सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही स्वरूपता वापरता येईल हा पावरफुल​ डिवाईस

सॅमसंग फॅन 9 ऑगस्ट ची वाट बघत आहेत. जेव्हा कंपनी आपला नेक्स्ट नोट डिवाईस गॅलेक्सी नोट 9 लॉन्च करणार आहे. या मोठ्या लॉन्च च्या आधी सॅमसंग ने काल जगासमोर आपले दोन हाईएंड डिवाईस पण सादर केले आहेत. सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच अंर्तराष्ट्रीय बाजारात आणले आहेत. न्यूयार्क मध्ये आयोजित एका ईवेंट च्या मंचावरून सॅमसंग ने हे दोन्ही डिवाईस सादर केले आहेत जे येत्या काही दिवसात वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4
सॅमसंग चा हा नवीन टॅबलेट डिवाईस 2 इन 1 एंडरॉयड टॅबलेट म्हणून समोर आला आहे. कंपनी ने यात ‘सॅमसंग डेएक्स’ फीचर दिला आहे ज्यामुळे हा टॅबलेट सोबतच लॅपटॉप म्हणून पण वापरता येईल. टॅब सोबत कीबोर्ड अटॅच करू शकता. डेएक्स फीचर मुळे विंडोज लॅपटॉप प्रमाणे यात पण एक साथ अनेक अॅप विंडोज ओपन करता येतात. तसेच यूएसबी पोर्ट द्वारा टॅब एस4 कोणत्याही मॉनिटरशी जोडता येतो.

गॅलेक्सी टॅब एस4 चे स्पे​सिफिकेशन्स पाहता सॅमसंग ने हा नवीन डिवाईस 2560 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या डब्ल्यूक्यूएक्सजीए सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. हा डिवाईस एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 2.35गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालतो. टॅब एस4 4जीबी रॅम सह 64जीबी आणि 256जीबी स्टोरेज वाल्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज 400जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टॅब एस4 च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या डिवाईस मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा टॅबलेट वाईफाई तसेच 4जी एलटीई दोन मॉडेल मध्ये लॉन्च झाला आहे. तसेच पावर बॅकअप साठी यात फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 7,300एमएएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब एस4 सोबतचा ‘एस पेन’ पण खुप एडवांस केलाय आहे. या द्वारे मेमो व नोट्स लिहण्यासोबतच लोकेशन, डायरेक्शन व टेक्स्ट मेसेज पण लिहून सेव पण करता येतील तसेच सेंड पण करता येतील. सॅमसंग ने आपल्या या डिवाईस मध्ये ऐकेजी द्वारा ट्यून्ड 4 स्पीकर दिले आहेत जे डॉल्बी एटमॉस चा साउंड देतात.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 ब्लॅक आणि सिल्वर कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता टॅब एस4 चा वाईफाई ओनली 64जीबी वेरिएंट 649.99 यूएस डॉलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जी भारतीय करंसी अनुसार जवळपास 44,330 रुपये आहे. तर याचा 256जीबी स्टोरेज वेरिएंट 750 डॉलर म्हणजे जवळपास 51,000 रुपयांमध्ये अमेरिकेत लॉन्च करण्यात आला आहे. कंपनी ने अजूनतरी टॅब एस4 च्या 4जी एलटीई मॉडेल ची किंमत सांगितली नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here