Amazon Prime Video - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 27 Apr 2023 10:07:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-plan-price-hike-in-india-prime-video-rate-increase/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-plan-price-hike-in-india-prime-video-rate-increase/#respond Thu, 27 Apr 2023 10:07:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20525 Amazon नं आपल्या भारतीय युजर्सना झटका दिला आहे. कंपनीनं आपल्या Prime Membership ची किंमत वाढवली आहे आणि आपल्या सर्व्हिसेज महाग केल्या आहेत. याआधी डिसेंबर 2021 मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वार्षिक प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती आणि आता कंपनीनं आपल्या मासिक प्लॅनचा रेट देखील वाढवला आहे. नवीन किंमतीनंतर Prime Video वर चित्रपट व वेब सीरीज बघणं […]

The post Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Amazon Prime Membership महागली आहे.
  • 1 महिना आणि 3 महिन्यांच्या प्लॅनची किंमत वाढवण्यात आली आहे.
  • Prime Video वर फिल्म व सीरीज पाहणं महाग झालं आहे.

Amazon नं आपल्या भारतीय युजर्सना झटका दिला आहे. कंपनीनं आपल्या Prime Membership ची किंमत वाढवली आहे आणि आपल्या सर्व्हिसेज महाग केल्या आहेत. याआधी डिसेंबर 2021 मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वार्षिक प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती आणि आता कंपनीनं आपल्या मासिक प्लॅनचा रेट देखील वाढवला आहे. नवीन किंमतीनंतर Prime Video वर चित्रपट व वेब सीरीज बघणं महाग होईल.

किती महागले अ‍ॅमेझॉन प्राइम प्लॅन्स

नवीन अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लॅन प्राइस

  • Monthly Prime (1 महिना) = 299 रुपये
  • Quarterly Prime (3 महिने) = 599 रुपये
  • Annual Prime Lite (12 महिने) = 999 रुपये
  • Annual Prime (12 महिने) = 1499 रुपये

हे देखील वाचा: Realme C53 लवकरच होऊ शकतो लाँच; NBTC वर झाला सर्टिफाइड

जुना अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लॅन प्राइस

  • Monthly Prime (1 महिना) = 179 रुपये
  • Quarterly Prime (3 महिने) = 459 रुपये
  • Annual Prime Lite (12 महिने) = 999 रुपये
  • Annual Prime (12 महिने) = 1499 रुपये

अ‍ॅमेझॉननं मासिक आणि तिमाही प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. 1 महिना वैधता असलेला मासिक प्लॅन आधी 179 रुपयांचा होता जो आता 299 रुपयांचा झाला आहे. तर 3 महिन्यांच्या तिमाही प्लॅनची किंमत आधी 459 रुपये होती ती आता दरवाढीनंतर वाढून 599 रुपये झाली आहे. Amazon Prime च्या वार्षिक प्लॅनची किंमत मात्र बदलण्यात आली नाही. हे देखील वाचा: आला नवीन स्वदेशी 5जी फोन; Lava Blaze 1X 5G भारतात लाँच

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप मधील फायदे

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपमध्ये प्राइम शिपिंगचा फायदा मिळतो. तसेच प्राइम व्हिडीओवर वेब सीरिज आणि चित्रपट बघता येतात. प्राइम म्युजिकच्या माध्यमातून जाहिरातरहित गाणी ऐकता येतात. तसेच प्राइम मेंबर्ससाठी खास डील्स आणि ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स, प्राइम गेमिंग, प्राइम रिडींग आणि अ‍ॅमेझॉन फॅमिलीचे बेनिफिट्स मिळतात.

The post Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-plan-price-hike-in-india-prime-video-rate-increase/feed/ 0
पुन्हा ओटीटीवर दिसणार अभिषेक बच्चनची जादू; ‘Breathe: Into the Shadows’ च्या दुसऱ्या सिझनची रिलीज डेट ठरली, पाहा ट्रेलर https://www.91mobiles.com/marathi/breathe-into-the-shadows-trailer-streaming-date-amazon-prime-video-abhishek-bachchan-amit-sadh/ https://www.91mobiles.com/marathi/breathe-into-the-shadows-trailer-streaming-date-amazon-prime-video-abhishek-bachchan-amit-sadh/#respond Thu, 27 Oct 2022 10:29:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14376 Breathe: Into the Shadows (ब्रीद: इनटू द शॅडो) च्या दुसऱ्या सीजनची वाट पाहत असलेल्या दर्शकांसाठी खुशखबर आली आहे की या शानदार वेब सीरीज (Web Series) ची रिलीज डेट (Breathe: Into the Shadows Release Date) सोबतच ट्रेलर (Breathe: Into the Shadows Trailer) व टीजर देखील जारी करण्यात आला आहे. या साइकोलॉजिकल थ्रिलरमध्ये पुन्हा एकदा अभिषेक बच्चन […]

The post पुन्हा ओटीटीवर दिसणार अभिषेक बच्चनची जादू; ‘Breathe: Into the Shadows’ च्या दुसऱ्या सिझनची रिलीज डेट ठरली, पाहा ट्रेलर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Breathe: Into the Shadows (ब्रीद: इनटू द शॅडो) च्या दुसऱ्या सीजनची वाट पाहत असलेल्या दर्शकांसाठी खुशखबर आली आहे की या शानदार वेब सीरीज (Web Series) ची रिलीज डेट (Breathe: Into the Shadows Release Date) सोबतच ट्रेलर (Breathe: Into the Shadows Trailer) व टीजर देखील जारी करण्यात आला आहे. या साइकोलॉजिकल थ्रिलरमध्ये पुन्हा एकदा अभिषेक बच्चन आणि अमित साध महत्वाच्या भूमिकेत दिसतील. पुढे आम्ही तुम्हाला माहिती शो कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल, याची माहिती दिली आहे. तसेच आर्टिकलमध्ये तुम्ही या वेब सीरीजचा ट्रेलर देखील बघू शकता.

Breathe: Into the Shadows रिलीज डेट आणि प्लॅटफॉर्म

Abhishek Bachchan आणि Amit Sadh ची धमाकेदार वेब सीरीज पुढील महिन्यात 9 नोव्हेंबर 2022 ला रिलीज होणार आहे. यावेळी देखील वेब सीरीज पहिल्या सिझन प्रमाणे Amazon Prime Video वर येईल. तसेच ही सीरीज मयंक शर्मानं दिग्दर्शित केली आहे. हे देखील वाचा: बजेट फ्रेंडली Realme 10 Series चा लाँच कन्फर्म! लाँच पूर्वीच लीक झाले स्पेसिफिकेशन्स

पाहा Breathe: Into the Shadows Trailer

https://www.instagram.com/reel/CkNQyHFDlDM/?utm_source=ig_web_copy_link

‘ब्रीद इन टू द शॅडो ’ (Breathe: Into the Shadows New Season Trailer) च्या नवीन सीजनच्या ट्रेलरवरून स्पष्ट झालं आहे की यावेळी गोष्ट अजून रहस्यमयी होईल. शॅडो आणखी जास्त डार्क होता जात आहे. तसेच यावेळी पुन्हा एकदा कबिर सावंत आणि अविनाश एकमेकांशी भिडताना दिसतील. परंतु अभिषेक आणि अमित व्यतिरिक्त या नवीन सीजनमध्ये आणखी नवीन कलाकार देखील आपलं टॅलेंट दाखवतील.

https://www.instagram.com/p/Cjzx6mErc9V/?utm_source=ig_web_copy_link

Breathe: Into the Shadows स्टार कास्ट

‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ न्यू सीजनची स्टार कास्ट पाहता अभिषेक आणि अमित व्यतिरिक्त यावेळी नित्या मेनन, सैयामी खेर आणि इवाना कौरसह अनेक कलाकार असतील. तसेच TVF च्या अनेक सीरीजमुळे प्रसिद्ध झालेले नवीन कस्तूरिया देखील या वेब सीरीजमध्ये एक महत्वपूर्ण भूमिकेत दिसतील. अरशद सैयद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजीत देशपांडे देखील असतील. सीजनमध्ये एकूण 8 एपिसोड असतील. हे देखील वाचा: Airtel चा डेट, कॉलिंग आणि SMS चा बॅलन्स असा करा चेक; इंटरनेटविना जाणून घ्या सर्व माहिती

अभिषेक बच्चनची ही काही ओटीटी प्लॅटफॉर्मवरची पाहिलंच वेळ नाही. ब्रीद: इनटू द शॅडोजच्या पहिल्या सिझन व्यतिरिक्त देखील याआधी अभिषेकचे ओटीटीवर अनेक चित्रपट व वेब सीरीज रिलीज झाली आहेत. ज्यात Ludo (Netflix), Dasvi (Netflix and JioCinemas), The Big Bull (Disney+ Hotstar) आणि Bob Biswas (ZEE5) चा समावेश आहे. बॉलिवूडमधल्या काही निवडक स्टार्स पैकी अभिषेक एक आहे ज्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या ताकदीचा अंदाज आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post पुन्हा ओटीटीवर दिसणार अभिषेक बच्चनची जादू; ‘Breathe: Into the Shadows’ च्या दुसऱ्या सिझनची रिलीज डेट ठरली, पाहा ट्रेलर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/breathe-into-the-shadows-trailer-streaming-date-amazon-prime-video-abhishek-bachchan-amit-sadh/feed/ 0
14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/#respond Fri, 01 Nov 2019 10:54:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5649 विशेष म्हणजे Vivo S5 सध्या चीनी बाजारात येईल जो येत्या काळात भारत व अन्य मार्केट्स मध्ये लॉन्च होईल.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि कंपनी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘एस सीरीज’ वाढवण्याची तयारी करत आहे आणि या सीरीज अंतर्गत लॉन्च होणारा नवीन स्मार्टफोन Vivo S5 असेल. वीवोने वीडियो टीजर जारी करत Vivo S5 च्या नावाचा खुलासा केला होता. तर आज आपल्या फॅन्सची उत्सुकता पाहून Vivo ने आपल्या आगामी स्मार्टफोन Vivo S5 ची लॉन्च डेट पण सांगितली आहे. वीवोने सांगितले आहे कि येत्या 14 नोव्हेंबरला Vivo S5 स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला जाईल.

Vivo ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर वीडियो टीजर शेयर करत Vivo S5 च्या लॉन्च डेटची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि Vivo येत्या 14 नोव्हेंबरला चीनच्या हॅन्गजौ शहरात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा आगामी स्मार्टफोन Vivo S5 टेक मार्केट मध्ये येईल. विशेष म्हणजे Vivo S5 सध्या चीनी बाजारात येईल जो येत्या काळात भारत व अन्य मार्केट्स मध्ये लॉन्च होईल.

Vivo S5

वीवो ने एस सीरीजच्या या आगामी डिवाईसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स शेयर केले नाहीत पण समोर आलेले लीक्स पाहता Vivo S5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाईल. सेल्फी साठी Vivo S5 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. Vivo S5 8 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळेल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: Xiaomi ने शेयर केले Mi Note 10 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स, 108 MP प्राइमरी कॅमेऱ्यासह असतील 5 रियर कॅमेरा सेंसर

Vivo S5 संबंधित ईमेज किंवा वीडियो समोर आले आहेत त्या वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन वेगळ्याप्रकारच्या रियर कॅमेऱ्याला सेटअप सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर डायमंड शेप लेआउट दिली जाईल ज्यात चार सेंसर असतील. या कॅमेरा सेटअपच्या खाली अजून एक सेंसर असेल, जी मॅक्रो लेंस किंवा फ्लॅश लाईट पण असू शकते. कंपनीने अजूनतरी Vivo S5 चा फोटो दाखवला नाही त्यामुळे फोनच्या डिजाईनच्या माहितीवर विश्वास ठेवता येणार नाही.

Vivo S1

भारतातील Vivo S1 बद्दल बोलायचे तर हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.38-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह येईल. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला आहे तसेच Vivo S1 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी65 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: जाणून घ्या PUBG आणि Call Of Duty पैकी कोण आहे दमदार

Vivo S1 च्या बॅक पॅनल वर एफ/ 1.78 अपर्चरचा 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/ 2.2 अपर्चर असलेली 8-मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस + एफ/ 2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी साठी Vivo S1 एफ/ 2.0 अपर्चर असलेल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo S1 मध्ये पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo S1 चे 4GB रॅम + 128GB, 6जीबी रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरीएंट क्रमश: 16,990 रुपये, 17,990 रुपये व 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/feed/ 0
फक्त 129 रुपयांमध्ये मिळेल अमेजॉन प्राइम मेंबरशिप, स्मार्टफोंस वर मिळेल सूट आणि 24 तासांत होईल डिलीवरी https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-membership-monthly-subscription-rs-129-launched-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-membership-monthly-subscription-rs-129-launched-in-marathi/#respond Fri, 22 Jun 2018 11:10:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1020 विशेष म्हणजे शॉपिंग मधील सूट सोबत अमेजॉन प्राइम मेंबर्सना प्राइम वीडियो बघण्याची आणि म्यूजिक ऐकण्याची सुविधा पण मिळते.

The post फक्त 129 रुपयांमध्ये मिळेल अमेजॉन प्राइम मेंबरशिप, स्मार्टफोंस वर मिळेल सूट आणि 24 तासांत होईल डिलीवरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया सध्या भारतात खुप प्रसिद्ध आहे. भरपुर अशे शानदार स्मार्टफोन आहेत जे फक्त अमेजॉन वरून एक्सक्लूसिव विकत घेता येतात. वेळोवेळी सेल सुरू करून अमेजॉन आपल्या यूजर्सना चांगल्या डील्स व आर्कषक डिस्काउंट वर स्मार्टफोन, गॅजेट्स तसेच अन्य सामान विकत घेण्याची संधी देतो. अमेजॉन च्या अशा सेल मध्ये अमेजॉन प्राइम मेंबर्सना एक्स्ट्रा फायदे मिळतात. हे फायदे प्रत्येक व्यक्ति पर्यंत पोहोचविण्यासाठी या ई कॉमर्स साइट ने अमेजॉन प्राइम मेंबरशिप मासिक वॅलिडिटी सह सादर केली आहे.

सर्वात आधी हे लक्षात घ्या की अमेजॉन प्राइम मेंबर असण्याचे भरपूर फायदे आहेत जर तुम्ही अमेजॉन वरून शॉपिंग करत असाल आणि काही विकत घेत असाल तर. साधारणतः अमेजॉन कोणत्याही स्मार्टफोन ची डिलीवरी करण्यास 4 ते 5 दिवसांचा वेळ घेते. पण प्राइम मेंबर्सना तोच स्मार्टफोन 24 तासांमध्ये डिलीवरी केला जातो. अशा प्रकारे प्राइम मेंबर्सना अन्य यूजर्स पेक्षा जास्त डिस्काउंट, सूट व आॅफर्स पण मिळतात.

अमेजॉन ची प्राइम मेंबरशिप आता पर्यंत 1 वर्षासाठीच देण्यात येत होती. यूजर्सना 1 वर्षाची ही प्राइम मेंबरशिप मिळण्यासाठी 999 रुपये द्यावे लागत होते. पण आता अमेजॉन ने प्राइम मेंबरशिप 1 महीनच्या अवधी साठी पण सादर केली आहे. आता फक्त 129 रुपये देऊन अमेजॉन ची प्राइम मेंबरशिप मिळवता येईल. ही मेंबरशिप त्या लोकांसाठी खुप फायदेशीर ठरेल जे 2-3 महिन्यातून एकदा शॉपिंग करतात आणि एक साथ भरपूर सामान विकत घेतात.

विशेष म्हणजे शॉपिंग मधील सूट सोबत अमेजॉन प्राइम मेंबर्सना प्राइम वीडियो बघण्याची आणि म्यूजिक ऐकण्याची सुविधा पण मिळते. अमेजॉन प्राइम वर शेकडो मूवीज व शो आहेत जे मेंबरशिप मुळे फ्री मध्ये बघता येतील. भारतात अमेजॉन प्राइम जुलै 2016 मध्ये आली होती. सुरवातीला हिची प्रमोशनल किंमत 499 रुपये प्रति वर्ष होती जी आता 999 रुपये आहे. तर अमेरिकेत अमेजॉन प्राइम च्या 1 वर्षासाठी यूजर्सना 8,000 रुपयांच्या आसपास द्यावे लागतात.

The post फक्त 129 रुपयांमध्ये मिळेल अमेजॉन प्राइम मेंबरशिप, स्मार्टफोंस वर मिळेल सूट आणि 24 तासांत होईल डिलीवरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-membership-monthly-subscription-rs-129-launched-in-marathi/feed/ 0