सॅमसंग च्या नेक्स्ट नोट डिवाईस बद्दल खुप काळापासून लीक्स समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन यूएस फेडरल कम्यूनिकेशंस कंमीशन (एफसीसी) वर लिस्ट झाला होता त्यानंतर अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच गॅलेक्सी नोट 9 टेक बाजारात सादर करेल. तसेच आता नोट 9 च्या लॉन्च संबंधी अफवांना पूर्ण विराम देत सॅमसंग ने स्वतः गॅलेक्सी नोट 9 ची लॉन्च डेट समोर आणली आहे. कंपनी ने सांगितले आहे की ऑगस्ट महिन्याच्या 9 तारखेला सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 जगासमोर येईल.
सॅमसंग ने एक 22 सेकेंड चा इन्वाईट टीजर शेयर केला आहे ज्यात या नवीन डिवाईस च्या लॉन्च डेट चा खुलासा झाला आहे. पण सॅमसंग ने या टीजर मध्ये गॅलेक्सी नोट 9 चे नाव लिहले नाही पण दाखवण्यात आलेल्या ‘एस पेन’ मुळे हे स्पष्ट होते की 9 ऑगस्ट ला लॉन्च होणारा डिवाईस नोट 9 च असेल. तर दुसरीकडे अशी आशा व्यक्त होत आहे की सॅमसंग याच दिवशी गॅलेक्सी नोट 9 सोबत गॅलेक्सी टॅब एस4 आणि सॅमसंग गियर एस4 पण आॅफिशियल करू शकते.
आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा डिवाईस 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या क्यूएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. 161.9 x 76.3एमएम डायमेंशन सह या फोन ची जाडी 8.8एमएम असू शकते तसेच फोन 6.3-इंचाच्या स्क्रीन सह सादर केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 बद्दल बोलले जात आहे की हा फोन वेगवेगळ्या बाजारांमध्ये एक्सनॉस 9810 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.
गॅलेक्सी नोट 9 दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 8जीबी तसेच 6जीबी रॅम आॅप्शन उपलब्ध होतील. तसेच फोन मध्ये 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते. पावर बॅकअप साठी गॅलेक्सी नोट 9 मध्ये 3,850एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. गॅलेक्सी नोट 9 च्या लॉन्च पर्यंत या फोन बद्दल इतर बातम्या पण येत राहतील ज्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.