Categories: बातम्या

सॅमसंग नोट मध्ये झाला ब्लास्ट, मुंबईच्या रेस्टोरेंट मध्ये उडाला गोंधळ

ती वेळ टेक जग आणि स्मार्टफोन यूजर्स विसरले नसतील जेव्हा सॅमसंग च्या गॅलेक्सी नोट 7 मधील बॅटरीतील दोषामुळे स्मार्टफोंस मध्ये ब्लास्ट होत होते. स्मार्टफोन ब्लास्ट मुळे फक्त सॅमसंग वर डाग लागला नाही तर स्मार्टफोन यूजर्सना पण भीती वाटत होती. सॅमसंग नंतर अनेक ब्रांड्स च्या स्मार्टफोंस मध्ये आग लागण्याच्या आणि बॅटरी ब्लास्ट होण्याच्या घटना समोर आल्या आहेत आणि या घटनांमध्ये अजून एका घटनेचा समावेश झाला आहे. ही घटना मुंबईतली आहे जिथे रेस्टोरेंट जेवण जेवत असलेल्या व्यक्ति च्या पॉकेट मध्ये ठेवलेला फोन ब्लास्ट झाला.

ताजी घटना मुंबईतील आहे. मागच्या सोमवारी 4 जूनला मुंबईतील एका रेस्टोरेंट मध्ये सुनिल कांते नावाचा एक व्यक्ति आपल्या मित्र सोबत जेवत होता कि अचानक त्याच्या शर्ट च्या खिश्यात ठेवलेल्या फोन मध्ये आग लागली. आग लगल्यावर सुनिल यांनी लगेच फोन पॉकेट मधून काढला आणि रेस्टोरेंट च्या बाहेर पळाले. काही क्षणात फोन मधील आग मुळे रेस्टोरेंट मध्ये धूर झाला आणि अचानक झालेल्या या घटनेमुळे तिथे जेवत असलेल्या लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

न्यूज एजेंसी एएनआई ने या घटनेची सीसीटीवी फुटेज शेयर केली आहे ज्यात फोन मध्ये आग लागल्यापासून रेस्टोरेंट मधील गोंधळ स्पष्ट दिसत आहे. फाइनेंशल एक्सप्रेस च्या रिपोर्ट नुसार सुनिल च्या खिशात जो फोन फुटला तो सॅमसंग चा नोट 2 डिवाईस होता. दुर्घटनेमुळे सुनिल च्या हात, छाती आणि पाया मध्ये जखम झाली आहे. रिपोर्ट नुसार या घटनेमुळे सुनिल इतके घाबरले की त्यांनी आपल्या फोन ची बॅटरी पुन्हा ब्लास्ट होईल म्हणुन तिथेच टाकली.

तर दुसरीकडे या घटनेचे माहिती मिळताच सॅमसंग ने विधान केले आहे की कंपनी ने या घटनेचा तपास केला आहे आणि त्यातून समोर आले आहे की सुनिल फोन सोबत कंपनी च्या आॅरिजनल एक्सेसरीज वापरता नव्हते. सॅमसंग कडून अजूनपर्यंत आगीचे कारण सांगण्यात आले नाही तसेच या घटनेचा तपास चालू आहे.

Published by
Siddhesh Jadhav