Samsung इंडिया वेबसाइट वर लिस्ट झाले Galaxy M01 आणि Galaxy M11, लो बजेट मध्ये लवकरच होतील लॉन्च

सॅमसंग बाबत दोन दिवसांपूर्वीच 91मोबाईल्सने सांगितले होते कि Samsung Galaxy M01 आणि Samsung Galaxy M11 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करणार आहे. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही सांगितले होते कि गॅलेक्सी एम01 ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आणि गॅलेक्सी एम11 ची किंमत 10,000 ते 15,000 दरम्यान असेल. हे दोन्ही डिवाईस जूनच्या सुरवातीला ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेलसाठी उपलब्ध होतील. आज आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत सॅमसंगने गॅलेक्सी एम01 आणि एम11 Samsung च्या अधिकृत भारतीय वेबसाइट वर पण लिस्ट केले आहेत.

Samsung Galaxy M01 आणि Galaxy M11 कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर आले आहेत. सॅमसंगने अजूनतरी या फोन्सचे प्रोडक्ट पेज बनवले नाही पण हे वेबसाइटच्या सपोर्ट पेज वर लिस्ट झाले आहेत. इथे गॅलेक्सी एम11 SM-M115F/DS मॉडेल नंबर सह तर गॅलेक्सी एम01 फोन नावाने लिस्ट केला गेला आहे. विशेष म्हणजे सपोर्ट पेज वर Galaxy M01 चे तीन आणि Galaxy M11 चे दोन वेरिएंट दिसले आहेत.

Samsung Galaxy M11

ग्लोबल मंचावर हा फोन 6.4-इंचाच्या एलसीडी एचडी+ रिजोल्यूशन डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. फोन मध्ये 3 जीबी आणि 4 जीबी रॅम सह 32 जीबी व 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. स्मार्टफोन ऐंड्रॉयड 10 बेस्ड वन यूआई 2.0 वर चालेल. अशा आहे कि भारतात हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर लॉन्च केला जाईल.

फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी एम11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये अपर्चर एफ/1.8 सह 13 मेगापिक्सल प्राइमरी, अपर्चर एफ/2.2 सह 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेंसर आणि अपर्चर एफ/2.4 सह 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर असेल. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल एफ/2.0 अपर्चर असलेला कॅमेरा असेल. फोन मध्ये 5000एमएएच की बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M01

सॅमसंग गॅलेक्सी एम01 बद्दल बोलायचे तर हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 1560 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.71 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्लेला सपोर्ट करेल. हा फोन 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला जाईल तसेच हा सॅमसंग फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या कॅमेरा सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल ज्या सोबत 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळेल. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. फोन मध्ये फेस अनलॉक फीचर सोबतच पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल जी 5वॉट चार्जिंगला सपोर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here