5 ऑगस्टला लॉन्च होईल सॅमसंगचा अनोखा फोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग पुढल्या महिन्यात 5 ऑगस्टला ‘Galaxy Unpacked’ इवेंटचे आयोजन करेल. या इवेंट मध्ये कंपनी आपल्या नवीन Galaxy Note 20 सीरीज सोबतच Samsung Galaxy Fold 2 सादर करेल, याची माहिती कंपनीने दिली आहे. याआधी माहिती समोर आली होती कि हा फोन गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंट मध्ये लॉन्च केला जाणार नाही यामागे सॉफ्टवेयर मध्ये झालेला बिघाड हे कारण होते. पण आता कंपनीने दिलेल्या माहितीमुळे हे अंदाज खोटे ठरले आहेत.

सॅमसंग UK ने ट्विटर वर एक विडियो टीजर शेयर केला आहे. या विडियो टीजर सोबत कॅप्शन लिहिण्यात आली आहे ‘A new look unfolds’ आणि सोबत शॉर्ट वीडियो मध्ये फुलपाखराचा लोगो आहे. हा बटरफ्लाई लोगो नवीन ‘मिस्टिक ब्रॉन्ज’ कलर मध्ये दिसत आहे. याआधी कंपनीने गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा आणि गॅलेक्सी बड्स लाइव पण याच रंगात दाखवले होते.

इथे बघता येईल इवेंट

सॅमसंग ग्लोबल न्यूजरूम आणि सॅमसंग.कॉम च्या माध्यमातून 5 ऑगस्टला हा इवेंट 7:30PM IST वाजता लाइव स्ट्रीम केला जाईल. या दिवशी घर बसल्या तुम्ही पण इवेंट बघू शकता. आशा आहे कि Samsung Galaxy Note 20 लाइनअप मध्ये Samsung Galaxy Note 20, Samsung Galaxy Note 20 Plus, आणि Samsung Galaxy Note 20 Ultra सादर केले जातील. तसेच या सीरीज सोबत आता Galaxy Fold 2 पण सादर होणे निश्चित आहे.

Samsung Galaxy Fold 2 चे स्पेसिफिकेशन्स

फोन मध्ये 6.2 इंचाचा एक्सटरनल डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट असलेला 7.7 इंचाचा इंटरनल डिस्प्ले आणि गॅलेक्सी नोट 20 सीरीज सारखे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. फोटोग्रफीसाठी फोन मध्ये 108 मेगापिक्सलच्या मेन सेंसर सह एक 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेंसर आणि एक 13 मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा दिला जाऊ शकतो.

अलीकडेच एका टिप्सटरने गॅलेक्सी नोट 20 सीरीजच्या किंमतीची माहिती दिली होती. या लीकनुसार Galaxy Note 20 चा बेस वेरिएंट 999 डॉलर (जवळपास 74,300 रुपये) चा असू शकतो. तसेच याच्या टॉप-एंड वेरियंट म्हणजे गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा 1299 डॉलर (जवळपास 98,000) रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here