Galaxy S23 FE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 04 Oct 2023 15:49:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung नं भारतात लाँच केला Galaxy S23 FE स्मार्टफोन, जाणून घ्या किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-5g-launched-in-india-check-specifications-price-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-5g-launched-in-india-check-specifications-price-sale-details/#respond Wed, 04 Oct 2023 15:49:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22638 सॅमसंगनं अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज भारतात आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा ‘फॅन एडिशन’ आणला आहे. आम्ही बोलत आहोत Samsung Galaxy S23 FE बद्दल जो भारतात लाँच झाला आहे. ह्या स्टायलिश मोबाइल फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि सेल संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Samsung Galaxy S23 FE ची किंमत गॅलेक्सी एस23 एफई दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला […]

The post Samsung नं भारतात लाँच केला Galaxy S23 FE स्मार्टफोन, जाणून घ्या किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगनं अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज भारतात आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा ‘फॅन एडिशन’ आणला आहे. आम्ही बोलत आहोत Samsung Galaxy S23 FE बद्दल जो भारतात लाँच झाला आहे. ह्या स्टायलिश मोबाइल फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि सेल संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy S23 FE ची किंमत

गॅलेक्सी एस23 एफई दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 59,999 रुपये आहे. तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 64,999 रुपये आहे. हा फोन 7 ऑक्टोबरपासून विकत घेता येईल आणि Mint, Graphite आणि Purple कलरमध्ये उपलब्ध होईल.

Samsung Galaxy S23 FE चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : सॅमसंग गॅलेक्सी एस23 एफई मध्ये 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.4 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स स्क्रीन आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
  • प्रोसेसर: हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे. ह्यात प्रोसेसिंगसाठी 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस 2200 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.8गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड वर चालतो.
  • मेमरी: Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन 8जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 128जीबी स्टोरेज तसेच 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 1टीबीचं मेमरी कार्ड वापरता येईल.
  • बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे.
  • फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस23 फॅन एडिशन मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा मोबाइल 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये फास्ट वायरलेस चार्जिंग पण देण्यात आली आहे.

Samsung Galaxy S23 FE फीचर्स

  • हा स्मार्टफोन अ‍ॅल्युमिनियम फ्रेमवर बनला आहे तसेच स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे.
  • गॅलेक्सी एस23 एफईला IP68 रेटिंग मिळाली आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ तसेच डस्टप्रूफ बनतो.
  • Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन 14 5G Bands ना सपोर्ट करतो.
  • ह्या फोनमध्ये Eye Care Display चा वापर केला गेला आहे जो बराच काळ वापरल्यावर देखील डोळ्यांना सुरक्षित ठेवतो.
  • ह्यात NFC, Wi-Fi 6E, Bluetooth v5.3 आणि USB Type-C सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.
  • सिक्योरिटीसाठी मोबाइलमध्ये Samsung Knox आणि Samsung Knox Vault देण्यात आला आहे.

The post Samsung नं भारतात लाँच केला Galaxy S23 FE स्मार्टफोन, जाणून घ्या किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-5g-launched-in-india-check-specifications-price-sale-details/feed/ 0
Samsung Galaxy S23 FE ची माहिती लीक; कोरियन टिपस्टरनं केला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-tipped-to-come-with-qualcomm-snapdragon-8-plus-gen-1/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-tipped-to-come-with-qualcomm-snapdragon-8-plus-gen-1/#respond Thu, 23 Feb 2023 05:23:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18078 Samsung अलीकडेच आपली Galaxy S23 series जगभरात सादर केली आहे. काही आठवड्यांपूर्वी बातमी आली होती की सॅमसंग 2023 मध्ये Galaxy S23 FE देखील लाँच करेल. जो फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन असलेला स्वस्त स्मार्टफोन असेल. याआधी कंपनीनं फॅन एडिशन सीरिजमध्ये Galaxy S20 FE 4G व 5G आणि Galaxy S21 FE स्मार्टफोन सादर केले आहेत. परंतु Galaxy S22 FE […]

The post Samsung Galaxy S23 FE ची माहिती लीक; कोरियन टिपस्टरनं केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन 2023 च्या उत्तरार्धात सादर केला जाईल.
  • या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट दिला जाईल.
  • हा फोन विक्री वाढवण्यासाठी आकर्षक किंमतीत सादर केला जाईल.

Samsung अलीकडेच आपली Galaxy S23 series जगभरात सादर केली आहे. काही आठवड्यांपूर्वी बातमी आली होती की सॅमसंग 2023 मध्ये Galaxy S23 FE देखील लाँच करेल. जो फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन असलेला स्वस्त स्मार्टफोन असेल. याआधी कंपनीनं फॅन एडिशन सीरिजमध्ये Galaxy S20 FE 4G व 5G आणि Galaxy S21 FE स्मार्टफोन सादर केले आहेत. परंतु Galaxy S22 FE बाजारात आला नाही त्यामुळे ही सीरिज बंद झाली असावी असा अंदाज लावण्यात आला होता.

Samsung Galaxy S23 FE येतोय

सॅमसंगनं Galaxy S21 FE मध्ये Exynos 2100 चिपसेट वापरल्यामुळे त्याची इतकी विक्री झाली नाही. परंतु आता कंपनी पुन्हा एकदा एफई सीरिजच्या माध्यमातून बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी तयार आहे. एका कोरियन टिपस्टरनं माहिती दिली आहे की आगामी गॅलेक्सी एस 23 फॅन एडिशनमध्ये कंपनी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेटचा वापर करू शकतो. तसेच सॅमसंग या स्मार्टफोनची किंमत देखील आकर्षक ठेऊ शकते त्यामुळे विक्री वाढेल.

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

याआधी आलेल्या बातमीनुसार कंपनी Galaxy A74 सादर करणार नाही त्याऐवजी आगामी S23 FE स्मार्टफोनवर लक्ष दिलं जाईल. सॅमसंग गॅलेक्सी एस 23 एफई स्मार्टफोन 2023 च्या उत्तराधार्त सादर करण्याची शक्यता जास्त आहे. त्यातल्या त्या हा फोन ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान सादर केला जाईल. अजूनतरी याबाबत कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही तसेच या स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन देखील समोर आले नाहीत. हे देखील वाचा: Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं

Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus चे स्पेसिफिकेशन्स

  • FHD+ 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 45W फास्ट चार्जिंग
  • 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • IP68 सर्टिफिकेशन
  • 8GB RAM आणि 512GB स्टोरेज

Samsung Galaxy S23 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे तर Galaxy S23 Plus 6.6 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही फोन एफएचडी+ एज अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, व्हिजन बूस्टर आणि एन्हान्सड कम्फर्ट फिचर सह देण्यात आला आहे. हे फोन्स अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आले आहेत.

प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 8GB रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हे फोन्स अँड्रॉइड 13 आधारित सॅमसंगच्या One UI 5.1 वर चालतात. हेव्ही टास्क नंतर देखील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी व्हेपर चेंबर कुलिंग मिळते.

हे फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहावे म्हणून IP68 सर्टिफाइड करण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, LTE, Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 चे ऑप्शन मिळतात. सिक्योरिटी फिचरमध्ये Samsung Knox आणि Samsung Knox Vault चा समावेश आहे. छोट्या Samsung Galaxy S23 मध्ये 3900mAh ची छोटी बॅटरी मिळते तर प्लस मॉडेल 4700mAh च्या बॅटरीसह येतो. दोन्ही फोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. हे देखील वाचा: लो बजेटमधील युद्धाची रंगत वाढणार; Tecno Spark 10C स्मार्टफोन 4GB RAM सह वेबसाइटवर लिस्ट

दोन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमेरा सेटअपमध्ये काहीही फरक नाही. यात एफ 1.8 अपर्चर असलेला 50MP चा प्रायमरी सेन्सर, एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा वाइड अँगल कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चर असलेली 10MP 3X ऑप्टिकल झूम असलेली टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

The post Samsung Galaxy S23 FE ची माहिती लीक; कोरियन टिपस्टरनं केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-tipped-to-come-with-qualcomm-snapdragon-8-plus-gen-1/feed/ 0