साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने आज आपल्या पावरफुल स्मार्टफोन Galaxy Note 10 Lite चा लाइट वर्जन भारतात सादर केला आहे. Galaxy Note 10 Lite नावाने सादर केला गेलेला हा फोन काही दिवसांपूर्वी इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च झाला होता. आता कंपनीने हा डिवाइस इंडियन मार्केट मध्ये सादर केला आहे.
किंमत आणि ऑफर्स
सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 लाइटचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 38,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 40,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy Note 10 Lite Aura Glow, Aura Black आणि Aura Red कलर मध्ये मिळेल. फोनची प्री-बुकिंग आज पासून सुरु झाली आहे तसेच Galaxy Note 10 Lite येत्या 3 फेब्रुवारी पासून कंपनीच्या वेबसाइट सह ऑनलाईन शॉपिंग साइट्स तसेच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Note10 Lite कंपनीने 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्याला कंपनीने सिनेमॅटिक इनफिनिटी डिस्प्लेचे नाव दिले आहे. गॅलेक्सी नोट 10 लाइट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो जो फास्ट फोन अनलॉकिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
Samsung Galaxy Note10 Lite दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे ज्यात 6 जीबी रॅम मेमरी आणि 8 जीबी रॅमचा समावेश आहे. हे दोन्ही वेरिएंट्स 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते. गॅलेक्सी नोट 10 लाइट एनएफसी व सॅमसंग पे सारख्या फीचर्स सह येतो.
Samsung Galaxy Note10 Lite चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंगने फक्त सॉफ्टवेयर नाही तर आउटर लुकच्या बाबतीत पण फोनचा कॅमेरा डिपार्टमेंट खास बनवला आहे. बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/1.7 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलचा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे. फ्रंट पॅनल वरील पंच-होल मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
Galaxy Note10 Lite सॅमसंग 2.0 यूआई आधारित एंडरॉयडच्या ऍडव्हान्स ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंगच्या 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या एक्सनॉस 9810 चिपसेट वर चालतो. पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा डिवाईस पण नोट 10 सीरीज मधील फोन्स प्रमाणे ऍडव्हान्स S-Pen सह लॉन्च झाला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 लाइट वीडियो














