Tecno Spark 10C स्मार्टफोन 4GB RAM सह गुगल प्ले कन्सोल वेबसाइटवर लिस्ट

Highlights

 • Tecno Spark 10C गुगल प्ले कसोंल वर लिस्ट झाला आहे.
 • या फोनमध्ये 4GB RAM आणि Unisoc T606 प्रोसेसर मिळू शकतो.
 • स्पार्क 10सी एक लो बजेट स्वस्त टेक्नो मोबाइल असेल.

स्वस्त मोबाइल बनवण्यासाठी लोकप्रिय असलेला टेक ब्रँड टेक्नो आपल्या स्पार्क सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Tecno Spark 10C नावानं लाँच होईल. कंपनीनं अद्याप आपल्या या नवीन फोनचा उल्लेख अधिकृतपणे केला नाही परंतु हा टेक्नो मोबाइल अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्ससह Google Play Console वर लिस्ट झाला आहे. पुढे ये स्वस्त लो बजेट फोनची माहिती देण्यात आली आहे.

Tecno Spark 10C चे लीक स्पेसिफिकेशन्स

 • 4GB RAM
 • Unisoc T606
 • Android 12 OS

हा टेक्नो फोन गुगल प्ले कंसोल वर Tecno KI5k मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. लिस्टिंगमध्ये सांगण्यात आलं आहे की हा डिवायस 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या डिस्प्लेसह लाँच केला जाईल जो एचडी+ रिजोल्यूशनसह येईल तसेच 320पीपीआयला सपोर्ट करेल. लिस्टिंगमधील फोटोजवरून स्पष्ट झालं आहे की या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन दिली जाईल. हे देखील वाचा: आमच्या हाती लागली Samsung Galaxy A34 आणि Galaxy A54 ची माहिती; पाहा फोटो, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Tecno Spark 10C स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 प्रोसेसर असल्याचा खुलासा देखील या लिस्टिंगमध्ये झाला आहे. गुगल प्ले कंसोलवर हा टेक्नो फोन 4जीबी रॅमसह समोर आला आहे. परंतु आणखी मेमरी व्हेरिएंट्स देखील बाजारात येतील अशी अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएससह लाँच केला जाईल. फोनचे इतर स्पेसिफिकेशन्ससाठी वाट पाहावी लागेल.

Tecno Pop 7 Pro

 • 6.6″ HD+ Display
 • 3GB RAM + 64GB Storage
 • MediaTek Helio A22
 • 5,000mAh Battery
 • 12MP AI Dual Rear Camera

अलीकडेच टेक्नो पॉप 7 प्रो भारतात लाँच झाला आहे ज्याच्या 2 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,799 रुपये आणि 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची प्राइस 7,299 रुपये आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसरवर चालतो. पावर बॅकअपसाठी यात 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं

Tecno Pop 7 Pro मध्ये 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 480निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा फोन IPX2 रेटेड आहे. फोटोग्राफीसाठी याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 12 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टेक्नो मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here