nfinix GT 20 Pro ची भारतातील लाँचची तारीख, किंमत रेंज आणि स्पेसिफिकेशन, बाजारात येण्याआधी जाणून घ्या माहिती

इनफिनिक्स भारतात ‘GT Verse‘ ची सुरुवात करणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की ते भारतात आपला नवीन स्मार्टफोन Infinix GT 20 Pro आणि पावरफुल लॅपटॉप Infinix GT Book लाँच करेल. पुढे तुम्ही या अगामी इनफिनिक्स मोबाईल जीटी 20 प्रो ची लाँचची तारीख, किंमत व स्पेसिफिकेशनची माहिती वाचू शकता.

Infinix GT 20 Pro भारतातील लाँचची माहिती

इनफिनिक्स जीटी 20 प्रो 21 मे ला भारतात लाँच होईल. या दिवशी एक वचुर्अल कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल ज्याच्या मंचावरून फोनची किंमत व सेलची माहिती सांगितली आहे. या दिवशी फोनचे स्पेसिफिकेशनवरून अधिकृतपणे पडदा उठविला जाईल. Infinix GT 20 Pro भारतातील लाँच ब्रँडच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहिले जाऊ शकते.

Infinix GT 20 Pro भारतातील किंमत

इनफिनिक्स जीटी 20 प्रो सौदी अरेबियामध्ये पहिला सादर करण्यात आला आहे. तसेच मार्केटमध्ये हा फोन दोन व्हेरिएंट्समध्ये विकला जात आहे ज्यामध्ये 8GB RAM + 256GB Storage तसेच 12GB RAM + 256GB Storage चा समावेश आहे. तसेच भारतीय किंमत पाहता भारतात Infinix GT 20 Pro 25 हजार रुपयांच्या रेंज मध्ये लाँच केला जाऊ शकतो. फोनची प्रारंभिक किंमत 22,999 रुपये असू शकते.

Infinix GT 20 Pro स्पेसिफिकेशन

  • मीडियाटेक डाईमेंसिटी 8200 अल्टीमेट
  • 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • 108 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
  • 6.78″ 144 हर्ट्झ अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • 45 वॉट 5,000 एमएएच बॅटरी

परफॉर्मन्स : सौदी अरेबियामध्ये हा फोन अँड्रॉईड 14 ओएसवर लाँच झाला आहे जो ब्रँडच्या एक्सओएस 14 सह मिळून चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 8200 अल्टीमेट ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.1 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.

मेमरी : इनफिनिक्स जीटी 20 प्रो सौदी प्रमाणे भारतीय बाजारात पण 8 जीबी रॅम तसेच 12 जीबी रॅम मध्ये आणला जाऊ शकतो. फोनमध्ये 12 जीबी वचुर्अल रॅम मिळण्याची शक्यता आहे जो फिजिकल रॅमसह मिळून याला 24 जीबी रॅम पर्यंतची पावर प्रदान करेल.

स्क्रीन : Infinix GT 20 Pro मध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जो 144 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो. या फोनमध्ये 2340 हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंग, 1300 निट्स ब्राईटनेस तसेच इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेन्सर पण मिळण्याची शक्यता आहे.

बॅक कॅमेरा : इनफिनिक्स जीटी 20 प्रो चे जागतिक मॉडेल फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे ज्याच्या सोबत 2 मेगापिक्सलचे दोन इतर सेन्सर पण आहे.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी Infinix GT 20 Pro 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. आशा आहे की भारतात पण युजर्स हाय पावर फ्रंट कॅमेरा मिळेल.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी यात 45 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या फोनमध्ये पीडी 3.0 तसेच हायपर चा​र्ज मोड सारखे फिचर्स पण मिळतात.

इतर फिचर्स : इनफिनिक्स जीटी 20 प्रो स्मार्टफोनमध्ये JBL ड्युअल स्पिकर्स देण्यात आले आहेत. गेमिंगसाठी फोनमध्ये इन-गेम वाईब्रेशन तसेच एक्स-अ‍ॅक्सिस लाईन मोटर सारखे पर्याय आहेत. हा फोन वाय-फाय 6, एनएफसी तसेच आयआर ब्लास्टला पण सपोर्ट करतो. सौदी अरेबियामध्ये हा फोन IP54 रेटिंगसह आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here