गूगलने Android 11 डेवलपर 4 प्रीव्यू सादर केला आहे जो Android च्या पुढल्या वर्जनसाठी अंतिम डेवलपर प्रीव्यू असल्याचे बोलले जात आहे. टेक विश्वातील दिग्गज कंपन्यांपैकी एक Google पुढल्या महिन्यापासून एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जनचा बीटा वर्जन रोल आउट करायाला सुरवात करेल. कंपनी 3 जूनला ‘Android 11: The Beta Launch Show’ नावाच्या एका ईवेंटचे आयोजन करणार आहे. हा ईवेंट ऑनलाइन भारतीय वेळेनुसार 8:30 pm वाजता सुरु होईल.
दरवर्षी गूगल आपल्या Google I/O ऍन्युअल कॉन्फ्रेंस मध्ये लेटेस्ट एंडरॉयड सादर करते. पण कोरोनावायरस पाहता कंपनीने हा ईवेंट रद्द केला होता. आता ऑनलाइन ईवेंटच्या माध्यमातून कंपनी लेटेस्ट एंडरॉयड डेव्हलपमेंटचा बीटा वर्जन सादर करेल.
And now for an important message from @GeorgeTakei … #Android11
?https://t.co/pW26VfNlVy? pic.twitter.com/IcI6FO1Dfg
— Google Developers (@googledevs) May 6, 2020
यूजर्सची उत्सुकता वाढवण्यासाठी गूगलने एंडरॉयड 11 च्या काही फीचर्स आधीच सांगितले होते. एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन मध्ये यूजर सेंसिटिव डेटा आणि बेस्ट सिक्यॉरिटी फीचर दिले जातील. चला एंडरॉयड 11 मध्ये मिळणाऱ्या काही खास फीचर बाबत माहिती घेऊया.
स्क्रीन रेकॉर्डिंग
गूगल एंडरॉयड 11 मध्ये नेटिव स्क्रीन रिकॉर्डर फीचर सादर करेल. हा फीचर क्विक सेटिंग्स टॉगल मध्ये जाऊन वापरता येईल. इतकेच नव्हे तर एंडरॉयड 11 सपॉर्ट करणाऱ्या डिवाइस मध्ये जर ब्लूटूथ ऑन असेल आणि तो फ्लाइट मोड करताच आपोआप ऑफ होईल.
छोटा होईल स्क्रीनशॉट पॉप-अप
Google नवीन एंडरॉयड वर्जन सह नवीन स्क्रीनशॉट पॉप-अप फीचर सादर करेल. जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट कॅप्चार कराल तेव्हा खूप छोटा दिसेल जसा आईओएस डिवाइस वर दिसतो. स्क्रीनच्या वरच्या बाजूला एका मोठ्या पॉप-अप च्या ऐवजी स्क्रीनशॉट एक छोट्या पॉप-अप सह स्क्रीनच्या खाली डावीकडे दिसेल. यात स्क्रीनशॉट शेयर आणि एडिट करण्याचा ऑप्शन पण दिला जाईल. स्क्रीनशॉट शेअर करणे आणि हा एडिट करण्यासाठी पर्याय दिला जाईल.
कॅमेरा अपडेट
एंडरॉयड 11 मध्ये गूगल बोके मोड सुधार करण्यात आला आहे. तसेच यूजर्स कॅमेरा वापरताना रिंगटोन वाइब्रेशन, नोटिफिकेशन किंवा अलार्म म्यूट करू शकतील.
सिक्यॉरिटी होईल अपडेट
गूगलचा प्रयत्न एंडरॉयड 11 सह यूजर्सची सुरक्षा सुधारण्याचा आहे. त्यासाठी कंपनी बायोमीट्रिक्स सपोर्ट वाढवेल. यावेळी तीन ऑथेंटिकेटरना सपोर्ट दिला जाईल, ज्यात स्ट्रॉन्ग, वीक आणि डिवाइस क्रिडेंशलचा समावेश आहे. नवीन अपडेट मध्ये कोणत्याही ऍपला डिवाइस ऍक्सेस करण्याआधी ओटीपी ची गरज पडेल.
ईथरनेट टेथरिंग
Android 11 मध्ये ईथरनेट टेथरिंगच्या स्वरूपात हॉटस्पॉट आणि टेथरिंग मेनू मध्ये एक नवीन ऑप्शन मिळेल. यातून एंडरॉयड फोन वर एक यूएसबी-टू-ईथरनेट एडेप्टर कनेक्ट करून आणि पुन्हा लॅन केबल तो ऍडॅप्टर आणि पीसीला कनेक्ट करता येईल. हा एक चांगला फीचर आहे पण तेव्हा उपयोगी पडेल जेव्हा तुम्ही अश्या डेस्कटॉप वर इंटरनेट वापरात ज्यात वाई-फाई सपोर्ट नाही.
ऍप परमिशन मध्ये होईल सुधार
Google एंडरॉयड आपल्या गेल्या वर्जन पासून ऍप्लिकेशन परमिशन बदलण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे आणि हे काम एंडरॉयड 11 सोबत पण चालू राहील. एंडरॉयड 11 डेवलपर प्रीव्यू 3 मध्ये असे समोर आले होते कि काही महिन्यांपर्यंत ऍपचा वापर न केल्यास ऍपची परवानगी रद्द केली जाईल. येमुळे युजरचा डेटा कमी खर्च होईल.
















