Samsung Galaxy S23 FE ची माहिती लीक; कोरियन टिपस्टरनं केला खुलासा

Highlights

  • Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन 2023 च्या उत्तरार्धात सादर केला जाईल.
  • या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट दिला जाईल.
  • हा फोन विक्री वाढवण्यासाठी आकर्षक किंमतीत सादर केला जाईल.

Samsung अलीकडेच आपली Galaxy S23 series जगभरात सादर केली आहे. काही आठवड्यांपूर्वी बातमी आली होती की सॅमसंग 2023 मध्ये Galaxy S23 FE देखील लाँच करेल. जो फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन असलेला स्वस्त स्मार्टफोन असेल. याआधी कंपनीनं फॅन एडिशन सीरिजमध्ये Galaxy S20 FE 4G व 5G आणि Galaxy S21 FE स्मार्टफोन सादर केले आहेत. परंतु Galaxy S22 FE बाजारात आला नाही त्यामुळे ही सीरिज बंद झाली असावी असा अंदाज लावण्यात आला होता.

Samsung Galaxy S23 FE येतोय

सॅमसंगनं Galaxy S21 FE मध्ये Exynos 2100 चिपसेट वापरल्यामुळे त्याची इतकी विक्री झाली नाही. परंतु आता कंपनी पुन्हा एकदा एफई सीरिजच्या माध्यमातून बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी तयार आहे. एका कोरियन टिपस्टरनं माहिती दिली आहे की आगामी गॅलेक्सी एस 23 फॅन एडिशनमध्ये कंपनी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेटचा वापर करू शकतो. तसेच सॅमसंग या स्मार्टफोनची किंमत देखील आकर्षक ठेऊ शकते त्यामुळे विक्री वाढेल.

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

याआधी आलेल्या बातमीनुसार कंपनी Galaxy A74 सादर करणार नाही त्याऐवजी आगामी S23 FE स्मार्टफोनवर लक्ष दिलं जाईल. सॅमसंग गॅलेक्सी एस 23 एफई स्मार्टफोन 2023 च्या उत्तराधार्त सादर करण्याची शक्यता जास्त आहे. त्यातल्या त्या हा फोन ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान सादर केला जाईल. अजूनतरी याबाबत कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही तसेच या स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन देखील समोर आले नाहीत. हे देखील वाचा: Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं

Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus चे स्पेसिफिकेशन्स

  • FHD+ 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 45W फास्ट चार्जिंग
  • 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • IP68 सर्टिफिकेशन
  • 8GB RAM आणि 512GB स्टोरेज

Samsung Galaxy S23 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे तर Galaxy S23 Plus 6.6 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही फोन एफएचडी+ एज अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, व्हिजन बूस्टर आणि एन्हान्सड कम्फर्ट फिचर सह देण्यात आला आहे. हे फोन्स अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आले आहेत.

प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 8GB रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हे फोन्स अँड्रॉइड 13 आधारित सॅमसंगच्या One UI 5.1 वर चालतात. हेव्ही टास्क नंतर देखील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी व्हेपर चेंबर कुलिंग मिळते.

हे फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहावे म्हणून IP68 सर्टिफाइड करण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, LTE, Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 चे ऑप्शन मिळतात. सिक्योरिटी फिचरमध्ये Samsung Knox आणि Samsung Knox Vault चा समावेश आहे. छोट्या Samsung Galaxy S23 मध्ये 3900mAh ची छोटी बॅटरी मिळते तर प्लस मॉडेल 4700mAh च्या बॅटरीसह येतो. दोन्ही फोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. हे देखील वाचा: लो बजेटमधील युद्धाची रंगत वाढणार; Tecno Spark 10C स्मार्टफोन 4GB RAM सह वेबसाइटवर लिस्ट

दोन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमेरा सेटअपमध्ये काहीही फरक नाही. यात एफ 1.8 अपर्चर असलेला 50MP चा प्रायमरी सेन्सर, एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा वाइड अँगल कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चर असलेली 10MP 3X ऑप्टिकल झूम असलेली टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here