Google pay - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 14 Jul 2023 07:18:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 यूपीआय पासवर्ड न टाकताच पाठवा पैसे; Google Pay UPI Lite सेवा सुरु https://www.91mobiles.com/marathi/google-pay-upi-lite-launched-know-how-to-use-it/ https://www.91mobiles.com/marathi/google-pay-upi-lite-launched-know-how-to-use-it/#respond Fri, 14 Jul 2023 07:18:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22389 Google Pay नं आपल्या युजर्ससाठी UPI Lite सर्व्हिस सुरु केली आहे. ही सर्व्हिस युजर्सना पिन न टाकता डिजिटल ट्रँजॅक्शन करण्यास मदत करते. यूपीआय लाइटच्या वापर छोट्या व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो. युजर्सची सुरक्षा आणि ऑनलाइन फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी ही सर्व्हिस लिमिटेशन्ससह जारी केली गेली आहे. भारतीय रिजर्व्ह बँक (RBI) नं गेल्यावर्षी सप्टेंबर 2022 मध्ये UPI Lite […]

The post यूपीआय पासवर्ड न टाकताच पाठवा पैसे; Google Pay UPI Lite सेवा सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • छोट्या ट्रँजॅक्शनसाठी सुरु झाली Google Pay UPI Lite सर्व्हिस
  • Google Pay UPI Lite वरून 200 रुपयांचा व्यवहार करता येईल.
  • एका दिवसात 4000 रुपये होतील अकाऊंटमध्ये लोड

Google Pay नं आपल्या युजर्ससाठी UPI Lite सर्व्हिस सुरु केली आहे. ही सर्व्हिस युजर्सना पिन न टाकता डिजिटल ट्रँजॅक्शन करण्यास मदत करते. यूपीआय लाइटच्या वापर छोट्या व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो. युजर्सची सुरक्षा आणि ऑनलाइन फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी ही सर्व्हिस लिमिटेशन्ससह जारी केली गेली आहे. भारतीय रिजर्व्ह बँक (RBI) नं गेल्यावर्षी सप्टेंबर 2022 मध्ये UPI Lite सर्व्हिस छोट्या ऑनलाइन ट्रँजॅक्शनसाठी लाँच केली होती.

Google Pay UPI Lite ची वैशिष्ट्ये

Google Pay नं नवीन UPI Lite सर्व्हिस लाँच केली आहे. छोट्या यूपीआय पेमेंटची प्रोसेस सोपी करण्यासाठी ही सेवा आली आहे.

  • त्यामुळे Google Pay करण्यासाठी तुम्हाला यूपीआय पिन टाकण्याची आवश्यकता नाही.

    नवीन यूपीआय लाइट सर्व्हिसच्या मदतीनं युजर्स एक टॅपवर पिन न टाकता पेमेंट करू शकतील.

    सुरक्षेसाठी UPI Lite अकाऊंट मध्ये फक्त 4000 रुपये पर्यंतची अमाउंट लोड केली जाऊ शकते.

    तसेच फक्त 200 रुपयांपर्यंतचे यूपीआय ट्रँजॅक्शन करता येईल.

Google Pay वर UPI Lite सर्व्हिस अ‍ॅक्टिव्हेट करण्याची पद्धत?

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Pay App ओपन करा.
  • टॉप कॉर्नरवरील प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा.
  • प्रोफाईल पेजमध्ये Bank Accpunt व RuPay Credit card सह UPI Lite चा ऑप्शन दिसेल.
  • UPI Lite ऑप्शनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला Add Money चा ऑप्शन दिसेल.
  • नंतर Continue वर टॅप करून स्क्रीनवर आलेले निर्देश फॉलो करा.
  • सर्व निर्देश फॉलो केल्यावर तुमच्या अकाऊंटवर UPI Lite सर्व्हिस अ‍ॅक्टिव्हेट करता येईल.

तुमच्या अकाऊंटवर UPI Lite सर्व्हिस अ‍ॅक्टिव्हेट झाल्यावर तुम्ही 200 रुपयांपेक्षा कमीचे ट्रँजॅक्शन पिन न टाकता करू शकाल. Google Pay पूर्वी Phone Pay आणि PayTM नं देखील यूपीआय लाइट सर्व्हिस सुरु केली आहे.

The post यूपीआय पासवर्ड न टाकताच पाठवा पैसे; Google Pay UPI Lite सेवा सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pay-upi-lite-launched-know-how-to-use-it/feed/ 0
Google Pay वर आता फक्त आधार नंबर देऊन अ‍ॅक्टिव्हेट करता येईल UPI, अशी आहे पद्धत https://www.91mobiles.com/marathi/google-pay-now-enables-aadhaar-based-authentication-for-upi-activation/ https://www.91mobiles.com/marathi/google-pay-now-enables-aadhaar-based-authentication-for-upi-activation/#respond Thu, 08 Jun 2023 11:58:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21483 जर तुम्हाला यूपीआय (UPI) अकाऊंट सेटअप करताना अडचण येत असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. गुगल पे (Google Pay) नं यूपीआय अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या माध्यमातून आधार-बेस्ड ऑथेंटिकेशनची घोषणा केली आहे. ह्याचा अर्थ असा की काही कारणास्तव तुम्ही यूपीआय अकाऊंट तुमच्या मोबाइलवर सेटअप करू शकत नसाल तर आधार ऑथेंटिकेशनची मदत […]

The post Google Pay वर आता फक्त आधार नंबर देऊन अ‍ॅक्टिव्हेट करता येईल UPI, अशी आहे पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्हाला यूपीआय (UPI) अकाऊंट सेटअप करताना अडचण येत असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. गुगल पे (Google Pay) नं यूपीआय अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या माध्यमातून आधार-बेस्ड ऑथेंटिकेशनची घोषणा केली आहे. ह्याचा अर्थ असा की काही कारणास्तव तुम्ही यूपीआय अकाऊंट तुमच्या मोबाइलवर सेटअप करू शकत नसाल तर आधार ऑथेंटिकेशनची मदत घेता येईल. गुगल पे देशातील मोठ्या यूपीआय अ‍ॅप पैकी एक आहे आणि आता ह्या नवीन फीचरच्या मदतीनं अजून लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

Google Pay UPI ID आधार कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं?

गुगल पे (Google Pay) वर आधारच्या माध्यमातून यूपीआय अ‍ॅक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. परंतु ही प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी तुमचा मोबाइल नंबर आधार आणि बँक अकाऊंटशी कनेक्टेड असणं आवश्यक आहे. आधारनं यूपीआय अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा :

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay अ‍ॅप गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
  • त्यानंतर बँक अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी आधारचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार नंबरचे पहिले सहा अंक टाकावे लागतील.
  • क्रिएट पिनच्या ऑप्शनवर टॅप करा, त्यानंतर 6 अंकी आधार ओटीपी मिळेल.
  • ऑथेंटिकेट करण्यासाठी ओटीपी सबमिट करा.
  • ऑथेंटिकेट यशस्वी झाल्यावर तुम्हाला सर्व व्यवहारांसाठी 6 अंकी UPI पिन निवडावा लागेल.

गुगल साठवत नाही आधार नंबर

Google नुसार ह्या प्रक्रियादेत तुमचा आधार नंबर साठवला जात नाही. जेव्हा युजर आधारचे पहिले सहा अंक टाकतो तेव्हा ते ऑथेंटिकेशनसाठी एनपीसीआईच्या माध्यमातून युआयडीएआयसोबत शेयर केले जातात. त्यामुळे युजरच्या गोपनीयता आणि आधार नंबरची सुरक्षा राखली जाते.

ह्या नवीन सुविधेपूर्वी युजर यूपीआय आयडी डेबिट कार्ड नसलेल्या ग्राहकांसाठी अ‍ॅक्टिव्हेट करणं शक्य नव्हतं. आता ज्या युजर्सकडे डेबिट कार्ड नाही ते देखील यूपीआय वापरू शकतील. युआयडीएआयच्या आकडयांवरून समजलं आहे की 99.9% वयस्कर ललोकांकडे आधार नंबर आहे. आता त्यांना यूपीआय वापरता येईल.

The post Google Pay वर आता फक्त आधार नंबर देऊन अ‍ॅक्टिव्हेट करता येईल UPI, अशी आहे पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pay-now-enables-aadhaar-based-authentication-for-upi-activation/feed/ 0
GPay, Paytm आणि PhonePe वर अशी करा बिलाची समसमान वाटणी; कॅल्क्युलेटरचीही गरज नाही https://www.91mobiles.com/marathi/how-to-split-bill-on-google-pay-paytm-and-phonepe/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-split-bill-on-google-pay-paytm-and-phonepe/#respond Sat, 21 Jan 2023 12:30:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16446 क्रिसमस नंतर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. तुम्ही देखील तुमच्या मित्रांसह न्यू इयरच्या निमित्ताने पार्टी की प्लॅनिंग करत असाल तर पार्टीच्या बिल पेमेंटची चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला उपयुक्त ट्रिक सांगणार आहोत जिच्या मदतीनं तुम्ही पार्टी बिल्सचं पेमेंट तुमच्या मित्रांसोबत वाटून पेमेंट करू शकता. इथे आम्ही तुम्हाला ऑनलाइन UPI अ‍ॅप्स – Google Pay, […]

The post GPay, Paytm आणि PhonePe वर अशी करा बिलाची समसमान वाटणी; कॅल्क्युलेटरचीही गरज नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
क्रिसमस नंतर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. तुम्ही देखील तुमच्या मित्रांसह न्यू इयरच्या निमित्ताने पार्टी की प्लॅनिंग करत असाल तर पार्टीच्या बिल पेमेंटची चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला उपयुक्त ट्रिक सांगणार आहोत जिच्या मदतीनं तुम्ही पार्टी बिल्सचं पेमेंट तुमच्या मित्रांसोबत वाटून पेमेंट करू शकता. इथे आम्ही तुम्हाला ऑनलाइन UPI अ‍ॅप्स – Google Pay, Paytm आणि PhonePe अ‍ॅप्समध्ये बिल स्प्लिट करण्याबाबत माहिती देत आहोत.

Google Pay, Paytm आणि PhonePe बिल स्प्लिट फीचर

Google Pay, Paytm आणि PhonePe चं बिल स्लिप्ट फीचरमुळे बिलाची वाटणी करण्यासाठी कॅल्क्युलेटर अ‍ॅप देखील लागणार नाही. या फीचरच्या मदतीनं तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये सहज बिलाची समसमान वाटणी करू शकता आणि फक्त तुमच्या वाट्याला आलेलं पेमेंट करू शकता. तुम्ही तुमचं बिल मित्रांमध्ये शेयर करताच बिल स्प्लिट होतं आणि मित्रांनाही त्याचं नोटिफिकेशन जातं.

Google Pay, Paytm आणि PhonePe अ‍ॅपमध्ये बिल स्प्लिट करण्याची पद्धत

Google Pay वर बिल स्प्लिट कसं करायचं

  • तुमच्या फोनवर Google Pay अ‍ॅप ओपन करा.
  • बिल पे वर टॅप करा किंवा न्यू पेमेंट ऑप्शन वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला बॉटम लेफ्ट कॉर्नरवर स्प्लिट बिल ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.
  • आता तुम्हाला ज्या मित्रांसोबत बिल स्प्लिट करायचं आहे त्यांची निवड करून एक ग्रुप बनवा.
  • ग्रुप तयार होताच, स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला बिल अमाउंट एंटर करावी लागेल.
  • तुम्ही बिल पेमेंट करण्यासाठी ग्रुप मधून कस्टम कॉन्टेक्ट देखील सिलेक्ट करू शकता.
  • त्यानंतर सिलेक्टड कॉन्टेक्ट समोरील पेमेंट रिक्वेस्ट बटनवर टॅप करा.
  • रिक्वेस्ट सेंट केल्यानंतर तुम्ही पेमेंट स्टेटस देखील चेक करू शकता.

Paytm वर बिल स्प्लिट कैसे करा

  • तुमच्या फोनवर Paytm अ‍ॅप ओपन करा.
  • आता वर डावीकडे दिलेल्या मेसेज बॉक्स ऑप्शनवर क्लिक करून कन्वर्जेशन पेजवर जा.
  • इथे तुम्हाला स्प्लिट बिलचा ऑप्शन दिसेल.
  • आता तुम्हाला बिल अमाउंट टाकावी लागेल.
  • त्यानंतर त्या कॉन्टेक्टची निवड करा ज्यांच्यासोबत बिल स्प्लिट करायचं आहे.
  • त्यानंतर डावीकडे कॉर्नरमध्ये असलेल्या कंटीन्यू बटनवर क्लिक करा.
  • नेक्स्ट‌ पेजवर, ऑटो स्प्लिट इक्वॉलिटी चेकबॉक्स किंवा मॅन्युअली अमाउंट अ‍ॅड करून पेमेंट सेंड बटनवर क्लिक करा.
  • PhonePe वर बिल स्प्लिट कैसे करा

  • तुमच्या फोनवर PhonePe अ‍ॅप ओपन करा.
  • अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर सिलेक्ट स्लिप्ट बिल ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर पे अमाउंट एंटर करा.
  • फोन पेवर ज्या कॉन्टॅक्ट सोबत बिल पे करायचं त्यांची निवड करा.
  • त्यानंतर सेंड बटनवर क्लिक करा.
  • The post GPay, Paytm आणि PhonePe वर अशी करा बिलाची समसमान वाटणी; कॅल्क्युलेटरचीही गरज नाही first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-split-bill-on-google-pay-paytm-and-phonepe/feed/ 0
    Paytm आणि Phonepe ला टक्कर देण्यासाठी My Jio ऍप मध्ये आला UPI चा सपोर्ट https://www.91mobiles.com/marathi/my-jio-app-gets-upi-payments-according-to-report-paytm-google-pay/ https://www.91mobiles.com/marathi/my-jio-app-gets-upi-payments-according-to-report-paytm-google-pay/#respond Tue, 21 Jan 2020 13:48:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6343 यूजर्सना मोबाईल नंबर, डेबिट कार्ड नंबर आणि बॅंक अकाउंट नंबर द्यावा लागत आहे.

    The post Paytm आणि Phonepe ला टक्कर देण्यासाठी My Jio ऍप मध्ये आला UPI चा सपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    टेलीकॉम सेक्टर मध्ये आपल्या नवीन आणि स्वस्त प्लानच्या जीवावर राज्य करणारी रिलायंस जियो आता डिजिटल पेयमेन्ट ऍपच्या मार्केट मध्ये येण्याची पण तयारी करत आहे. कंपनीने अलीकडेच जियो मार्ट लॉन्च केला होता, ज्यामुळे आता यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) मध्ये एंट्री घेतली आहे. समोर आलेल्या बातम्यांनुसार रिलायंस जियोने माय जियो ऍप मध्ये यूपीआई पेमेंटचा सपोर्ट आणला आहे.

    आता बोलले जात आहे कि इंडियन मार्केट मधील पेटीएम, फोनपे आणि गूगल पे सारख्या ऍप्सच्या अडचणी वाढू शकतात. हे फीचर सध्या फक्त काही यूजर्सना मिळत आहे. पण कंपनीने अधिकृतपणे याची कोणतीही माहिती दिली नाही.

    एक वेबसाइट entrackr च्या रिपोर्टनुसार माय जियो ऍप मध्ये वर्चुअल पेमेंट एड्रेस (VPA) चा आणि यूपीआई आईडी ऍड करण्याचा ऑप्शन येत आहे. विशेष म्हणजे याआधी पण एक रिपोर्ट आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि रिलायंस जियो यूपीआई पेमेंटसाठी ऍक्सिस बॅंक, आईसीआईसीआई आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी बोलणी करत आहे.

    इतकेच नव्हे तर सोशल मीडिया वर एका यूजरने माय जियो ऍपच्या यूपीआई पेमेंट फीचरचा स्क्रीनशॉट पण शेयर केला आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि माय जियो ऍप यूजर्सचा यूपीआई आईडी पण मागत आहे. त्यानंतर यूजर्सना मोबाईल नंबर, डेबिट कार्ड नंबर आणि बॅंक अकाउंट नंबर द्यावा लागत आहे.

    अलीकडेच रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने तिसऱ्या तिमाहीचे आकडे घोषित केले आहेत. या घोषणेत सांगण्यात आले आहे कि रिलायंस जियोचा डेटा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. कंपनीचा रेवेन्यू वर्षाला 28.3 टक्क्याने वाढून 13,968 कोटी झाला आहे. रिलायंस जियोने एक वर्षापूर्वी या तिमाहीत 831 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट मिळवला होता.

    रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले कि 31 डिसेंबर पर्यंत जियोच्या ग्राहकांची संख्या 37 कोटीच्या पार गेली आहे. गेल्या 12 महिन्यांत जियोने 13 कोटी 57 लाख ग्राहक जोडले आहेत, तसेच एक कोटी 48 लाख नवीन ग्राहक गेल्या तिमाहीत जोडले गेले आहेत.

    The post Paytm आणि Phonepe ला टक्कर देण्यासाठी My Jio ऍप मध्ये आला UPI चा सपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/my-jio-app-gets-upi-payments-according-to-report-paytm-google-pay/feed/ 0