Google Pay वर आता फक्त आधार नंबर देऊन अ‍ॅक्टिव्हेट करता येईल UPI, अशी आहे पद्धत

जर तुम्हाला यूपीआय (UPI) अकाऊंट सेटअप करताना अडचण येत असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. गुगल पे (Google Pay) नं यूपीआय अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या माध्यमातून आधार-बेस्ड ऑथेंटिकेशनची घोषणा केली आहे. ह्याचा अर्थ असा की काही कारणास्तव तुम्ही यूपीआय अकाऊंट तुमच्या मोबाइलवर सेटअप करू शकत नसाल तर आधार ऑथेंटिकेशनची मदत घेता येईल. गुगल पे देशातील मोठ्या यूपीआय अ‍ॅप पैकी एक आहे आणि आता ह्या नवीन फीचरच्या मदतीनं अजून लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

Google Pay UPI ID आधार कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं?

गुगल पे (Google Pay) वर आधारच्या माध्यमातून यूपीआय अ‍ॅक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. परंतु ही प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी तुमचा मोबाइल नंबर आधार आणि बँक अकाऊंटशी कनेक्टेड असणं आवश्यक आहे. आधारनं यूपीआय अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा :

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay अ‍ॅप गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
  • त्यानंतर बँक अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी आधारचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार नंबरचे पहिले सहा अंक टाकावे लागतील.
  • क्रिएट पिनच्या ऑप्शनवर टॅप करा, त्यानंतर 6 अंकी आधार ओटीपी मिळेल.
  • ऑथेंटिकेट करण्यासाठी ओटीपी सबमिट करा.
  • ऑथेंटिकेट यशस्वी झाल्यावर तुम्हाला सर्व व्यवहारांसाठी 6 अंकी UPI पिन निवडावा लागेल.

गुगल साठवत नाही आधार नंबर

Google नुसार ह्या प्रक्रियादेत तुमचा आधार नंबर साठवला जात नाही. जेव्हा युजर आधारचे पहिले सहा अंक टाकतो तेव्हा ते ऑथेंटिकेशनसाठी एनपीसीआईच्या माध्यमातून युआयडीएआयसोबत शेयर केले जातात. त्यामुळे युजरच्या गोपनीयता आणि आधार नंबरची सुरक्षा राखली जाते.

ह्या नवीन सुविधेपूर्वी युजर यूपीआय आयडी डेबिट कार्ड नसलेल्या ग्राहकांसाठी अ‍ॅक्टिव्हेट करणं शक्य नव्हतं. आता ज्या युजर्सकडे डेबिट कार्ड नाही ते देखील यूपीआय वापरू शकतील. युआयडीएआयच्या आकडयांवरून समजलं आहे की 99.9% वयस्कर ललोकांकडे आधार नंबर आहे. आता त्यांना यूपीआय वापरता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here