कोणत्याही देशाची एखादी मोबाईल कंपनी असो वर एखादा ब्रँड असो, सर्वांचे स्मार्टफोन्स Google च्या एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात. दरवर्षी गूगल हा ओएस अजून ऍडव्हान्स करत नवीन वर्जन घेऊन येतो आणि काही दिवसांपूर्वी शानदार फीचर्स असलेली नवीन ऑपरेटिंग सिस्टम Android 11 लॉन्च केली गेली आहे. एंडरॉयड 11 ऑफिशियल केल्यानंतर काही दिवसांनंतर गूगलने घोषणा केली आहे आहे कि कंपनी लवकरच Android 11 Go edition पण घेऊन येणार आहे. एंडरॉयडचा गो एडिशन भारतीय स्मार्टफोन्स यूजर्ससाठी अनेक बाबतीत खास आहे आणि भारतात हा मोबाईल फोन वापरण्याच्या अनुभव आणि अंदाज दोन्ही बदल्याण्यास सक्षम आहे. आज आम्ही आमच्या वाचकांसाठी हीच माहिती घेऊन आलो आहोत कि एंडरॉयड 11 गो एडिशन म्हणजे काय, हा एंडरॉयड 11 पेक्षा हा किती वेगळा आहे आणि भारतीय यूजर्सना याचा काय फायदा होणार आहे.
Go edition म्हणजे काय
काही दिवसांपूर्वी Android 11 लॉन्च झाला होता, तर आता हे Android 11 Go edition नावाने काय नवीन मार्केट मध्ये आले आहे. जर तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो कि हा एक प्रकारे एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टमचा लाइट वर्जन आहे. गूगलच्या एंडरॉयड 11 ने जेव्हा फोन अपडेट केला जातो तेव्हा काही MB ची डेटा फाइल बनते, जी सिस्टम रॅम सोबतच फोनची इंटरनल स्टोरेज पण वापरते. ओएस द्वारे वापरली जाणारी जागा खूप जास्त नसते पण एंट्री लेवल स्मार्टफोन जे 1GB किंवा 2GB RAM मेमरी आणि कमी स्टोरेज सह येतात त्यात एंडरॉयड ओएस डाउनलोड आणि इंस्टाल करणे कठीण असते.
अश्याच स्मार्टफोन्ससाठी गूगलने Android (Go edition) ची निर्मिती केली आहे. हा एंडरॉयड खास करून अश्या स्मार्टफोन्ससाठी बनवण्यात आला आहे जे 1 जीबी किंवा 2 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केले जातात. अश्या एंट्री लेवल तसेच लो बजेट स्मार्टफोन्स मध्ये एंडरॉयड ‘गो’ एडिशन डाउनलोड होण्यासाठी तसेच प्रोसेसिंगसाठी खूप कमी जागा घेतो त्याचबरोबर फोन मधील हलक्या चिपसेट वर जास्त लोड पडू देत नाही.
Android (Go edition) चे काय आहे वेगळेपण
कमी रॅम आणि हलक्या प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोन्ससाठी बनलेला एंडरॉयड ‘गो’ एडिशन मध्ये स्मूद आणि लॅग फ्री प्रोसेसिंगसाठी गूगलने या संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टमला ‘लाइट’ ऍप्सने सुसज्ज केले आहे. एंडरॉयड 11 च्या गो एडिशन वर चालणाऱ्या सर्व स्मार्टफोन्स मध्ये गूगल द्वारे बनवण्यात आलेल्या फोन ऍप्लिकेशन्सचा ‘गो’ वर्जन दिला जाईल. यात ब्राउजिंगसाठी Google Go आणि YouTube Go सोबतच Gallery Go, Camera Go, Assistant Go सारखे फीचर्स मिळतील.
एंडरॉयड गो एडिशन मध्ये सर्व Google apps काही अश्याप्रकारे डिजाईन केले जातात कि ते फोन मध्ये रॅम व स्टोरेज कमी घेतील. कमी मेमरी वापरण्यासोबतच हे ऍप्स वेगाने लोड होतात आणि चालतात. हे ऍप्स अश्याप्रकारे कस्टमाइज केले जातात कि ते वापरात असताना फोन मध्ये इंटरनेट डेटाची खपत पण कमी होते आणि फोनची बॅटरी पण कमी वापरली जाते. म्हणजे फास्ट, हेल्पफुल आणि इजी टू यूज.
फायदा काय
वरच्या माहितीवरून तुम्हाला समजले असेल कि एखद्या लो बजेट आणि एंट्री लेवल स्मार्टफोन मध्ये Android 11 Go edition असल्यामुळे काय फायदा होईल. हि ऑपरेटिंग सिस्टम डेटा सेविंग करेल आणि इंटरनेटची खपत कमी होईल. गूगलनुसार या ओएसमुळे एंट्री लेवल स्मार्टफोन मध्ये ऍप्स आधीच्या तुलनेत 15 टक्के जास्त वेगाने चालतील.
एंडरॉयड 11 च्या गो एडिशनमुळे फोन मधील रॅम मेमरी 270 MB पर्यंत रिकामी राहील जी जास्त ऍप्स वापरण्यासाठी आणि गेम खेळण्याच्या कमी येईल. त्याचप्रमाणे गो एडिशन मधील ऍप्स बेसिक वर्जनच्या तुलनेत 900 MB पर्यंत जास्त फोन स्टोरेज वाचवतात. Android 11 Go edition मध्ये कंपनीने Google Lens दिली आहे जी टेक्स्टला स्पीच मध्ये रूपांतरित करते तसेच गो एडिशन शानदार बिल्ट-इन सिक्योरिटी फीचर्स सह येतो.