गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे कि सॅमसंग लवकरच आपल्या नवीन एम सीरीजचे फोन लॉन्च करणार आहे. नुकतेच 91मोबाईल्स ने या फोन बद्दल अनेक नवीन खुलासे केले होते. आम्ही माहिती दिली होती कि कंपनी जानेवारीच्या शेवटी हे फोन लॉन्च करू शकते. सोबत फोनचा एक लीक फोटो पण प्रकाशित केला होता. पण तेव्हा कंपनी कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. तसेच आज सॅमसंग ने एक प्रेस रिलीज जारी करून फोन लॉन्च डेटची घोषणा केली आहे. सॅमसंग ने सांगितले कि 28 जानेवारीला हे फोन लॉन्च केले जातील. पण कंपनी ने किती मॉडेल येतील हे सांगितले नाही.
परंतु आतापर्यंत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग सुरवातीला फक्त दोन मॉडेल गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 सादर करेल. नंतर कंपनी या सीरीज मध्ये दूसरे फोन पण लॉन्च करू शकते जसे कि गॅलेक्सी एम30 आणि गॅलेक्सी एम40 इत्यादी.
अब 91मोबाईल्सने या फोन्स बद्दल आतापर्यंत अनेक खुलासे केले आहेत. नुकतीच आम्ही गॅलेक्सी एम20 ची लाइव इमेज जारी केली होती. तसेच इनवाइट नुसार कंपनी नवीन एम सीरीज मध्ये सादर केले जाणारे तीन फोन आपल्या वेबसाइट आणि अमेझॉन इंडिया वर सेल करेल.
आतापर्यंत आलेल्या लीक्स नुसार गॅलेक्सी एम20 मध्ये 6.13-इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते. तसेच काही दिवसांपूर्वी हा फोन ब्लूटूथ आणि वाईफाई सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला होता. आशा आहे कि डिवाइस एक्सनोस 7904 चिपसेट आधारित असेल. सोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी व 64जीबी चे दोन स्टोरेज वेरियंट असू शकतात. माहितीनुसार डिवाइस मध्ये 13-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच फ्रंटला कंपनी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देऊ शकते.
याव्यतिरिक्त आम्हाला एम सीरीज मधील सॅमसंग गॅलेक्सी ए10 ची पण काही माहिती मिळाली आहे, जयनुसार डिवाइस 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच गॅलेक्सी एम20 कंपनी 15,000 पेक्षा कमी बजेट मध्ये आणण्याचा प्लान करत आहे.