OnePlus च्या तोडीचा स्मार्टफोन येतोय भारतात; खिशाला परवडणाऱ्या किंमतीत POCO F5 येणार बाजारात

POCO F5 India Launch Price Specifications Details

शाओमी आपल्या सब ब्रँड पोकोच्या एफ सीरिज अंतर्गत कमी किंमतीत वनप्लस सारख्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना टक्कर देतील असे हँडसेट सादर करते. यातील POCO F4 5G Phone भारतात 23,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे, जो Qualcomm Snapdragon 870 चिपसेट, 64MP camera, 120Hz AMOLED डिस्प्ले तसेच 67W Sonic Charging सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. शक्तिशाली पोको एफ4 5जी च्या यशानंतर आता कंपनी या स्मार्टफोनचा उत्तराधिकारी POCO F5 लाँच करण्याची तयारी करत आहे. पोको एफ5 स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट झाला आहे, लवकरच पोको एफ5 भारतात लाँच होईल.

POCO F5 India Launch

पोको एफ5 स्मार्टफोन IMEI database मध्ये स्पॉट करण्यात आहे जिथे हा मोबाइल फोन 23013RK75G आणि 23013PC75I मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. यातील एक मॉडेल ग्लोबल व्हर्जन तर दुसरा मॉडेल इंडियन व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे सर्टिफिकेशन समोर आल्यानंतरPOCO F5 स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, तसेच दुसरीकडे कंपनी पोको एफ5 ग्लोबल मंचावर सादर केल्यानंतर जास्त वेळ न दवडता भारतीय बाजारात देखील सादर करेल, अशी चर्चा देखील सुरु झाली आहे. हे देखील वाचा: Jio आणि Airtel चं साम्राज्य धोक्यात! Adani कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं लायसन्स

POCO F5 India Launch Price Specifications Details

POCO F5 Specifications

पोको एफ5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, समोर आलेल्या माहिती व लीक्स नुसार हा मोबाइल फोन 2के अ‍ॅमोलेड डिस्प्लेवर लाँच केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. या फोनच्या स्क्रीन मध्ये 1000निट्स ब्राइटनेस दिली जाऊ शकते. तसेच लीकनुसार प्रोसेसिंगसाठी POCO F5 मध्ये सर्वात दणकट Qualcomm Snapdragon 8+ Gen1 processor दिला जाईल. हा पोको फोन 12जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो.

POCO F4 5G चे स्पेसिफिकेशन्स

जाता जाता पोको एफ4 5जी वर देखील एक नजर टाकूया. हा स्मार्टफोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ ई4 अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 395पीपीआय तसेच 1300निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा पोको फोन एड्रेनो 650 जीपीयूला सपोर्ट करतो. POCO F4 5G फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन 3जीबी पर्यंतच्या अ‍ॅडिशनल टर्बो रॅमसह येतो. हे देखील वाचा: Jio चा टेंशन वाढलं! BSNL नं आणला भन्नाट प्लॅन; स्वस्तात 30 दिवसांसाठी डेली 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग

POCO F5 India Launch Price Specifications Details

फोटोग्राफीसाठी पोको एफ4 5जी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तथा 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी POCO F4 5G फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी पोको एफ4 5जी फोन 4,500mAh Battery ला सपोर्ट करतो जी 67W sonic charging टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here