48MP क्वाड कॅमेरा असलेला दमदार फोन Honor 10X Lite 10 नोव्हेंबरला होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये

अनेक दिवसांपासून Huawei च्या सब-ब्रँड Honor च्या अपकमिंग X10 Lite फोन बद्दल माहिती समोर येत आहे. शक्यता अशी आहे कि स्मार्टफोन Honor 9X Lite चा अपग्रेड मॉडेल असेल जो दमदार फीचर्स सह सादर केला जाईल. या लीकच्या बातम्या येत असताना आता कंपनीने Honor X10 Lite च्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. कंपनी अधिकृतपणे सांगितले आहे कि या फोनची ग्लोबल लॉन्चिंग भारतात 10 नोव्हेंबरला होईल आणि या फोनच्या माध्यमातून कंपनी मिड रेंज सेगमेंट मध्ये रियलमी, शाओमी आणि वीवो समवेत इतर कंपन्यांना चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न करतील.

ऑनर 10 एक्स लाइटचा ग्लोबल लॉन्च

ऑनर 10 एक्स लाइट 10 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:30 वाजता IST वर एक वर्चुअल इवेंटच्या माध्यमातून सादर केला जाईल. हा इवेंट लाइव स्ट्रीम केला जाईल, जो तुम्ही घर बसल्या बघू शकता. वर्चुअल लॉन्चची लिंक लवकरच येईल अशी आशा आहे. Honor ने Honor 10X Lite च्या किंमतीबाबत किंवा उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती दिली नाही. कंपनीच्या रशियन वेबसाइट वर फोन पंच-होल कॅमेरा डिजाइन सह दाखवण्यात आला आहे आणि हा हिरव्या आणि जांभळ्या रंगात येऊ शकतो.

स्पेसिफिकेशन्स

लॉन्चच्या आधी समोर आलेल्या लीकच्या माध्यमातून Honor 10X Lite च्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे, ज्यानुसार फोन मध्ये 6.67 इंचाची स्क्रीन असलेल्या या फोन मध्ये IPS LCD Full HD+ डिस्प्ले असेल. याचे स्क्रीन रिजॉल्यूशन 1080×2400 पिक्सल असेल.

फोन 4GB RAM आणि 128GB स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. अशा आहे कि फोन 6जीबी वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. अँड्रॉइड 10 वर बेस्ड या फोन मध्ये HiSilicon Kirin 710A प्रोसेसर असेल आणि याची बॅटरी क्षमता 50000mAh असू शकतो, जी 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून ब्लूटूथ 5.1, 2.4 गीगाहर्ट्ज वाय-फाई, एलटीई, एक 3.5 मिमी हेड फोन्स जॅक आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट असू शकतो.

हे देखील वाचा : 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेऱ्यासह Honor 30i झाला लॉन्च

हॉनर 10 एक्स लाइट मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48-मेगापिक्सलचा प्राइमरी स्नॅपर असेल. तसेच तीन कॅमेऱ्यांमध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असल्याचे बोलले जात आहे. समोरच्या बाजूला फोन मध्ये होल-पंच डिजाइन मध्ये 8-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here