Samsung Galaxy S23 FE स्पेशल एडिशन स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत

Highlights

 • Special Edition फोनवर 10,000 रुपये पर्यंत ऑफर आहे.
 • हा Indigo आणि Tangerine सारखे दोन नवीन कलरमध्ये आला आहे.
 • मोबाइलमध्ये 8जीबी रॅम+256जीबी स्टोरेज मिळतो.

सॅमसंगनं 4 ऑक्टोबरला आपल्या गॅलेक्सी एस23 सीरीजचा फॅन एडिशन मोबाइल भारतात सादर केला होता. तसेच, आता दिवाळीच्या निमित्ताने कंपनीनं ह्याचे स्पेशल एडिशन (Samsung Galaxy S23 FE Special Edition) आणले आहेत. लिमिटेड स्टॉकसह दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये बाजारात आले आहेत. पुढे तुम्हाला ह्या पोस्टमध्ये फोनची संपूर्ण माहिती मिळेल.

Galaxy S23 FE Special Edition ची किंमत, उपलब्धता आणि ऑफर्स

 • सॅमसंगनं आपला हा स्पेशल एडिशन मोबाइल अधिकृत वेबसाइटवर Indigo आणि Tangerine सारख्या दोन नवीन कलर ऑप्शनसह लिस्ट केला आहे.
 • जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर हा एक्सक्लूसिव्हली अधिकृत वेबसाइट, अ‍ॅमेझॉन आणि अन्य आउटलेटवरून विकत घेता येईल.
 • डिवाइसच्या 8GB रॅम +128GB व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम +256जीबी मॉडेल 64,999 रुपयांचा आहे.
 • फोनवर मिळणारी ऑफर पाहता Galaxy S23 FE Special Edition वर 10,000 रुपयांपर्यंत बँक ऑफर आहे जी एचडीएफसी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर उपलब्ध आहे.
 • Galaxy S23 FE Special Edition घेतल्यास अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या मदतीनं 10 टक्के कॅशबॅक देखील मिळू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस23 एफई स्पेशल एडिशनचे स्पेसिफिकेशन

 • डिस्प्ले: सॅमसंग गॅलेक्सी एस23 एफई स्पेशल एडिशन मध्ये 6.4 इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 1450 निट्स ब्राइटनेस, HDR10+ सपोर्ट आणि गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन मिळते.
 • प्रोसेसर: नवीन स्पेशल एडिशन फोन Exynos 2200 चिसपेटवर चालतो. त्याचबरोबर एक्सक्लिप्स 920 जीपीयू देण्यात आला आहे.
 • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी हा 8जीबी रॅमसह 128जीबी तथा 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.
 • कॅमेरा: स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह आला आहे. ह्यात बॅक पॅनलवर 50MP चा प्रायमरी, 8MP 3x ऑप्टिकल झूम लेन्स आणि 12MP 123 डिग्री अल्ट्रावाइड लेन्स आहे. तसेच, डिवाइसच्या पंच होल नॉच मध्ये 10MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
 • बॅटरी: फोनमध्ये 25W चार्जिंग क्षमता सह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी दमदार बॅकअप देऊ शकते.
 • ऑपरेटिंग सिस्टम: हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ह्यात आणखी अपडेट पण मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here