Samsung कंपनीने आपल्या गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या पहिल्या टॅबलेट डिवायस वर काम सुरु केले आहे जो Samsung Galaxy Tab M62 नावाने बाजारात येईल. 91मोबाईल्सची नजर अगदी सुरवातीपासून या मोबाईल वर आहे आणि मागे नोयडा मध्ये सुरु झालेल्या फोनच्या निर्मितीचे रियल प्रोडक्शन फोटो पण एक्सक्लूसिवली पब्लिकेशनने शेयर केले आहेत. अलीकडेच सॅमसंग गॅलेक्सी टॅब एम62 अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर लिस्ट झाला होता, तर आता एक ताज्या रिपोर्ट मध्ये हा फोन गीकबेंच वर लिस्ट होणार असल्याचे पण समोर आले आहे.
Samsung Galaxy Tab M62 स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग काल म्हणजे 20 जानेवारीची आहे जिथे फोन SM-M625F मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे. सर्वप्रथम बेंचमार्किंग स्कोर पाहता सॅमसंग गॅलेक्सी टॅब एम62 ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 786 पॉईंट्स मिळाले आहेत तर मल्टी-कोर मध्ये एम62 ला 1995 स्कोर देण्यात आला आहे. गीकबेंच लिस्टिंग मध्ये फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी टॅब एम62 अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर लाॅन्च केला जाईल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज बेस क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनाॅस 9825 चिपसेट मिळेल. गीकबेंच वर Samsung Galaxy Tab M62 6 जीबी रॅम सह येणार असे सांगण्यात आले आहे. पण अशी आशा आहे कि बाजारात हा फोन एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये लाॅन्च होईल.
हे देखील वाचा : फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल शानदार Samsung Galaxy M02s स्मार्टफोन, 19 जानेवारी पासून होईल विक्री
अशी असेल डिजाईन
मागे 91मोबाईल्सने शेयर केलेल्या Samsung Galaxy Tab M62 चे फोटोज पाहता यांत फोनच्या निर्मिती दाखवण्यात आली होती. हे फोटोज इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून मिळाले आहेत. गॅलेक्सी टॅब एम62 च्या फोटोज वरून समजले आहे कि हा डिवायस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो स्क्रीनच्या वरच्या भागात मध्यभागी असेल. या इंटरनल पॅनलच्या फोटो वर M62 टायटल पण दिसत आहे.
इतर स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Tab M62 चे याहून जास्त स्पेसिफिकेशन्स तर सध्या समोर आले नाहीत पण काही दिवसांपूर्वी झालेल्या एफसीसी लिस्टिंगवरून समजले आहे कि हा फोन 7,000एमएएचच्या मोठ्या बॅटरी सह लाॅन्च केला जाईल. तसेच बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी या फोन मध्ये 25 वाॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट पण मिळेल. लिस्टिंग मध्ये फोनचा 256जीबी इंटरनल स्टोरेज असलेला वेरिएंट पण समोर आला आहे. त्यामुळे आशा आहे कि यावर्षी पहिल्या तिमाहीत सॅमसंग हा फोन सादर करेल.














