रियलमी कंपनीनं आपल्या Realme 9 Series मध्ये आतापर्यंत 7 स्मार्टफोन मॉडेल सादर केले आहेत जे वेगवेगळ्या बजेट व स्पेसिफिकेशन्ससह मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता आपल्या नंबर सीरीजचा विस्तार करत रियलमी लवकरच Realme 10 Series लाँच करणार आहे. रियलमी 10 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होईल आणि ज्यात realme 10, realme 10 Pro तथा realme 10 Pro+ स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात.
Realme 10 Series Launch ची माहिती रियलमी व्हीपी माधव सेठ यांनी दिली आहे. कंपनीच्या वाइस प्रेजिडेंटनं आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून सांगितलं आहे की कंपनी नोव्हेंबरमध्ये ही रियलमी 10 सीरीज टेक मार्केटमध्ये लाँच करणार आहे. सीरीज लाँचची माहिती देण्यासोबतचा माधव यांनी स्पष्ट केलं आहे की Realme 10 Series मध्ये Performance, Design आणि Display ची नवीन टेक्नॉलॉजी मिळेल. हे देखील वाचा: Airtel चा डेट, कॉलिंग आणि SMS चा बॅलन्स असा करा चेक; इंटरनेटविना जाणून घ्या सर्व माहिती
The 3 major leap-forward technologies are Performance, Design & Display ? Did you get them right? And yupp, the new #realme Number Series will be launched in Nov!! Hit the ? if you can't wait. https://t.co/CrZLrAGPr9
— realme (@realmeglobal) October 26, 2022
realme 10 Pro plus ची लीक माहिती
कंपनीनं सध्या सीरीजमध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या नावांची आणि त्यांच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मात्र दिली नाही. परंतु लीक्सनुसार रियलमी 10 प्रो प्लस सीरीजचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन असू शकतो तसेच हा रियलमी मोबाइल मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. realme 10 स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट असू शकतो, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे.
realme 10 Pro+ बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल जोडीला 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच रियलमी 10 मध्ये देखील 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते आणि स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. रियलमी 10 प्रो प्लस मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या स्क्रीन सोबतच 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो, असं लीकमधून समोर आलं आहे.
Realme 10 Series च्या अचूक लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्ससाठी अजूनही कंपनीच्या पुढील घोषणेची वाट बघावी लागेल. आशा आहे की या सीरीजची सुरुवात 13 हजार रुपयांच्या बजेटपासून सुरु होऊ शकते, तसेच सर्वात मोठ्या मॉडेलची किंमत 25 हजारांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: Video: साइड मिररविना येणार Ola Electric Car, कंपनीनं दाखवली आगामी कारची डिजाइन
Realme GT Neo 3T 5G चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी जीटी नियो 3टी स्मार्टफोन 6.62 इंचाच्या फुलएचडी+ Samsung E4 AMOLED डिस्प्लेसह लाँच केला गेला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तथा 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 5जी चिपसेट देण्यात आला आहे. या रियलमी मोबाइल 80वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो 3टी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच 4सीएम मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.