Honor 10X Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Honor 10X Lite, देईल का Samsung ला आव्हान? https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-launched-with-quad-rear-cameras-hole-punch-display/ https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-launched-with-quad-rear-cameras-hole-punch-display/#respond Wed, 11 Nov 2020 12:32:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8893 Honor 10X Lite ची किंमत EUR 229.90 (जवळपास 20,200 रुपये) ठेण्यात आली आहे. फोन एमरल्ड ग्रीन, आईसलँडिक फ्रॉस्ट आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो.

The post 5,000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Honor 10X Lite, देईल का Samsung ला आव्हान? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei च्या सब-ब्रँड हॉनरने आपला नवीन फोन Honor 10X Lite अधिकृतपणे ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. हा फोन यावर्षी एप्रिल मध्ये लॉन्च झालेल्या Honor 9X Lite चा अपग्रेडेड वर्जन म्हणून मार्केट मध्ये आला आहे. ग्लोबल मार्केट मध्ये येताच हा स्मार्टफोन सौदी अरेबिया आणि रशियाच्या मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच हॉनरने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्म वॉटपॅड आणि ऑनलाइन लॉन्चपॅड प्रोग्राम रेड बुल बेसमेंट सह आपल्या भागेदारीची घोषणा केली आहे, जे Huawei मोबाईल सेवेकडे (एचएमएस) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे. हि सेवा गुगल मोबाईल सर्विसेज (जीएमएस) सारखी आहे.

डिजाइन

फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर कंपनीने फोन पंच-होल डिस्प्ले सह सादर केला आहे. डिवाइसच्या फ्रंटला मधोमध होल-पंच मिळेल. तसेच डिवाइसच्या फ्रंटला तिन्ही कडा बेजल लेस आहेत. तर बॉटमला थोडा जाड चिन पार्ट दिसत आहे. हँडसेटच्या डावीकडे वॉल्यूम रॉकर बटन सोबतच खालच्या बाजूला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर मागे टॉप लेफ्ट मध्ये वर्टिकल शेप क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात एलईडी फ्लॅश लाइट पण आहे.

हे देखील वाचा : 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी सह आला Huawei Mate 30E Pro 5G, जाणून घ्या वैशिष्ट्ये

स्पेसिफिकेशन्स

Honor 10X Lite 20: 9 आस्पेक्ट रेशियो असेलल्या 6.67-इंचाच्या फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर HiSilicon Kirin 710A SoC सह 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

फोटोग्राफी पाहता यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात f / 1.8 लेंस सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, f / 2.4 लेंस सह 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ-असिस्ट सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 8-मेगापिक्सल शूटर उपलब्ध आहे, ज्यात f / 2.0 लेंस आहे.

हे देखील वाचा : 50एमपी रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह Huawei चा 5G फोन Mate 40 झाला लॉन्च

फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 4 जी एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ, जीपीएस / ए-जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये ऑनबोर्ड सेंसर मध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर आणि एक प्रॉक्सिमिटी सेंसरचा समावेश आहे.

पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी 22.5W ऑनर सुपरचार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट डुअल-सिम (नॅनो) अँड्रॉइड 10-आधारित मॅजिकयुआय 3.1 वर चालतो. यात Google Play आणि इतर Google ऍप्लिकेशन आणि सेवा मिळत नाहीत. त्याऐवजी हा फोन एचएमएस 4.1 सह येतो.

किंमत

Honor 10X Lite ची किंमत EUR 229.90 (जवळपास 20,200 रुपये) ठेण्यात आली आहे. फोन एमरल्ड ग्रीन, आईसलँडिक फ्रॉस्ट आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो. फोन सुरवातीला रशिया, फ्रांस आणि जर्मनी सह इतर मार्केट्स पदार्पण करत आहे. कंपनीने EUR 30 (जवळपास 2,600 रुपये) ची अतिरिक्त सूट देण्याची घोषणा केली आहे जी निवडक मार्केट्स लागू असेल. फोनच्या भारतातील लॉन्चची कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post 5,000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Honor 10X Lite, देईल का Samsung ला आव्हान? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-launched-with-quad-rear-cameras-hole-punch-display/feed/ 0
48MP क्वाड कॅमेरा असलेला दमदार फोन Honor 10X Lite 10 नोव्हेंबरला होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-set-to-launch-on-november-10/ https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-set-to-launch-on-november-10/#respond Wed, 04 Nov 2020 12:36:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8799 लॉन्चच्या आधी समोर आलेल्या लीकच्या माध्यमातून Honor 10X Lite च्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे, ज्यानुसार फोन मध्ये 6.67 इंचाची स्क्रीन असलेल्या या फोन मध्ये IPS LCD Full HD+ डिस्प्ले असेल.

The post 48MP क्वाड कॅमेरा असलेला दमदार फोन Honor 10X Lite 10 नोव्हेंबरला होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून Huawei च्या सब-ब्रँड Honor च्या अपकमिंग X10 Lite फोन बद्दल माहिती समोर येत आहे. शक्यता अशी आहे कि स्मार्टफोन Honor 9X Lite चा अपग्रेड मॉडेल असेल जो दमदार फीचर्स सह सादर केला जाईल. या लीकच्या बातम्या येत असताना आता कंपनीने Honor X10 Lite च्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. कंपनी अधिकृतपणे सांगितले आहे कि या फोनची ग्लोबल लॉन्चिंग भारतात 10 नोव्हेंबरला होईल आणि या फोनच्या माध्यमातून कंपनी मिड रेंज सेगमेंट मध्ये रियलमी, शाओमी आणि वीवो समवेत इतर कंपन्यांना चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न करतील.

ऑनर 10 एक्स लाइटचा ग्लोबल लॉन्च

ऑनर 10 एक्स लाइट 10 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:30 वाजता IST वर एक वर्चुअल इवेंटच्या माध्यमातून सादर केला जाईल. हा इवेंट लाइव स्ट्रीम केला जाईल, जो तुम्ही घर बसल्या बघू शकता. वर्चुअल लॉन्चची लिंक लवकरच येईल अशी आशा आहे. Honor ने Honor 10X Lite च्या किंमतीबाबत किंवा उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती दिली नाही. कंपनीच्या रशियन वेबसाइट वर फोन पंच-होल कॅमेरा डिजाइन सह दाखवण्यात आला आहे आणि हा हिरव्या आणि जांभळ्या रंगात येऊ शकतो.

स्पेसिफिकेशन्स

लॉन्चच्या आधी समोर आलेल्या लीकच्या माध्यमातून Honor 10X Lite च्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे, ज्यानुसार फोन मध्ये 6.67 इंचाची स्क्रीन असलेल्या या फोन मध्ये IPS LCD Full HD+ डिस्प्ले असेल. याचे स्क्रीन रिजॉल्यूशन 1080×2400 पिक्सल असेल.

फोन 4GB RAM आणि 128GB स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. अशा आहे कि फोन 6जीबी वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. अँड्रॉइड 10 वर बेस्ड या फोन मध्ये HiSilicon Kirin 710A प्रोसेसर असेल आणि याची बॅटरी क्षमता 50000mAh असू शकतो, जी 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून ब्लूटूथ 5.1, 2.4 गीगाहर्ट्ज वाय-फाई, एलटीई, एक 3.5 मिमी हेड फोन्स जॅक आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट असू शकतो.

हे देखील वाचा : 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेऱ्यासह Honor 30i झाला लॉन्च

हॉनर 10 एक्स लाइट मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48-मेगापिक्सलचा प्राइमरी स्नॅपर असेल. तसेच तीन कॅमेऱ्यांमध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असल्याचे बोलले जात आहे. समोरच्या बाजूला फोन मध्ये होल-पंच डिजाइन मध्ये 8-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर असू शकतो.

The post 48MP क्वाड कॅमेरा असलेला दमदार फोन Honor 10X Lite 10 नोव्हेंबरला होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-set-to-launch-on-november-10/feed/ 0
5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेल्या या फोनची किंमत आली समोर, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-price-specification-renders-online-leak/ https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-price-specification-renders-online-leak/#respond Fri, 16 Oct 2020 15:06:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8564 Honor 10X Lite मध्ये पवार बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते

The post 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेल्या या फोनची किंमत आली समोर, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor कथितरित्या एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हा नवीन फोन कंपनी ऑनर एक्स 10 लाइट नावाने सादर करू शकते. आता एक नवीन रिपोर्ट ऑनलाइन समोर आला आहे ज्यात या फोनच्या लॉन्चच्या आधी किंमत आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे. इतकेच नव्हे तर रिपोर्ट मध्ये ऑनर 10 एक्स लाइटचे काही रेंडर पण शेयर केले गेले आहेत. लक्षात असू दे कि कंपनीने मे मध्ये Honor 10X 5G सादर केला होता आणि आता याचा लाइट वर्जन सादर करण्याची तयारी करत आहे.

डिजाइन

रिपोर्ट मध्ये समोर आलेल्या रेंडर्स नुसार फोन मध्ये पंच-होल डिजाइन आणि कॉर्नर वर स्लिम बेजल्स असतील. तसेच मागे एल-शेप क्वाड कॅमेरा सेटअप असेल. सोबतच वॉल्यूम कंट्रोल आणि पावर बटन फोनच्या उजवीकडे असतील. तसेच रेंडर्स मध्ये यायची माहिती पण समोर आली आहे कि Honor 10X Lite मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो.

किंमत

WinFuture.de च्या बातमीनुसार हा स्मार्टफोन कंपनी द्वारे EUR 200, (17,180 रुपये) मध्ये सादर केला जाईल. रिपोर्ट मध्ये किंमत आणि स्पेसिफिकेशन्स व्यतिरिक्त लॉन्च बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. पण आशा आहे कि कंपनी हा फोन लवकरच मार्केट मध्ये आणेल.

स्पेसिफिकेशन्स

रिपोर्ट मध्ये डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे. Honor 10X Lite कंपनीद्वारे 6.67-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले वर सादर केला जाऊ शकतो, जायचे स्क्रीन रिजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल असेल. फोन मध्ये कंपनीचा आपला Kirin 710A प्रोसेसर दिला जाईल. फोन 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48MP प्राइमरी लेंस, 8MP अल्ट्रा-वाइड सेंसर, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेंसर असेल. फ्रंटला वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP सेल्फी कॅमेरा असेल.

Honor 10X Lite मध्ये पवार बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते जी 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल. फोन Magic UI 3.1 बेस्ड अँड्रॉइड 10 वर चालेल. तसेच फोनच्या लॉन्च बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेल्या या फोनची किंमत आली समोर, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-price-specification-renders-online-leak/feed/ 0