Airtel चा डेट, कॉलिंग आणि SMS चा बॅलन्स असा करा चेक; इंटरनेटविना जाणून घ्या सर्व माहिती

एकेकाळी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवरील उरलेला बॅलेन्स, डेटा आणि एसएमएसची माहिती घेण्यासाठी खूप खटपट करावी लागत होती. परंतु सध्या परिस्थिती बदलली आहे. जर तुम्ही एयटेल मोबाइल सिम युजर्स (Airtel Sim) असाल तर आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये काही सोप्या पद्धती सांगणार आहोत ज्यांच्या मदतीनं Airtel balance check करणं सहज शक्य होईल. prepaid आणि postpaid ग्राहक पुढील स्टेप्स फॉलो करून सिममधील उरलेला टॉकटाइम, डेटा, एसएमएस (talktime, data, or SMS) ची माहिती मिळवू शकतात.

Airtel चा बॅलेन्स चेक करण्याच्या पद्धती

 • USSD codes च्या मदतीनं एयरटेल बॅलेन्स चेक करता येतो.
 • Airtel Thanks app वर देखील एयरटेल बॅलेन्स चेक करता येतो.
 • Airtel official website वर देखील एयरटेल बॅलेन्स चेक करता येतो.
 • तसेच Airtel customer care number वर कॉल करूनही बॅलेन्सची माहिती मिळवता येते.

1. Airtel डेटा बॅलेन्स चेक

यूएसएसडी कोडचा वापर करून एयरटेल डेटा/इंटरनेट बॅलेन्स चेक करता येतो. यासाठी एयरटेल युजर्सना *123*10# हा नंबर डायल करावा लागेल. हा नंबर प्रीपेड ग्राहकांसाठी आहे.

2. Airtel SMS बॅलेन्स चेक

यूएसएसडी नंबर कोडचा वापर करून एसएमएस बॅलेन्स चेक करण्यासाठी एयरटेल प्रीपेड ग्राहकांना आपल्या फोनवरून *121*7# हा नंबर डायल करावा लागेल.

3. Airtel plan validity अशी करा चेक

तुमच्या एयरटेल नंबरवर प्लॅन आणि वैधता जाणून घेण्यासाठी प्रीपेड युजर्सना फोनवरून *121*2# हा नंबर डायल करावा लागेल.

4. Airtel talktime बॅलेन्स चेक असा करा

एयरटेल मेन बॅलेन्स किंवा टॉकटाइम चेक करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या फोनवरून *123# हा नंबर डायल करावा लागेल.

5. Airtel postpaid वर डेटा बॅलेन्स असा करा चेक

एयरटेल थँक्स अ‍ॅप व्यतिरिक्त, ग्राहक एयरटेल पोस्टपेड डेटा वापर जाणून घेण्यासाठी *121# नंबर डायल करू शकतात.

जाणून घ्या महत्वाचे USSD CODE

PURPOSEAIRTEL USSD CODE
Airtel main balance check*123#
Airtel number check*282#
Airtel offers*121#
Airtel talk time loan*141# or call 52141
Airtel data loan code*141# or call 52141
Airtel Miss call alert service*888#
Check Airtel Unlimited Packs*121*1#
Airtel voice or roaming packs*222#
Airtel Postpaid Current Bill Plan CheckSMS “BP” To 121
Airtel Postpaid Due/Pending Amount CheckSMS “OT” To 121
Airtel Postpaid Bill Payment CheckSMS “PMT” To 121
Airtel Postpaid Current Plan Usage CheckSMS “UNB” To 121
Airtel data balance check for 2G users*121*9#

Airtel थँक्स अ‍ॅपवर करा बॅलेन्स चेक

एयरटेल प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्स मेन बॅलेन्स, डेली डेटा, एसएमएस आणि अन्य माहिती Airtel Thanks अ‍ॅपच्या माध्यमातून देखील चेक करू शकतात.

 • सर्वप्रथम Airtel Thanks app तुमच्या डिवाइसवर Google Play Store किंवा Apple अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड करा
 • अ‍ॅप ओपन करा आणि तुमच्या एयरटेल मोबाइल नंबरचा वापर करून रेजिस्ट्रेशन करा.
 • आता अ‍ॅपवर ‘सर्व्हिसेज’ सेक्शन मध्ये जा (तुम्हाला यह सर्वात खाली डावीकडे मिळेल)
 • तुम्हाला तुमचा सक्रिय रिचार्ज, डेटा वापर, एसएमएस बॅलेन्स आणि अन्य माहिती मिळेल.
 • अ‍ॅप तुमच्या एयरटेल रिचार्ज पॅकची वैधता देखील दाखवेल.

Airtel च्या वेबसाइटवर चेक करा बॅलेन्स

 • सर्वप्रथम लिंकवर क्लिक करा किंवा Google वर एयरटेल सेल्फकेयर असा सर्च करून एयरटेल सेल्फकेयर (वेबसाइट) वर जा.
 • तुम्हाला इथे अकाऊंट बनवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या फोन नंबरवर आलेल्या ओटीपीचा वापर करून लॉग इन करू शकता.
 • लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल जो तुमच्या एयरटेल नंबर बॅलेन्स दाखवेल. तुम्ही मेन बॅलेन्स, एसएमएस बॅलेन्स, एयरटेल इंटरनेट बॅलेन्स आणि खूप काही बघू शकता.

Airtel कस्टमर केयरशी बोलून चेक करा बॅलेन्स

तुम्ही एयरटेलच्याके टोल-फ्री कस्टमर केयर नंबरच्या माध्यमातून एयरटेल डेली डेटा बॅलेन्स, टॉकटाइम आणि खूप काही बघू शकता.

 • यासाठी तुमच्या फोनवरून 121 एयरटेल कस्टमर केयर सपोर्टवर कॉल करा.
 • तुमच्या एयरटेल नेटवर्कशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी 198 डायल करा.
 • DND सर्व्हिस चालू करण्यासाठी 1909 डायल करा.
 • एयरटेल रिचार्जसाठी 123 डायल करा.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here