमसंग रिटेलर्सनी माहिती दिली की हा फोन 4 नोव्हेंबर पासून भारतात उपलब्ध होईल. कंपनी हा फोन दिवाळीच्या आधी आणण्याचा प्लान करत आहे.

किंमतीची अधिकृत माहिती अजून आली नाही पण रिटेलर्सनी सांगितले की हा फोन 40,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये लॉन्च होईल. यावरुन स्पष्ट झाले आहे की कंपनी भारतातील सर्वांत मोठ्या सणाचे निमित्त सोडू इच्छित नाही. कदाचित लॉन्चच्या वेळी काही आॅफर्स पण तुम्हाला मिळू शकतात.

गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये ग्राफिक्स साठी एड्रीनो 512 जीपीयू देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये गॅलेक्सी ए9 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे. हे दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतात जी 512जीबी पर्यंत वाढवता येते.

गॅलेक्सी ए9 मध्ये डुअल सिम, एनएफसी आणि सॅमसंग पे सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देनाय्त आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये क्विक चार्ज 2.0 सपोर्ट वाली 3,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A9, Samsung, Tech News In Marathi,

Published by
Siddhesh Jadhav