रेडमी 7 ला मागे टाकण्यासाठी भारतात आला Nokia 4.2, शानदार फीचर्सच्या जीवावर करेल का नवीन रेकॉर्ड

HMD Global चे मालकी हक्क असणाऱ्या कंपनी Nokia ने आज आपला नवीन स्मार्टफोन Nokia 4.2 भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या ट्विटर हँडेल वर स्मार्टफोन टीज केला होता, आता हा ऑफिशियली सादर केला गेला आहे. विशेष म्हणजे नोकियाने हँडसेट नुकताच आपल्या ऑफिशल वेबसाइट वर लिस्ट केला होता.

किंमत आणि ऑफर
किंमतीबद्दल बोलायचे तर Nokia 4.2 एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. डिवाइसची किंमत 10,990 रुपये आहे. तसेच कंपनी ने Nokia 4.2 दोन कलर ऑप्शन ब्लॅक आणि स्टॅन्ड-आउट पिंक सेंड कलर मध्ये सादर केला आहे. तसेच डिवाइस आज पासून सात दिवस एक्सक्लूसिव फक्त कंपनीच्या साइट वर सेल केला जाईल. त्यानंतर 14 मे पासून हा डिवाइस दुसऱ्या रिटेल आउटलेट वर सेल साठी येईल.

लॉन्च ऑफर पाहता कंपनीच्या वेबसाइट वरून 10 जून पर्यंत हँडसेट विकत घेतल्यास 500 रुपये ऑफ मिळतील. यासाठी ग्राहकांना www.nokia.com/phones वर फोन विकत घेताना “LAUNCHOFFER” कोड वापरावा लागेल.

हे देखील वाचा: चुकून गिळला AirPod, शौचालयात आला बाहेर. आता पण चालू आहेत गाणी!

सोबत Nokia 4.2 HDFC बँक क्रेडिट व डेबिट कार्ड द्वारे ईएमआई वर विकत घेता येईल, ज्यावर ग्राहकांना 10% चा कॅशबॅक मिळेल. सोबत वोडाफोन आणि आइडिया सब्सक्राइबर्सना 2,500 इन्स्टंट कॅशबॅक (50 रुपयांचे 50 वाउचर) मिळेल. वाउचरचा वापर 199 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज केल्यावर करता येईल.

Nokia 4.2 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Nokia 4.2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 5.71-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 720X1520 पिक्सल आहे. तसेच स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. सोबत फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिवाइस मध्ये 3जीबी रॅम+32जीबी इंटरनल स्टोरेज कॉम्बिनेशन आहे. सोबत डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 400जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा: एयरटेल ने अपडेट केला आपला हे शानदार पोस्टपेड प्लान्स, आता मिळेल अनलिमिटेड डेटा आणि फ्री वॉइस कॉलिंग

तसेच फोन मध्ये फोटोग्राफी साठी मागे 13-मेगापिक्सल + 2-मेगापिकक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी यात 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सोबत फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली. इतकेच नव्हे तर फोन ऑउट ऑफ द बॉक्स ऐंड्रॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here