7000mAh बॅटरी आणि 8GB रॅमसह Tecno Pova Neo 3 लाँच, जाणून घ्या माहिती

Highlights

  • फोनमध्ये नवीन Turbo Mecha डिजाइन आहे.
  • डिवाइस 6.82 इंचाच्या डिस्प्लेसह येतो.
  • 16 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

टेक्नोनं आपली पोवा सीरीजचा प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन डिवाइस Tecno Pova Neo 3 लाँच केला आहे. कंपनीनं स्मार्टफोन आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करून गुपचूप लाँच केला आहे. विशेष म्हणजे ह्या डिवाइसमध्ये यूनिक डिजाइन आणि दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. पुढे आम्ही तुम्हाला पोस्टमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे.

Tecno Pova Neo 3 डिजाइन

फोनची खास बाब म्हणजे की कंपनी ह्यात नवीन Turbo Mecha डिजाइन देण्यात आली आहे. डिवाइस वेबसाइटवर Mecha Black, Amber Gold आणि Hurricane Blue सारख्या तीन कलर ऑप्शनमध्ये दिसला आहे. बॅक पॅनलवर मोठा कॅमेरा मॉड्यूल ड्युअल एलईडी फ्लॅशसह आहे. फोनमध्ये खालच्या बाजूला टेक्नो पोवा ब्रँडिंग देण्यात आली आहे.

Tecno Pova Neo 3 स्पेसिफिकेशन्स

    डिस्प्ले : टेक्नोच्या नवीन फोनमध्ये 6.82 इंचाचा आयपीएस एलसीडी एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 1640 x 720 पिक्सेल रिजॉल्यूशन, 20.5:9 अ‍ॅस्पेक्ट रेश्यो आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्लेवर पंच होल डिजाइन देखील आहे.

  • प्रोसेसर : परफॉर्मन्ससाठी MediaTek Helio G85 प्रोसेसर लावण्यात आला आहे.
  • स्टोरेज : फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आहे.
  • बॅटरी : कंपनीनं ह्यात 7000एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 18W चार्जिंगला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : डिवाइसमध्ये 16 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप ड्युअल एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता फोन अँड्रॉइड 13 आधारित HiOS 13 वर चालतो.
  • अन्य : अन्य फीचर्स पाहता फोनमध्ये ड्युअल सिम 4G, वायफाय, ब्लूटूथ, यूएसबी टाइप सी, जीपीएस, 3.5 एमएम जॅक, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स दिले जात आहेत.

Tecno Pova Neo 3 ची किंमत

Tecno Pova Neo 3 ची किंमत मात्र कंपनीनं वेबसाइटवर दिली नाही. कदाचित काही दिवसांनी ह्या फोनचे मूल्य सांगण्याचा इरादा असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here