5G SIM - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Oct 2022 11:26:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सावधान! 5G अपग्रेडच्या नावाखाली होतेय फसवणूक, अशाप्रकारे करा स्वतःचा बचाव https://www.91mobiles.com/marathi/5g-scam-fraud-alert-4g-sim-card-to-5g-sim-upgrade-details/ https://www.91mobiles.com/marathi/5g-scam-fraud-alert-4g-sim-card-to-5g-sim-upgrade-details/#respond Wed, 12 Oct 2022 11:26:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13920 5G Services in India आता सत्यात आली आहे, एयरटेल देशात सर्वप्रथम आठ शहरांमध्ये 5जी सेवा सुरु केली आहे. तर Jio नं भारतातील 4 शहरातील ग्राहकांना 5G Network चा अनुभव देण्यास सुरुवात केली आहे. मोबाइल युजर्स देखील या नवीन 5जी टेक्नॉलॉजी बद्दल खूप उत्सुक आहेत तसेच लोक आपल्या मोबाइल फोन्समध्ये 5जी वापरण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. […]

The post सावधान! 5G अपग्रेडच्या नावाखाली होतेय फसवणूक, अशाप्रकारे करा स्वतःचा बचाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Services in India आता सत्यात आली आहे, एयरटेल देशात सर्वप्रथम आठ शहरांमध्ये 5जी सेवा सुरु केली आहे. तर Jio नं भारतातील 4 शहरातील ग्राहकांना 5G Network चा अनुभव देण्यास सुरुवात केली आहे. मोबाइल युजर्स देखील या नवीन 5जी टेक्नॉलॉजी बद्दल खूप उत्सुक आहेत तसेच लोक आपल्या मोबाइल फोन्समध्ये 5जी वापरण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. परंतु 5जी सर्व्हिस सुरु होताच भारतात 5G Fraud देखील समोर येऊ लागला आहे. 5G sim upgrade च्या नावाखाली लोकांची फसवणूक होत आहे आणि याबाबत एक चेतावणी सायबर पोलिसांनी देखील जारी केली आहे.

5G SIM Fraud ची बातमी गुरूग्राममधून समोर आली आहे जिथे सायबर पोलिसांनी लोकांना 5जीच्या नावावर होत असलेल्या फसवणुकीबाबत लोकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. 5जी सर्व्हिस लाँच होताच यासंबंधित फ्रॉड देखील समोर येऊ लागले आहेत. गुरूग्राम सायबर पोलीस सेलनं मोबाइल युजर्सना सायबर गुन्हेगारांपासून वाचण्याची चेतावणी देत म्हटलं आहे की काही फ्रॉड लोक 4G SIM ला 5G SIM Card वर अपग्रेड करण्याच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक करत आहेत. हे देखील वाचा: Airtel 5G vs Jio 5G: निकाल आला समोर; कोणत्या कंपनीचं 5G आहे सर्वात फास्ट, जाणून घ्या

5g scam Fraud alert 4g sim card to 5g sim upgrade details

5जीच्या नावाखाली फसवणूक

5जी सिम फ्रॉडबद्दल लोकांना जागृत केलं जात आहे. काही scammer 4जी सिम कार्ड 5जी सिमवर अपग्रेड करण्याच्या नावाखाली मोबाइल युजर्सना फसवत आहेत. काही ठिकाणी टेलीकॉलिंगच्या माध्यमातून लोकांना कॉल्स केले जात आहेत तसेच त्यांना त्यांचं सिम कार्ड 5जीवर अपग्रेड केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या अपग्रेडेशनसाठी त्या लोकांच्या मोबाइल फोन्सवर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जात आहे जो सांगितल्यानंतर मोबाइल नंबरशी लिंक बँक अकांउटमधून पैसे डेबिट होत आहेत.

How to get 5g service on 4g sim

फोनमध्ये ओटीपीच्या माध्यमातून फ्रॉड करण्यासोबतच सायबर गुन्हेगार मोबाइल युजर्सना 5जी अपग्रेडची लिंक देखील पाठवत आहेत. या लिंक्सवर क्लिक करताच लोकंचे स्मार्टफोन्स हॅक केले जात आहेत. मोबाइल फोन हॅकिंगच्या माध्यमातून त्यातील कॉन्टेक्टस तसेच मेसेजचा अ‍ॅक्सेस या स्कॅमर्सना मिळतो ज्याच्या माध्यमातून बँक अकांउट डिटेल मिळवले जातात आणि त्यातील पैसे काढले जातात. हे देखील वाचा: OnePlus च्या तोडीचा स्मार्टफोन येतोय भारतात; खिशाला परवडणाऱ्या किंमतीत POCO F5 येणार बाजारात

5G upgrade चे हे सर्व ओटीपी, एसएमएस तसेच लिंक टेलीकॉम कंपन्यांच्या नावानं पाठवले जात आहेत आणि त्यामुळे मोबाइल युजरसाठी धोका वाढला आहे. यापासून बचाव करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला मोबाइलवर आलेला ओटीपी न देण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच 5G अपग्रेडसाठी कोणत्याही लिंक क्लिक करण्याची गरज नाही. तुमच्या मोबाइलवर 5G वापरण्यासाठी सिम कार्ड अपग्रेड करण्याची गरज नाही असं कंपन्यांनी देखील सांगितलं आहे. जुनं 4G सिम 5G फोनमध्ये टाकून तुम्ही ज्या शहरांमध्ये 5G उपलब्ध झालं आहे तिथे ते वापरू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post सावधान! 5G अपग्रेडच्या नावाखाली होतेय फसवणूक, अशाप्रकारे करा स्वतःचा बचाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-scam-fraud-alert-4g-sim-card-to-5g-sim-upgrade-details/feed/ 0
कसं असेल 5G SIM आणि कशाप्रकारे तुमचा मोबाईल नंबर होईल 5जी मध्ये पोर्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/5g-sim-in-india-5g-data-plan-price-internet-speed-and-5g-service-in-4g-sim/ https://www.91mobiles.com/marathi/5g-sim-in-india-5g-data-plan-price-internet-speed-and-5g-service-in-4g-sim/#respond Tue, 26 Jul 2022 12:57:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11729 लोकांनी 5G phones तर घेतले आहेत परंतु 5G Network आल्यावर 5G SIM कसं मिळेल? तसेच नवीन 5जी SIM Card वर तुमचा जुना नंबर कशाप्रकारे वापरता येईल, हा मोठा प्रश्न आहे.

The post कसं असेल 5G SIM आणि कशाप्रकारे तुमचा मोबाईल नंबर होईल 5जी मध्ये पोर्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G in India चं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. आज म्हणजे 26 जुलैला भारतात 5G Spectrum Auction सुरु होईल त्यानंतर Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea समवेत अनेक दिग्गज टेक कंपन्यांना 5G Service रोलआउट करण्यास परवानगी मिळेल. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर सर्व कंपन्यांमध्ये सर्वप्रथम 5जी नेटवर्क सादर करण्याची स्पर्धा सुरु होईल. 5जी फोन आधीच बाजारात उपलब्ध आहेत आणि सर्व्हिस सुरु होताच लोकांना सुपर फास्ट 5G Internet ची मजा घेता येईल. अनेक लोकांनी 5G phones तर घेतले आहेत परंतु 5जी नेटवर्क आल्यावर 5G SIM कसं मिळेल? तथा नवीन 5जी सिम कार्डवर आपला जुना नंबर कशाप्रकारे वापरता येईल, असा प्रश्न पडला आहे. जर तुम्हाला देखील 5G SIM Card बद्दल कुतूहल असेल तर पुढे आम्ही 5जी सिमसंबंधित प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

कसं असेल 5G SIM?

सध्या बाजारात 2G, 3G आणि 4G तिन्ही प्रकारचे सिम कार्ड आहेत. फीचर फोन्समध्ये 2G सिम वापरलं जात आहे तर स्मार्टफोन युजर्स 3G आणि 4G दोन्हीप्रकारचे सिम कार्ड वापरत आहेत. विशेष म्हणजे 5G SIM देखील सध्याच्या 4G SIM सारखंच असेल तसेच त्याचा आकार बदलला जाणार नाही. इतकेच नव्हे तर तुम्ही आता ज्या कंपनीचं 4G सिम वापरत असाल ते 5G नेटवर्कवर देखील ऑपरेट करू शकेल. याची माहिती आम्ही पुढे दिली आहे.

कोणत्या मोबाईल फोन्समध्ये वापरता येईल 5G SIM?

5G सिम तुम्ही फक्त 5G फोनवरच वापरू शकाल. इंटरनेटवर अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत ज्यात असा दावा केला जात आहे की 4जी मोबाईलमध्ये देखील 5जी सिम वापरता येईल. परंतु अश्या दाव्यात तथ्य नाही. या व्हिडीओजमध्ये यह सांगण्यात आलं आहे की जेव्हा 4G लाँच झालं होतं तेव्हा 4G सिम 2G आणि 3G फोनमध्ये देखील वापरता येतं होतं, जे साफ खोटं आहे. 2G फोनमध्ये 4जी सिम वापरल्यास त्यावर सर्व्हिस 2G ची मिळत होती. तसेच JIO सिम 2G किंवा 3G फोनमध्ये तर चालतच नव्हतं. कारण एयरटेल, वोडाफोन आणि आयडिया सारख्या कंपन्या 4G सह 2G आणि 3G सर्व्हिस देखील देत होत्या परंतु जियोकडे फक्त 4G सर्व्हिस होती. 5G साठी देखील अशीच सर्व्हिस मिळेल. तुम्ही 4G फोनमध्ये 5G सिम टाकू शकाल परंतु सर्व्हिस 4G ची मिळेल. आणि JIO ची 4G सर्व्हिस आहे त्यामुळे यावेळी Airtel आणि VI सह जियोचं 5G SIM देखील 4G फोनमध्ये 4G सर्व्हिस देईल.

4G SIM वरच 5G सर्व्हिस मिळणार की नवीन SIM घ्यावं?

आज स्मार्टफोन युजर्ससाठी हा सर्वात मोठा प्रश्न आहे की 4G सिमवरच 5G सर्व्हिस मिळेल की यासाठी नवीन SIM घ्यावं लागेल? स्पष्ट सांगायचं झालं तर याचं उत्तर ऑपरेटरवर अवलंबुन असेल. कारण SIM मध्ये काही विशेष टेक्नॉलॉजी तर नसते. सिमच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एक यूनिक ID दिला जातो आणि त्या ID नुसार तुमच्या नंबरवर प्लॅन अ‍ॅक्टिव्ह केला जातो.

याबाबत जास्त माहितीसाठी आम्ही भारतातील प्रसिद्ध मोबाईल इंजीनियर अर्शदीप सिंह निप्पी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मजेशीर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की “ 4G SIM वर 5G सर्व्हिस दिली जाऊ शकते, जर SIM फ्यूचर रेडी असेल तर नवीन SIM ची गरज पडणार नाही. जर SIM फ्यूचर रेडी नसेल तरी देखील ऑपरेटर्स OTA अपडेटच्या माध्यमातून ते अपग्रेड करू शकतात.”

त्यांच्या मते “सिम तर फक्त आयडेंटिटी नंबर असतो. यात जास्त काही टेक्नॉलॉजी नसते. जर सिममध्ये टेक्नॉलॉजी असती तर सिम नसलेले फोन जे फक्त e-SIM वर चालतात त्यांना कशी 2G, 3G, 4G किंवा 5G सर्व्हिस मिळाली नसती.”

ते पुढे म्हणाले की “आधी सिम सोबत टूलकिट येत असे ज्यामुळे ते कोणत्याही नेटवर्कवर सहज अपग्रेड करता येत होतं. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते आता हटवण्यात आलं आहे. तरीही ऑपरेटर्सना 2G, 3G किंवा 4G सिमवर 5G सर्व्हिस देताना जास्त त्रास होणार नाही फोनमध्ये फक्त नेटवर्क बँडचा सपोर्ट असणं आवश्यक आहे.”

फोनमध्ये कशाप्रकारे वापरता येईल 5जी सर्व्हिस?

ज्या मोबाईल युजर्सनी 5G Smartphone विकत घेतले आहेत, त्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जर ऑपरेटर्सनी ठरवलं तर मोबाईल फोनमध्ये 5जी वापरण्यासाठी वेगळं 5G SIM घ्यावं लागणार नाही. ग्राहक आपल्या 4जी सिमवरच 5जी नेटवर्कशी कनेक्ट करू शकतील तसेच त्यावर सुपर फास्ट 5जी इंटरनेट देखील वापरू शकतील. विशेष म्हणजे 5जी नेटवर्कसाठी Jio, Airtel किंवा Vi च्या कोणत्याही ग्राहकाला आपलं सिम किंवा मोबाईल नंबर पोर्ट करावा लागणार नाही.

4G सिम 5G मध्ये पोर्ट करावं लागेल का?

इथे एक बाब स्पष्ट सांगणं आवश्यक आहे की वर सांगितल्याप्रमाणे 4G SIM फक्त 5G SIM मध्ये कन्वर्ट होईल, परंतु त्यात लगेच 5जी इंटरनेट वापरता येणार नाही. जर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर 5जी सर्व्हिस हवी असेल तर तुम्हाला वेगळे 5G Plans विकत घ्यावे लागतील, म्हणजे 5G Pack मध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सनुसार तुम्हाला 5जी सर्व्हिस मिळेल. कोणताही 5जी प्लॅन विकत घेण्याआधी तुमचं सिम 5जीवर अपग्रेड झालंय का तसेच ते 5जी फोनमध्ये आहे का याची खात्री करून घ्या. त्याचबरोबर तुमच्या परिसरात 5जी सर्व्हिस सुरु झाली आहे का, हे देखील तपासून घ्या.

The post कसं असेल 5G SIM आणि कशाप्रकारे तुमचा मोबाईल नंबर होईल 5जी मध्ये पोर्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-sim-in-india-5g-data-plan-price-internet-speed-and-5g-service-in-4g-sim/feed/ 0