Android 11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 21 Sep 2020 12:12:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 खास फीचर्स सह आला ColorOS 11, बदलतील Oppo चे स्मार्टफोन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-coloros-11-announced-official-rollout-android-11-update/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-coloros-11-announced-official-rollout-android-11-update/#respond Tue, 15 Sep 2020 14:30:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8165 COLORS OS 11 च्या अपडेटची सुरवात Find X2 Series आणि Reno 3 सीरीज पासून होईल

The post खास फीचर्स सह आला ColorOS 11, बदलतील Oppo चे स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ओपो (Oppo) ने कस्टमाइज्ड ऑपरेटिंग सिस्टम (OS) कलर ओएस 11 सादर केला आहे. कलर ओएस 11, एंडरॉयड 11 (android 11 Operating system) ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे. ओपो ने “मेक लाइफ फ्लो” कॉन्सेप्ट सह ColorOS 11 सादर केला आहे. ColorOS 11 यूआई मध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले, थीम आणि वॉलपेपर सोबतच फॉन्ट, आयकॉन आणि रिंगटोन मध्ये अनेक बदल दिसतील.

या फोन्सना मिळेल अपडेट

COLORS OS 11 च्या अपडेटची सुरवात Find X2 Series आणि Reno 3 सीरीज पासून होईल, तसेच Find, Reno, F, K आणि A सीरीजच्या 28 पेक्षा जास्त मॉडेल्सना पण हा अपडेट मिळेल. लिस्टनुसार Oppo Find X2, Find X2 Pro आणि Find X2 Pro Automobili Lamborghini Edition ला 14 सप्टेंबर पासून अपडेट मिळण्यास सुरवात होईल. Reno 3 4G, Reno 3 Pro 4G आणि Oppo F17 Pro 30 ला सप्टेंबर पासून अपडेट मिळण्यास सुरवात होईल. बाकिच्या फोन्सची यादी पुढे दिलेल्या फोटो मध्ये आहे.

ColorOS 11 चे टॉप फीचर्स

थ्री-फिंगर ट्रांसलेशन: ColorOS 11 मध्ये Google Lens चा सपोर्ट आहे जो येतो थ्री-फिंगर ट्रांसलेशन सह. या फीचरच्या मदतीने तुम्ही तीन-बोटांच्या जेस्चरच्या मदतीने स्क्रीनशॉट मधील टेक्स्ट कॉपी करून ट्रांसलेशन करू शकता.

फ्लेक्स ड्रॉप फीचर: हा एक मल्टी-टास्किंग फीचर आहे ज्याच्या मदतीने यूजर एकाच वेळी वीडियो आणि टेक्स्ट बघू शकतात. हा फीचर गेमर्स आणि वीडियो बघणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे.

बॅटरी सेवचा ऑप्शन: बॅटरी जास्त वापरण्यासाठी नवीन सुपर पावर सेविंग मोडचा पर्याय आला आहे. नवीन अपडेट मध्ये यूजर्सना कमी बॅटरी झाल्यावर सहा ऍप निवडण्याच्या पर्याय मिळतो.

सिक्योरिटी: Coloros 11 मध्ये एंडरॉयड 11 चे सर्व सिक्योरिटी आणि प्राइवेसी फीचर्स मिळतात. नवीन अपडेट मध्ये यूजर्सना प्राइवेट सिस्टम बनवण्याची संधी मिळेल ज्यात ऍप आणि डेटाचा सेकंड वर्जन बनवता येतो आणि तो वेगळ्या फिंगरप्रिंट स्कॅन किंवा पासवर्डच्या माध्यमातून उघडता येतो.

बॅटरी कमी झाल्यावर मिळेल नोटिफिकेशन: हा फीचर तुमच्या फोनची बॅटरी लो झाल्यावर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला नोटिफिकेशन पाठवतो. त्यामुळे तुमच्या जवळच्या लोकांना समजते कि तुमच्या फोनची बॅटरी लो आहे.

The post खास फीचर्स सह आला ColorOS 11, बदलतील Oppo चे स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-coloros-11-announced-official-rollout-android-11-update/feed/ 0
जाणून घ्या Android 11 ‘Go’ edition म्हणजे काय आणि का आहे हा भारतीय यूजर्ससाठी खास https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-android-11-go-edition-best-features/ https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-android-11-go-edition-best-features/#respond Fri, 11 Sep 2020 15:17:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8115 एंडरॉयड 11 च्या गो एडिशनमुळे फोन मधील रॅम मेमरी 270 MB पर्यंत रिकामी राहील जी जास्त ऍप्स वापरण्यासाठी आणि गेम खेळण्याच्या कमी येईल.

The post जाणून घ्या Android 11 ‘Go’ edition म्हणजे काय आणि का आहे हा भारतीय यूजर्ससाठी खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोणत्याही देशाची एखादी मोबाईल कंपनी असो वर एखादा ब्रँड असो, सर्वांचे स्मार्टफोन्स Google च्या एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात. दरवर्षी गूगल हा ओएस अजून ऍडव्हान्स करत नवीन वर्जन घेऊन येतो आणि काही दिवसांपूर्वी शानदार फीचर्स असलेली नवीन ऑपरेटिंग सिस्टम Android 11 लॉन्च केली गेली आहे. एंडरॉयड 11 ऑफिशियल केल्यानंतर काही दिवसांनंतर गूगलने घोषणा केली आहे आहे कि कंपनी लवकरच Android 11 Go edition पण घेऊन येणार आहे. एंडरॉयडचा गो एडिशन भारतीय स्मार्टफोन्स यूजर्ससाठी अनेक बाबतीत खास आहे आणि भारतात हा मोबाईल फोन वापरण्याच्या अनुभव आणि अंदाज दोन्ही बदल्याण्यास सक्षम आहे. आज आम्ही आमच्या वाचकांसाठी हीच माहिती घेऊन आलो आहोत कि एंडरॉयड 11 गो एडिशन म्हणजे काय, हा एंडरॉयड 11 पेक्षा हा किती वेगळा आहे आणि भारतीय यूजर्सना याचा काय फायदा होणार आहे.

Go edition म्हणजे काय

काही दिवसांपूर्वी Android 11 लॉन्च झाला होता, तर आता हे Android 11 Go edition नावाने काय नवीन मार्केट मध्ये आले आहे. जर तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो कि हा एक प्रकारे एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टमचा लाइट वर्जन आहे. गूगलच्या एंडरॉयड 11 ने जेव्हा फोन अपडेट केला जातो तेव्हा काही MB ची डेटा फाइल बनते, जी सिस्टम रॅम सोबतच फोनची इंटरनल स्टोरेज पण वापरते. ओएस द्वारे वापरली जाणारी जागा खूप जास्त नसते पण एंट्री लेवल स्मार्टफोन जे 1GB किंवा 2GB RAM मेमरी आणि कमी स्टोरेज सह येतात त्यात एंडरॉयड ओएस डाउनलोड आणि इंस्टाल करणे कठीण असते.

अश्याच स्मार्टफोन्ससाठी गूगलने Android (Go edition) ची निर्मिती केली आहे. हा एंडरॉयड खास करून अश्या स्मार्टफोन्ससाठी बनवण्यात आला आहे जे 1 जीबी किंवा 2 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केले जातात. अश्या एंट्री लेवल तसेच लो बजेट स्मार्टफोन्स मध्ये एंडरॉयड ‘गो’ एडिशन डाउनलोड होण्यासाठी तसेच प्रोसेसिंगसाठी खूप कमी जागा घेतो त्याचबरोबर फोन मधील हलक्या चिपसेट वर जास्त लोड पडू देत नाही.

Android (Go edition) चे काय आहे वेगळेपण

कमी रॅम आणि हलक्या प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोन्ससाठी बनलेला एंडरॉयड ‘गो’ एडिशन मध्ये स्मूद आणि लॅग फ्री प्रोसेसिंगसाठी गूगलने या संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टमला ‘लाइट’ ऍप्सने सुसज्ज केले आहे. एंडरॉयड 11 च्या गो एडिशन वर चालणाऱ्या सर्व स्मार्टफोन्स मध्ये गूगल द्वारे बनवण्यात आलेल्या फोन ऍप्लिकेशन्सचा ‘गो’ वर्जन दिला जाईल. यात ब्राउजिंगसाठी Google Go आणि YouTube Go सोबतच Gallery Go, Camera Go, Assistant Go सारखे फीचर्स मिळतील.

एंडरॉयड गो एडिशन मध्ये सर्व Google apps काही अश्याप्रकारे डिजाईन केले जातात कि ते फोन मध्ये रॅम व स्टोरेज कमी घेतील. कमी मेमरी वापरण्यासोबतच हे ऍप्स वेगाने लोड होतात आणि चालतात. हे ऍप्स अश्याप्रकारे कस्टमाइज केले जातात कि ते वापरात असताना फोन मध्ये इंटरनेट डेटाची खपत पण कमी होते आणि फोनची बॅटरी पण कमी वापरली जाते. म्हणजे फास्ट, हेल्पफुल आणि इजी टू यूज.

फायदा काय

वरच्या माहितीवरून तुम्हाला समजले असेल कि एखद्या लो बजेट आणि एंट्री लेवल स्मार्टफोन मध्ये Android 11 Go edition असल्यामुळे काय फायदा होईल. हि ऑपरेटिंग सिस्टम डेटा सेविंग करेल आणि इंटरनेटची खपत कमी होईल. गूगलनुसार या ओएसमुळे एंट्री लेवल स्मार्टफोन मध्ये ऍप्स आधीच्या तुलनेत 15 टक्के जास्त वेगाने चालतील.

एंडरॉयड 11 च्या गो एडिशनमुळे फोन मधील रॅम मेमरी 270 MB पर्यंत रिकामी राहील जी जास्त ऍप्स वापरण्यासाठी आणि गेम खेळण्याच्या कमी येईल. त्याचप्रमाणे गो एडिशन मधील ऍप्स बेसिक वर्जनच्या तुलनेत 900 MB पर्यंत जास्त फोन स्टोरेज वाचवतात. Android 11 Go edition मध्ये कंपनीने Google Lens दिली आहे जी टेक्स्टला स्पीच मध्ये रूपांतरित करते तसेच गो एडिशन शानदार बिल्ट-इन सिक्योरिटी फीचर्स सह येतो.

The post जाणून घ्या Android 11 ‘Go’ edition म्हणजे काय आणि का आहे हा भारतीय यूजर्ससाठी खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-android-11-go-edition-best-features/feed/ 0
Android 11 झाला रिलीज, OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme च्या या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट https://www.91mobiles.com/marathi/android-11-stable-update-release-pixel-oneplus-realme-xiaomi-oppo-smartphones/ https://www.91mobiles.com/marathi/android-11-stable-update-release-pixel-oneplus-realme-xiaomi-oppo-smartphones/#respond Wed, 09 Sep 2020 09:31:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8052 यावेळी Android 11 चा स्टेबल वर्जन पिक्सल सोबतच OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme स्मार्टफोन्सना पण दिला जात आहे.

The post Android 11 झाला रिलीज, OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme च्या या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google ने जून मध्ये आपली लेटेस्ट एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम Android 11 सादर केली होती. तेव्हा एंडरॉयड 11 चा बीटा वर्जन रोलआउट झाला होता ज्यात एंडरॉयड 11 चे नवीन व एडवांस फीचर्स टेस्ट करण्याची संधी मिळाली होती. आज गूगलने अधिकृतपणे एंडरॉयड 11 लॉन्च केला आहे. नेहमी एंडरॉयड 11 चा अपडेट सर्वात आधी गूगल पिक्सल स्मार्टफोन्सना मिळतो पण यावेळी Android 11 चा स्टेबल वर्जन पिक्सल सोबतच OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme स्मार्टफोन्सना पण दिला जात आहे.

थेट त्या स्मार्टफोन्स बद्दल बोलूया ज्यांना सर्वात आधी Android 11 चा स्टेबल वर्जन मिळेल, या लिस्ट मध्ये सर्वात पहिली नावे Google Pixel 2, Google Pixel 3, Google Pixel 3A, Google Pixel 4 आणि Google Pixel 4A ची आहेत. तसेच एंडरॉयड 11 चा अपडेट सर्वात आधी मिळवणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये वनप्लसच्या OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro स्मार्टफोनचा पण समावेश असेल. वनप्लसने पण अधिकृतपणे ऑक्सिजन 11 ची घोषणा केली आहे.

त्याचप्रमाणे ओपोच्या OPPO Find X2 आणि OPPO Reno 3 ला नवीन एंडरॉयड इतरांच्या आधी मिळेल. विशेष म्हणजे येत्या 14 सप्टेंबरला ओपोने एंडरॉयड 11 आधारित नवीन कलरओएस लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त शाओमीचे Xiaomi Mi 10 आणि Xiaomi Mi 10 Pro स्मार्टफोन तसेच रियलमीचा Realme X50 Pro स्मार्टफोन त्या मोबाईल्सच्या यादीत आहे ज्यांना इतर स्मार्टफोन्सच्या आधी एंडरॉयड 11 चा लेटेस्ट अपडेट मिळेल.

Android 11

गूगलने नवीन एंडरॉयड 11 मध्ये अनेक असे फीचर्स टाकले आहेत जे स्मार्टफोन एक्सपीरियंस ऍडव्हान्स बनवतात. नवीन एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम मध्ये मोबाईल यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन एंडरॉयड 11 चे फीचर्स कंपनीने तीन भागांत विभागले आहेत ज्यात People, Control आणि Privacy चा समावेश आहे.

उदाहरणार्थ conversations मध्ये यूजर आपल्या मर्जीनुसार ठरवू शकतील कि त्यांना मेसेजिंग ऍप मध्ये कोणाशी बोलायचे आहे आणि कोणाचे मेसेज ओपन न करता नोटिफिकेशन्स मधेच ठेवायचे आहेत. कॉन्वर्सेशन फीचर्सचा वेगळा सेक्शन बनवण्यात आला आहे, ज्यात रीसीव झालेल्या मेसेजेस पैकी तुम्ही तुमच्या आवडीच्या लोकांशी बोलू शकाल. तसेच Bubbles फीचरच्या माध्यमातून मेसेज फ्लोटिंग बबल द्वारे ऍक्सेस करता येईल.

Voice Access आणि Keyboard Suggestion सारख्या फीचर्सच्या माध्यमातून स्मार्टफोन यूजर्सना मल्टी टास्किंग मध्ये मदत मिळेल. एंडरॉयड 11 मध्ये ऑन-डिवाइस विजुअल कॉर्ट्रेक्स देण्यात आला आहे जो स्क्रीन वरील कन्टेन्ट आणि कॉन्टेक्स्ट समजून कमांड्स घेऊ शकेल. तसेच Android 11 सह एक्सटर्नल Device Control फीचर्स पण सादर केला गेला आहे. आता स्मार्ट डिवाईसेज जसे कि स्मार्टटीव्ही, ब्लूटूथ हेडफोन व स्पीकर्स तसेच इतर होम अप्लाइअन्सशी तुम्ही सहज कनेक्ट करू शकाल आणि रिमोटली ते कंट्रोल पण करू शकाल.

The post Android 11 झाला रिलीज, OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme च्या या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/android-11-stable-update-release-pixel-oneplus-realme-xiaomi-oppo-smartphones/feed/ 0
Android 11 मध्ये असतील हे टॉप 5 फीचर्स, 3 जूनला येईल नवीन ओएस https://www.91mobiles.com/marathi/android-11-beta-will-be-introduced-on-3-june-know-top-5-features-working-on-google-phone/ https://www.91mobiles.com/marathi/android-11-beta-will-be-introduced-on-3-june-know-top-5-features-working-on-google-phone/#respond Thu, 07 May 2020 11:29:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7310 Google एंडरॉयड आपल्या गेल्या वर्जन पासून ऍप्लिकेशन परमिशन बदलण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे आणि हे काम एंडरॉयड 11 सोबत पण चालू राहील.

The post Android 11 मध्ये असतील हे टॉप 5 फीचर्स, 3 जूनला येईल नवीन ओएस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गूगलने Android 11 डेवलपर 4 प्रीव्यू सादर केला आहे जो Android च्या पुढल्या वर्जनसाठी अंतिम डेवलपर प्रीव्यू असल्याचे बोलले जात आहे. टेक विश्वातील दिग्गज कंपन्यांपैकी एक Google पुढल्या महिन्यापासून एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जनचा बीटा वर्जन रोल आउट करायाला सुरवात करेल. कंपनी 3 जूनला ‘Android 11: The Beta Launch Show’ नावाच्या एका ईवेंटचे आयोजन करणार आहे. हा ईवेंट ऑनलाइन भारतीय वेळेनुसार 8:30 pm वाजता सुरु होईल.

दरवर्षी गूगल आपल्या Google I/O ऍन्युअल कॉन्फ्रेंस मध्ये लेटेस्ट एंडरॉयड सादर करते. पण कोरोनावायरस पाहता कंपनीने हा ईवेंट रद्द केला होता. आता ऑनलाइन ईवेंटच्या माध्यमातून कंपनी लेटेस्ट एंडरॉयड डेव्हलपमेंटचा बीटा वर्जन सादर करेल.

यूजर्सची उत्सुकता वाढवण्यासाठी गूगलने एंडरॉयड 11 च्या काही फीचर्स आधीच सांगितले होते. एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन मध्ये यूजर सेंसिटिव डेटा आणि बेस्ट सिक्यॉरिटी फीचर दिले जातील. चला एंडरॉयड 11 मध्ये मिळणाऱ्या काही खास फीचर बाबत माहिती घेऊया.

स्क्रीन रेकॉर्डिंग

गूगल एंडरॉयड 11 मध्ये नेटिव स्क्रीन रिकॉर्डर फीचर सादर करेल. हा फीचर क्विक सेटिंग्स टॉगल मध्ये जाऊन वापरता येईल. इतकेच नव्हे तर एंडरॉयड 11 सपॉर्ट करणाऱ्या डिवाइस मध्ये जर ब्लूटूथ ऑन असेल आणि तो फ्लाइट मोड करताच आपोआप ऑफ होईल.

छोटा होईल स्क्रीनशॉट पॉप-अप

Google नवीन एंडरॉयड वर्जन सह नवीन स्क्रीनशॉट पॉप-अप फीचर सादर करेल. जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट कॅप्चार कराल तेव्हा खूप छोटा दिसेल जसा आईओएस डिवाइस वर दिसतो. स्क्रीनच्या वरच्या बाजूला एका मोठ्या पॉप-अप च्या ऐवजी स्क्रीनशॉट एक छोट्या पॉप-अप सह स्क्रीनच्या खाली डावीकडे दिसेल. यात स्क्रीनशॉट शेयर आणि एडिट करण्याचा ऑप्शन पण दिला जाईल. स्क्रीनशॉट शेअर करणे आणि हा एडिट करण्यासाठी पर्याय दिला जाईल.

कॅमेरा अपडेट

एंडरॉयड 11 मध्ये गूगल बोके मोड सुधार करण्यात आला आहे. तसेच यूजर्स कॅमेरा वापरताना रिंगटोन वाइब्रेशन, नोटिफिकेशन किंवा अलार्म म्यूट करू शकतील.

सिक्यॉरिटी होईल अपडेट

गूगलचा प्रयत्न एंडरॉयड 11 सह यूजर्सची सुरक्षा सुधारण्याचा आहे. त्यासाठी कंपनी बायोमीट्रिक्स सपोर्ट वाढवेल. यावेळी तीन ऑथेंटिकेटरना सपोर्ट दिला जाईल, ज्यात स्ट्रॉन्ग, वीक आणि डिवाइस क्रिडेंशलचा समावेश आहे. नवीन अपडेट मध्ये कोणत्याही ऍपला डिवाइस ऍक्सेस करण्याआधी ओटीपी ची गरज पडेल.

ईथरनेट टेथरिंग

Android 11 मध्ये ईथरनेट टेथरिंगच्या स्वरूपात हॉटस्पॉट आणि टेथरिंग मेनू मध्ये एक नवीन ऑप्शन मिळेल. यातून एंडरॉयड फोन वर एक यूएसबी-टू-ईथरनेट एडेप्टर कनेक्ट करून आणि पुन्हा लॅन केबल तो ऍडॅप्टर आणि पीसीला कनेक्ट करता येईल. हा एक चांगला फीचर आहे पण तेव्हा उपयोगी पडेल जेव्हा तुम्ही अश्या डेस्कटॉप वर इंटरनेट वापरात ज्यात वाई-फाई सपोर्ट नाही.

ऍप परमिशन मध्ये होईल सुधार

Google एंडरॉयड आपल्या गेल्या वर्जन पासून ऍप्लिकेशन परमिशन बदलण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे आणि हे काम एंडरॉयड 11 सोबत पण चालू राहील. एंडरॉयड 11 डेवलपर प्रीव्यू 3 मध्ये असे समोर आले होते कि काही महिन्यांपर्यंत ऍपचा वापर न केल्यास ऍपची परवानगी रद्द केली जाईल. येमुळे युजरचा डेटा कमी खर्च होईल.

The post Android 11 मध्ये असतील हे टॉप 5 फीचर्स, 3 जूनला येईल नवीन ओएस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/android-11-beta-will-be-introduced-on-3-june-know-top-5-features-working-on-google-phone/feed/ 0