POCO F6 5G स्मार्टफोनची लाँचची तारीख झाली कंफर्म, टिझरमध्ये पाहा कसा आहे लूक

पोकोने आपल्या एफ 6 सीरिजच्या नवीन स्मार्टफोन POCO F6 5G ला लाँच करण्याची घोषणा केली आहे कंपनीने ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर डिव्हाईसचा टिझर करत याची लाँचची तारीख आणि लूक पडदा उठविला आहे. आशा केली जात आहे की स्मार्टफोनला मिड बजेट सेगमेंटमध्ये भारतात एंट्री मिळेल. चला, पुढे सादर होण्याची तारीख, वेळ, डिझाईन आणि संभावित स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

POCO F6 5G भारतातील लाँचची तारीख आणि डिझाईन

 • नवीन स्मार्टफोन POCO F6 5G भारतीय बाजारात 23 मे ला लाँच केला जाईल. या सीरिजचा सामान्य मॉडेल आहे यात प्रो मॉडेलला जागतिक बाजारात एंट्री मिळेल. तसेच, भारतात POCO F6 Pro 5G व्हर्जन येईल की नाही याची माहिती अजून स्पष्ट नाही.
 • लाँचची वेळ पाहता POCO F6 Series डिव्हाईसला सायंकाळी 4:30 वाजता जागतिक स्तरावर लाँचच्या माध्यमातून एंट्री दिली जाईल.
 • टिझरमध्ये POCO F6 5G डिव्हाईसला गोल्डन कलरमध्ये दर्शविले आहे. बॅक पॅनलवर ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप OIS आणि एलईडी फ्लॅशसह दिसला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार असल्याचे कंफर्म केले आहे.
 • डिव्हाईसच्या बॅक पॅनलवर ही पोकोच्या ब्रँडिंग पण पाहिली गेली आहे. तसेच उजव्या साईडवर वॉल्यूम बटन आहे.

POCO F6 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

 • डिस्प्ले: POCO F6 5G फोनमध्ये 6.67-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 1.5K रिजॉल्यूशन, 2,160Hz PWM डिमिंग, 2,400 निट्स पीक लोकल ब्राईटनेस, गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन मिळण्याची शक्यता आहे.
 • प्रोसेसर: POCO F6 मध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट दिली जाऊ शकते.
 • स्टोरेज: डेटा सेव्ह करण्यासाठी मोबाईलमध्ये 12 जीबी रॅम +256 जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
 • कॅमेरा: फोनमध्ये सेल्फी घेण्यासाठी युजर्सना 20MP चा लेन्स मिळू शकते. तर रिअर पॅनलवर OIS सह 50MP IMX882 सेन्सर आणि 8MP चा अल्ट्रावाईड लेन्स लावली जाऊ शकते.
 • बॅटरी: POCO F6 मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची गोष्ट समोर आली आहे.
 • इतर: डिव्हाईसमध्ये स्टीरियो स्पिकर, धूळ आणि पाण्यापासून वाचणारी IP64 रेटिंग, वाय-फाय 6e, ब्लूटूथ 5.4 आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक फिचर्स दिले जाऊ शकतात.
 • ओएस: नवीन पोको फोनला अँड्रॉईड 14 आधारित HyperOS वर आधारित ठेवला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here