5,000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Honor 10X Lite, देईल का Samsung ला आव्हान?

Huawei च्या सब-ब्रँड हॉनरने आपला नवीन फोन Honor 10X Lite अधिकृतपणे ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. हा फोन यावर्षी एप्रिल मध्ये लॉन्च झालेल्या Honor 9X Lite चा अपग्रेडेड वर्जन म्हणून मार्केट मध्ये आला आहे. ग्लोबल मार्केट मध्ये येताच हा स्मार्टफोन सौदी अरेबिया आणि रशियाच्या मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच हॉनरने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्म वॉटपॅड आणि ऑनलाइन लॉन्चपॅड प्रोग्राम रेड बुल बेसमेंट सह आपल्या भागेदारीची घोषणा केली आहे, जे Huawei मोबाईल सेवेकडे (एचएमएस) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे. हि सेवा गुगल मोबाईल सर्विसेज (जीएमएस) सारखी आहे.

डिजाइन

फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर कंपनीने फोन पंच-होल डिस्प्ले सह सादर केला आहे. डिवाइसच्या फ्रंटला मधोमध होल-पंच मिळेल. तसेच डिवाइसच्या फ्रंटला तिन्ही कडा बेजल लेस आहेत. तर बॉटमला थोडा जाड चिन पार्ट दिसत आहे. हँडसेटच्या डावीकडे वॉल्यूम रॉकर बटन सोबतच खालच्या बाजूला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर मागे टॉप लेफ्ट मध्ये वर्टिकल शेप क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात एलईडी फ्लॅश लाइट पण आहे.

हे देखील वाचा : 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी सह आला Huawei Mate 30E Pro 5G, जाणून घ्या वैशिष्ट्ये

स्पेसिफिकेशन्स

Honor 10X Lite 20: 9 आस्पेक्ट रेशियो असेलल्या 6.67-इंचाच्या फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर HiSilicon Kirin 710A SoC सह 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

फोटोग्राफी पाहता यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात f / 1.8 लेंस सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, f / 2.4 लेंस सह 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ-असिस्ट सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 8-मेगापिक्सल शूटर उपलब्ध आहे, ज्यात f / 2.0 लेंस आहे.

हे देखील वाचा : 50एमपी रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह Huawei चा 5G फोन Mate 40 झाला लॉन्च

फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 4 जी एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ, जीपीएस / ए-जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये ऑनबोर्ड सेंसर मध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर आणि एक प्रॉक्सिमिटी सेंसरचा समावेश आहे.

पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी 22.5W ऑनर सुपरचार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट डुअल-सिम (नॅनो) अँड्रॉइड 10-आधारित मॅजिकयुआय 3.1 वर चालतो. यात Google Play आणि इतर Google ऍप्लिकेशन आणि सेवा मिळत नाहीत. त्याऐवजी हा फोन एचएमएस 4.1 सह येतो.

किंमत

Honor 10X Lite ची किंमत EUR 229.90 (जवळपास 20,200 रुपये) ठेण्यात आली आहे. फोन एमरल्ड ग्रीन, आईसलँडिक फ्रॉस्ट आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो. फोन सुरवातीला रशिया, फ्रांस आणि जर्मनी सह इतर मार्केट्स पदार्पण करत आहे. कंपनीने EUR 30 (जवळपास 2,600 रुपये) ची अतिरिक्त सूट देण्याची घोषणा केली आहे जी निवडक मार्केट्स लागू असेल. फोनच्या भारतातील लॉन्चची कोणतीही माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here