क्रिसमस नंतर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. तुम्ही देखील तुमच्या मित्रांसह न्यू इयरच्या निमित्ताने पार्टी की प्लॅनिंग करत असाल तर पार्टीच्या बिल पेमेंटची चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला उपयुक्त ट्रिक सांगणार आहोत जिच्या मदतीनं तुम्ही पार्टी बिल्सचं पेमेंट तुमच्या मित्रांसोबत वाटून पेमेंट करू शकता. इथे आम्ही तुम्हाला ऑनलाइन UPI अॅप्स – Google Pay, Paytm आणि PhonePe अॅप्समध्ये बिल स्प्लिट करण्याबाबत माहिती देत आहोत.
Google Pay, Paytm आणि PhonePe बिल स्प्लिट फीचर
Google Pay, Paytm आणि PhonePe चं बिल स्लिप्ट फीचरमुळे बिलाची वाटणी करण्यासाठी कॅल्क्युलेटर अॅप देखील लागणार नाही. या फीचरच्या मदतीनं तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये सहज बिलाची समसमान वाटणी करू शकता आणि फक्त तुमच्या वाट्याला आलेलं पेमेंट करू शकता. तुम्ही तुमचं बिल मित्रांमध्ये शेयर करताच बिल स्प्लिट होतं आणि मित्रांनाही त्याचं नोटिफिकेशन जातं.
Google Pay, Paytm आणि PhonePe अॅपमध्ये बिल स्प्लिट करण्याची पद्धत
Google Pay वर बिल स्प्लिट कसं करायचं
- तुमच्या फोनवर Google Pay अॅप ओपन करा.
- बिल पे वर टॅप करा किंवा न्यू पेमेंट ऑप्शन वर क्लिक करा.
- आता तुम्हाला बॉटम लेफ्ट कॉर्नरवर स्प्लिट बिल ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.
- आता तुम्हाला ज्या मित्रांसोबत बिल स्प्लिट करायचं आहे त्यांची निवड करून एक ग्रुप बनवा.
- ग्रुप तयार होताच, स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला बिल अमाउंट एंटर करावी लागेल.
- तुम्ही बिल पेमेंट करण्यासाठी ग्रुप मधून कस्टम कॉन्टेक्ट देखील सिलेक्ट करू शकता.
- त्यानंतर सिलेक्टड कॉन्टेक्ट समोरील पेमेंट रिक्वेस्ट बटनवर टॅप करा.
- रिक्वेस्ट सेंट केल्यानंतर तुम्ही पेमेंट स्टेटस देखील चेक करू शकता.