Paytm आणि Phonepe ला टक्कर देण्यासाठी My Jio ऍप मध्ये आला UPI चा सपोर्ट

टेलीकॉम सेक्टर मध्ये आपल्या नवीन आणि स्वस्त प्लानच्या जीवावर राज्य करणारी रिलायंस जियो आता डिजिटल पेयमेन्ट ऍपच्या मार्केट मध्ये येण्याची पण तयारी करत आहे. कंपनीने अलीकडेच जियो मार्ट लॉन्च केला होता, ज्यामुळे आता यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) मध्ये एंट्री घेतली आहे. समोर आलेल्या बातम्यांनुसार रिलायंस जियोने माय जियो ऍप मध्ये यूपीआई पेमेंटचा सपोर्ट आणला आहे.

आता बोलले जात आहे कि इंडियन मार्केट मधील पेटीएम, फोनपे आणि गूगल पे सारख्या ऍप्सच्या अडचणी वाढू शकतात. हे फीचर सध्या फक्त काही यूजर्सना मिळत आहे. पण कंपनीने अधिकृतपणे याची कोणतीही माहिती दिली नाही.

एक वेबसाइट entrackr च्या रिपोर्टनुसार माय जियो ऍप मध्ये वर्चुअल पेमेंट एड्रेस (VPA) चा आणि यूपीआई आईडी ऍड करण्याचा ऑप्शन येत आहे. विशेष म्हणजे याआधी पण एक रिपोर्ट आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि रिलायंस जियो यूपीआई पेमेंटसाठी ऍक्सिस बॅंक, आईसीआईसीआई आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी बोलणी करत आहे.

इतकेच नव्हे तर सोशल मीडिया वर एका यूजरने माय जियो ऍपच्या यूपीआई पेमेंट फीचरचा स्क्रीनशॉट पण शेयर केला आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि माय जियो ऍप यूजर्सचा यूपीआई आईडी पण मागत आहे. त्यानंतर यूजर्सना मोबाईल नंबर, डेबिट कार्ड नंबर आणि बॅंक अकाउंट नंबर द्यावा लागत आहे.

अलीकडेच रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने तिसऱ्या तिमाहीचे आकडे घोषित केले आहेत. या घोषणेत सांगण्यात आले आहे कि रिलायंस जियोचा डेटा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. कंपनीचा रेवेन्यू वर्षाला 28.3 टक्क्याने वाढून 13,968 कोटी झाला आहे. रिलायंस जियोने एक वर्षापूर्वी या तिमाहीत 831 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट मिळवला होता.

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले कि 31 डिसेंबर पर्यंत जियोच्या ग्राहकांची संख्या 37 कोटीच्या पार गेली आहे. गेल्या 12 महिन्यांत जियोने 13 कोटी 57 लाख ग्राहक जोडले आहेत, तसेच एक कोटी 48 लाख नवीन ग्राहक गेल्या तिमाहीत जोडले गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here