4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेऱ्यासह Honor 30i झाला लॉन्च

Honor ने जुलै मध्ये भारतीय बाजारात दोन नवीन फोन Honor 9A आणि Honor 9S लॉन्च केले होते. यात ऑनर 9एस 6,499 रुपयांमध्ये आला होता तर ऑनर 9ए 11,999 रुपयांमध्ये सादर केला गेला होता. या स्वस्त स्मार्टफोन्स नंतर आता ऑनरने टेक मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत अजून एक नवीन स्मार्टफोन Honor 30i पण लॉन्च केला आहे. हा फोन सध्या ऑनरने रशियात लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांत सेलसाठी उपलब्ध होईल.

Honor 30i

ऑनर 30आय कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला आहे. फोनचा डिस्प्ले खूप नॅरो बेजल्स असलेला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ नॉच देण्यात आली आहे. Honor चा हा नवीन स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.3 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 417ppi पिक्सल डेनसिटी वर चालतो.

हे देखील वाचा: Honor Play 4 Pro लॉन्चच्या आधी झाला ई-कॉमर्स साइट वर लिस्ट, येईल 40 MP कॅमेरा आणि डुअल पंच होल सह

Honor 30i एंडरॉयड 10 वर ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मॅजिक यूआय 3.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह हुआवईचा किरीन 710एफ चिपसेट देण्यात आला आहे. रशियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ऑनर 30आय ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Honor 30i मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 8जीबी रॅम, 4300एमएएच आणि 40एमपी कॅमेरा सह लॉन्च झाला Honor X10

Honor 30i एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोनच्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आणि लोवर पॅनल वर मध्यभागी यूएसबी पोर्ट तसेच दोन्ही बाजूंना स्पीकर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी ऑनर 30आय मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ऑनर 30आय रशियन मार्केट मध्ये RUB 17,990 मध्ये लॉन्च केला गेला आहे जे इंडियन करंसीनुसार 17,000रुपयांच्या आसपास आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here