Samsung नं भारतात आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं Samsung Galaxy M13 4G आणि Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. Galaxy M13 स्मार्टफोनच्या 4G व्हेरिएंटची माहिती आधीच मिळाली होती परंतु 5G व्हेरिएंट सादर करून कंपनीनं भारतीयांना सरप्राईज दिलं आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्समध्ये मोठा फरक आहे परंतु कंपनीनं डिजाईन एकसारखी दिली आहे. Samsung Galaxy M13 आणि Galaxy M13 5G स्मार्टफोन भारतात ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येतील.
Samsung Galaxy M13 4G आणि 5G ची किंमत
Samsung Galaxy M13 4G स्मार्टफोनचा 4GB रॅम व 64GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट 11,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच या फोनचा 128GB स्टोरेज मॉडेल 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल
Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनच्या बेस मॉडेलमध्ये 6GB रॅम व 64GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम व 128GB स्टोरेज असलेला टॉप एन्ड व्हेरिएंट 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. दोन्ही स्मार्टफोनची विक्री 23 जुलैपासून सुरु होईल. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
Samsung Galaxy M13 4G चे स्पेसिफिकेशन्स
- 6.6-इंचाचा Full HD+ डिस्प्ले
- Exynos 850 प्रोसेसर
- 4GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज
- Android 12 आधारित One UI Core 4.1
- 50MP + 5MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
- 8MP सेल्फी कॅमेरा
- 6,000mAh बॅटरी 15W चार्जिंग
Samsung Galaxy M13 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full-HD+ Infinity-V डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यात ग्राफिक्ससाठी Mali-G52 जीपीयू मिळतो. सोबतीला 4GB RAM आणि 128GB पर्यांतची इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढदवता येते. हा फोन Android 12 आधारित One UI Core 4.1 वर चालतो.
Samsung Galaxy M13 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP मुख्य कॅमेरा, 50MP चा अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असलेल्या या हँडसेटमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS, 3.5mm ऑडियो आणि USB Type-C पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
Samsung Galaxy M13 5G चे स्पेसिफिकेशन्स
- 6.5-इंच Full HD+ डिस्प्ले
- MediaTek Dimensity प्रोसेसर
- 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज
- Android 12 आधारित One UI Core 4.1
- 50MP + 8MP ड्युअल रियर कॅमेरा
- 8MP सेल्फी कॅमेरा
- 5,000mAh बॅटरी, 15W चार्जिंग
Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD तुलनेने छोटा डिस्प्ले देण्यात आला आहे,. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. जोडीला 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फोन Android 12 OS आधारित OneUI 4.0 वर चालतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
सॅमसंगच्या स्वस्त 5G स्मार्टफोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. सोबतीला कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, 3.5mm ऑडियो आणि USB Type C पोर्ट असे ऑप्शन मिळतात.