काही महिन्यांपूर्वी असा रिपोर्ट आला होता कि सॅमसंग आपल्या गॅलेक्सी ए सीरीजच्या स्मार्टफोन वर काम करत आहे, जे 2019 मध्ये सादर केले जाऊ शकतात. या सीरीज मधील गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 ची बातमी आली होती. या आठवड्यात समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार कंपनी ए सीरीज मध्ये गॅलेक्सी ए70 आणि ए90 वर पण काम करत आहे. आता गॅलेक्सी ए90 स्मार्टफोनचे अनेक डिटेल्स समोर आले आहेत, ज्यावरून स्मार्टफोन कोणत्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स सह सादर केला जाईल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
सॅममोबाइलच्या बातमीनुसार समोर आले आहे कि गॅलेक्सी ए90 चा मॉडेल नंबर एसएम-ए905एफ असेल. तसेच हॅन्डसेट बद्दल अफवा आहे कि कंपनी हा तीन रंगांत सादर करू शकते, ज्यात बॅक, सिल्वर आणि गोल्ड रंग असतील. तसेच अशा आहे कि गॅलेक्सी ए90 128जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला जाईल. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि स्मार्टफोन फक्त या स्टोरेज सह सादर केला जाईल.
सॅमसंग गॅलेक्सी ए90 कंपनी ने गेल्यावर्षी सादर केलेल्या गॅलेक्सी ए9 (2018) चा अपग्रेडेड वेरिएंट असू शकतो. गॅलेक्सी ए9 (2018) मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेश्यो इनफिनिटी डिस्प्ले डिजाइन होती. पण गॅलेक्सी ए90 मध्ये पंच होल स्क्रीन असेल कि इनफिनिटी डिस्प्ले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अलीकडेच समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि सॅमसंग तीन अशा स्मार्टफोन्स वर काम करत आहे ज्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. बोलले जात आहे कि हे तिन्ही फोन गॅलेक्सी ए सीरीजचे असतील आणि हे गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए70 तसेच गॅलेक्सी ए50 नावाने बाजारात येतील. कोरियन मीडियानुसार हे तिन्ही स्मार्टफोन मीड बजेट मध्ये लॉन्च केले जातील.














