सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोन खरेदी बद्दल सर्व उत्साही आहेत, मात्र याची किंमत जास्त असल्यामुळे हा सगळे खरेदी करू शकत नाहीत. परंतु ब्रँडची लेटेस्ट किंमत कपात आणि ऑफरनंतर फोनला सहज विकत घेता येईल. ब्रँड Samsung Galaxy S24 5G वर एकूण मिळून 18,000 रुपये पर्यंतचा डिस्काऊंट आणि किंमत ड्रॉप ऑफर देत आहे. ज्याच्यानंतर किंमत लाँचच्या आधी सर्वात स्वस्त झाली आहे. चला, पुढे तुम्हाला डिव्हाईसची नवीन किंमत आणि सर्व माहिती जाणून घेऊया.
Samsung Galaxy S24 5G ऑफरची माहिती
Samsung Galaxy S24 मोबाईल तीन मेमरी ऑप्शनमध्ये सेल केला जात आहे. सर्वप्रथम ब्रँड डिव्हाईसच्या लाँच किंमतीवर 12,000 रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. हा लिमिटेड टाईमसाठी लागू होईल. त्याचबरोबर युजर्सना अॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर बेस मॉडेलपासून टॉप मॉडेल पर्यंत 5,500 रुपयांचे कुपन डिस्काऊंट मिळेल. हेच नाही तर डिव्हाईसवर 1,000 रुपयांचा इंस्टंट बँक डिस्काऊंट पण आहे. म्हणजे एकूण मिळून तुम्ही मोबाईलवर 18,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
तुम्ही ही ऑफर अॅमेझॉन प्लॅटफॉर्म लिंकवर जावून पाहू शकता. तर कंपनी वेबसाईटवर बेस मॉडेल 62,999 रुपये, मिड मॉडेल 67,999 रुपये आणि टॉप व्हेरिएंट 77,999 चा विकला जात आहे.
तुम्ही हा Samsung Galaxy S24 खरेदी करणार?
सॅमसंग एस24 सीरीजचा हा फोन आतापर्यंत ब्रँडचा लेटेस्ट प्रीमियम डिव्हाईस आहे. यात युजर्सना दमदार एक्सनॉस 2400 डेका-कोर चिपसेट, 4,000 एमएएच बॅटरी, 50 मेगापिक्सल रिअर कॅमेऱ्यासह अनेक स्पेक्स मिळतात. फोनचा कंपॅक्ट लूक पण याला जबरदस्त बनवितो. यामुळे सध्या जी डिल मिळत आहे, त्यानुसार हा चांगला पर्याय आहे.
Samsung Galaxy S24 चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: सॅमसंग गॅलेक्सी एस24 स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डायनॉमिक अॅमोलेड पॅनल आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600 निट्स पर्यंत पीक ब्राईटनेसला सपोर्ट मिळतो.
- प्रोसेसर: प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला सॅमसंग एक्सनॉस 2400 डेका-कोर प्रोसेसर लावला आहे. ज्यामुळे युजर्सना 3.1GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीड मिळते.
- कॅमेरा: सॅमसंग गॅलेक्सी एस24 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यात फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी, 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 3 एक्स ऑप्टिकल झूम असलेली 10 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी AI टेक्नॉलॉजी असलेला 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: Samsung Galaxy S24 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. याला चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जिंग पण आहे.
- ओएस: Samsung Galaxy S24 अँड्रॉईड 14 वर आधारित वनयुआय 6.1 वर आधारित आहे. त्याचबरोबर 7 वर्षांपर्यंत OS अपडेट मिळतील.