सॅमसंग घेऊन येत आहे आॅन सीरीज चा अजून एक स्मार्टफोन, इनफिनिटी डिस्प्ले सह पुढील आठवड्यात होईल भारतात लॉन्च

सॅमसंग ने वर्षाच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपल्या आॅन सीरीज चा स्मार्टफोन आॅन7 प्राइम लॉन्च केला होता. शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आर्टिफिशियल टेक्निक वर चालतो. तसेच दुसरी सहामाही सुरू सुरू झाल्यावर सॅमसंग इंडिया आपल्या आॅन सीरीज मध्ये अजून एक स्मार्टफोन जोडणार आहे. सॅमसंग इंडिया ने स्वतः ही माहिती देत खुलासा केला आहे की कंपनी जुलै च्या पहिल्या आठवड्यात आपल्या आॅन सीरीज चा नवीन स्मार्टफोन सादर करेल.

एजेंसी कडून मिळालेल्या बातमी नुसार सॅमसंग आपल्या आॅन सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि जुलै च्या पहिल्या आठवड्यात हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येऊ शकतो. सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन आॅनलाईन प्लॅटफार्म वार उपलब्ध होईल आणि यासाठी सॅमसंग एखाद्या शॉपिंग साइट सोबत एक्सक्लूसिव सेल चा करार करेल.

सॅमसंग गॅलेक्सी आॅन सीरीज च्या या आगामी स्मार्टफोन मध्ये बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो सुपर एमोलेड टेक्निक वाला असेल. मीडिया रिपोर्ट नुसार गॅलेक्सी आॅन सीरीज चा फोन 4जीबी रॅम सह येईल आणि फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन च्या प्रोसेसर व चिपसेट ची माहिती मिळाली नाही पण बोलले जात आहे की हा फोन कंपनी च्या एक्सनॉस चिपसेट वर चालेल.

सॅमसंग हा स्मार्टफोन मीड रेंज बजट मध्ये लॉन्च करेल आणि अशा आहे की भारतात लॉन्च नंतर थोड्या वेळाने हा फोन सेल साठी उपलब्ध होईल. सॅमसंग या फोन च्या लॉन्च च्या आधी डिजीटल कॅपेंन पण सुरु करु शकते. सॅमसंग ची योजना व आॅनलाईन एक्सक्लूसिव सेल बघून असे बोलू शकतो की कपंनी आपल्या नव्या स्मार्टफोन ने शाओमी व आॅनर सारख्या चीनी कंपन्यांना टक्कर देऊ बघत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here